झाड बोलू लागते तेव्हा निबंध मराठी – Jhad Bolu Lagte Teva Marathi Nibandh

मी पहिल्यांदाच मामाच्या गावी गेलो होतो. मामाच्या घराच्या मागेच रान आहे. तिथली झाडेझुडपे पाहून मी हरखूनच गेलो. एका झाडाखाली अत्यंत आनंदाने निवांत बसलो, तेवढ्यात ते झाड माझ्याशी बोलू लागले…

“बाळा, बघ, तुझ्या मनाला आनंद झाला ना? अरे, हेच तर आमचे सुख आहे. तुमच्यासाठीच आम्ही झटत असतो. तुम्हांला आम्ही सावली देतो, फळे-फुले देतो. आम्ही तुम्हांला लाकूड देतो. आमचे काही बांधव तुम्हांला औषधे देतात.

“बाळा, तुला ठाऊक आहे का? आम्हीच ढग अडवतो. म्हणून तर पाऊस पडतो. आमच्यामुळे जमिनीची धूप होत नाही. आमच्यामुळेच नदयांना व विहिरी-तलावांना पाणी मिळते.

“परंतु तुमच्यापैकी काही लोक निष्ठुरपणे जंगलतोड करतात. हे खूप घातक आहे. यामुळे सगळे सजीव नष्ट होतील. माणूसही नष्ट होईल. लक्षात ठेवा – आम्ही जगलो, तरच तुम्ही जगाल.’

पुढे वाचा:

Leave a Reply