शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी – If Schools Are Closed Essay in Marathi

कधी कधी शाळेचा खूप कंटाळा येतो. सतत अभ्यास करावा लागतो. एकाच वर्गखोलीत बसून राहावे लागते. हवे तेव्हा, हवे ते करता येत नाही. गृहपाठ केला नाही, तर शिक्षा होते. जरा चूक झाली की, बाई आमच्या आईबाबांना बोलावतात. परीक्षेत नापास झाल्यावर खूप दुःख होते. म्हणून वाटते की, शाळा बंद झाल्या, तर खूप बरे होईल. हा सगळा त्रास वाचेल.

मात्र, शाळा बंद झाल्या, तर खूप नुकसान होईल. शाळेमुळे मित्र मिळतात. खूप गप्पा मारता येतात. खूप खेळता येते. आमच्या वर्गात पुस्तक वाचण्याचा तास असतो, तेव्हा आम्ही गोष्टींची पुस्तके वाचतो. आमचे शिक्षक आम्हांला गोष्टी सांगतात; गाणी म्हणून दाखवतात. हा सगळा आनंद नष्ट होईल. तर ज्ञान मिळणार नाही. मग डॉक्टर निर्माण होणार नाहीत.

शाळा नसेल, शास्त्रज्ञ निर्माण होणार नाहीत. यामुळे आपले खूप नुकसान होईल. छे, छे! शाळा हवीच हवी.

शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी – If Schools Are Closed Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply