टेलिफोन निबंध मराठी – Telephone Nibandh in Marathi

आमच्या घरी टेलिफोन आहे. हल्ली ब-याच लोकांकडे प्रत्येकी एक मोबाईल असल्यामुळे बरेचदा लोक फोन काढूनच टाकतात. परंतु आम्ही मात्र तसे केले नाही. माझे बाबा म्हणतात की लोकांच्या घरी आजोबा असतात तसा हा आपल्याकडे टेलिफोन आहे.

टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्राहम बेल ह्यांनी १८७६ साली लावला. त्यापूर्वी कुणाला एकमेकांशी बोलायचे असले तर प्रत्यक्ष भेटावे लागे किंवा पत्र लिहावे लागे.

आपल्या भारतातही ब्रिटिश काळात फोन आला. परंतु सुरूवातीला टेलिफोन ही एक अद्भूतच गोष्ट होती. कारण खूप दूरच्या माणसाशी आपण फोनवरून बोलू शकतो ही लोकांना भुताटकीच वाटायची. सुरूवातीच्या काळात पुष्कळ श्रीमंत लोकांकडेच टेलिफोन असत.

हळूहळू टेलिफोन सर्वांकडे आले. त्यामुळे खूपच सोय झाली. कारण कुणाला काही विचारायचे असले, सांगायचे असले किंवा नुसत्या गप्पा जरी मारायच्या असल्या तरी लोक फोन करू लागले त्यामुळे तेवढ्यासाठी दूर अंतर पार करण्याचा वेळ आणि तो प्रवास टळला.

आता तर काय मोबाईल आलेत. त्यामुळे माणसे जरी घराबाहेर गेली तरी त्यांच्याशी केव्हाही संपर्क साधता येऊ लागला.

मला टेलिफोन खूप आवडतो. त्यामुळे मित्राला गृहपाठ विचारता येतो. त्याच्याशी गप्पाही मारता येतात. माझ्याकडे तर अजून मोबाईल नाही. आई आणि बाबा दहावी झाल्याशिवाय काही मला तो घेऊन देणार नाहीत. त्यामुळे घरातला फोन हाच माझा लाडका आहे. माझा मित्रच आहे तो.

टेलिफोन निबंध मराठी – Telephone Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply