जो दुसऱ्यावर विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला निबंध मराठी

समर्थ रामदासांनी या जगात कसे वागावे याबद्दल उपदेश करताना म्हटले आहे की, आपले काम दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका. स्वत:चे काम स्वत:च करायला शिका. दुसऱ्यावर विसंबून राहिल्यामुळे आपले कार्य तडीस न जाता ते बुडण्याची शक्यता असते. म्हणूनच ‘जो स्वत:चि कष्टला । तोचि भला’ असे समर्थ रामदास म्हणतात.

काही लोकांना आपली कामे परस्पर दुसऱ्याकडून करून घेण्याची सवय असते. आपल्या कामाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकण्याची सवय असते. स्वत:च्या शेतात शेजाऱ्यांना पेरणी करायला सांगितल्यावर नुकसान हे होणारच. तो तुमच्या शेतात काळजीपूर्वक थोडीच पेरणी करणार ! छत्रपती शिवरायांनी प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून केली असती तर हिंदवी स्वराज्य निर्माण झाले असते का? कोणत्याही कार्यात, मग तो उद्योगधंदा असो, शिक्षण असो किंवा राजकारण असो; यशस्वी होण्यासाठी स्वत:च्या कष्टाची, त्यागाची, परिश्रमाची आहुती आवश्यक असते.

कोणतेही कार्य तडीस जाण्यासाठी त्या कार्यात स्वतः लक्ष घातल्याने कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही. उलट ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते. स्वत:चे कार्य स्वत:च करायला शिका. यातच तुमचे भले आहे, असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply