जे खळांची व्यंकटी सांडो निबंध मराठी

‘जे खळांची व्यंकटी सांडो’ या ओळीतून संत ज्ञानेश्वर, समाजात जे दुष्ट लोक आहेत त्यांच्यातील दुष्ट विचार नष्ट होण्यासाठी परमेश्वराकडे पसायदान मागतात.

समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. जसे सज्जन असतात; तसे दुर्जनही असतात. सज्जनांमुळे समाज सुधारतो. समाजाला सन्मार्ग सापडतो. सज्जन समाजाच्या हितासाठी झटत असतो; पण दुर्जनाचा समाजाला त्रास होत असतो. दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याच्या सुखात विघ्न निर्माण करण्यात त्यांना आनंद वाटत असतो. अशा विघ्नसंतुष्ट लोकांच्या ठायी, दुष्ट, दुर्जनांच्या ठायी सद्विचार यावा, त्यांचे दुष्ट विचार गळून पडावेत अशी प्रार्थना संत ज्ञानेश्वर परमेश्वराकडे करतात.

फार फार वर्षापूर्वी वाल्या कोळी नावाचा दुष्ट दरोडेखोर एका जंगलात राहत होता. त्याने संपत्तीच्या लोभापायी अनेक लोकांची हत्या केली. पण त्याला नारदमुनींच्या रुपाने सज्जन भेटला आणि सन्मार्गाचा मंत्र सापडला. वाल्याच्या जीवनात क्रांतिकारी बदल होऊन त्याचा वाल्मीकी झाला. त्याच वाल्मीकी ऋषींनी ‘रामायण’ हे महाकाव्य लिहिले. संत ज्ञानेश्वरांना दुर्जनांकडून अशाच सन्मार्गाची अपेक्षा आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply