शाळा नसती तर मराठी निबंध – Shala Nasti Tar Nibandh Marathi

शाळाच नसती तर? अहो, कल्पनेनेसुद्धा मला किती आनंद झाला आहे म्हणून सांगू? काय ते रोज रोज शाळेत जायचे आणि रोज रोज अभ्यास करायचा? शाळाच नसती तर आम्ही मुलांनी कित्ती मज्जा केली असती. मग आम्ही रोज खेळलो असतो, उशीरापर्यंत घरी रात्री टीव्ही बघत बसलो असतो आणि मग सकाळीही आरामात उठलो असतो. पण मग काही दिवस घरच्या सर्वांनी आमचा त्रास सोसला असता. नंतर मात्र आई, बाबा आणि आजी आम्हा सर्वांना ओरडले असते त्याचे काय? आईने तर माझ्यामागे भूणभूणच लावली असती की आता थोडी घरातली कामे शिका.

खरेच पण आम्ही शाळेत शिकतो म्हणून तर आम्हाला ज्ञान मिळते. आम्ही शाळेत गेल्यामुळेच तर आमचा सर्वांगीण विकास घडतो. शाळेत आमची आमच्या वयाच्या इतर मुलांशी भेट होते. शिक्षक आम्हाला खूप काही शिकवतात, आमच्यावर प्रेम करतात. शाळेत आम्हाला खेळायला मिळते. आमच्या शाळेचा तर खोखोचा संघसुद्धा आहे. आंतरशालेय स्तरावर आम्ही ढालही मिळवली आहे. शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा होतात. मी गाण्याच्या स्पर्धेत आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घेते. त्यात मला बक्षिसेही मिळतात. त्याशिवाय दर वर्षी आमची शाळा सहली काढते, वार्षिक समारंभ आयोजित करते. त्यात आम्ही मुले नाटके आणि नृत्य करतो.

अरे बापरे, शाळा जर नसेल तर हे काहीच होणार नाही? मग काय उपयोग? शाळा असते म्हणूनच सुट्टीला महत्व असते. शिवाय आम्हा मुलांना मोठे व्हायचे आहे, शिकायचे आहे आणि आयुष्यात काहीतरी बनायचे आहे. त्यासाठी शाळा हवी म्हणजे हवीच, नाही का?

शाळा नसती तर मराठी निबंध – Shala Nasti Tar Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply