शेत मळ्याला भेट मराठी निबंध

माझ्या बाबांचे एक मित्र आहेत. पुण्यापासून जवळच त्यांचा एक शेतमळा आहे. ते नेहमी आम्हांला त्यांचा शेतमळा पाहायला बोलवायचे. त्यामुळे एके दिवशी आम्ही त्यांचा शेतमळा पाहायला निघालो.

काही वेळाने आम्ही त्यांच्या मळ्यावर पोहोचलो. मळ्यात काकांचे टुमदार घर होते. ते घर पाहताच आम्ही खूश झालो. भोवताली मस्त बाग, अंगणात खूप झाडे आणि एक भलामोठा झोपाळा होता. आम्ही गेल्या गेल्या झोपाळ्यालाच लटकलो. थोड्या वेळाने नाश्ता झाला. थालीपीठ, त्यावर लोणी आणि सोबत दही. खूप मजा आली. मग आम्ही मळ्यात भटकायला निघालो.

सुरुवातीला लागली गुलाबांची बाग. फुलांचे आकार व रंग पाहून डोळे तृप्त झाले. ती फुले झाडावरच एवढी सुंदर दिसत होती की, तोडायची इच्छाच होत नव्हती! शेवंतीची बाग फुलली होती. शेवंती व इतर फुले तोडून बाहेर विक्रीसाठी पाठवली जात होती.

भाजीच्या मळ्यात बहरलेली भाजी पाहून डोळे दिपून गेले. पडवळ, दुधी भोपळे वेलींवर लोंबत होते. कोबी आणि फ्लॉवरचे गड्डे शेतात खुणावत होते. योजनाबद्ध पाणी सोडले जात होते. दुसऱ्या दिवशी शेतात हुर्डा पार्टी झाली. तेव्हा घरातील सर्व मंडळी व शेतमजूर एकत्र होते. दुपारी घरी परतलो तेव्हा ताज्या भाजीची भेट सोबत होतीच.

पुढे वाचा:

Leave a Reply