झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी – Zadache Atmavrutta in Marathi Nibandh

मी झाड आहे. जमीन माझी आई आहे. तिनेच मला जन्म दिला. माळ्याने माझे पालन-पोषण केले. त्याने माझ्या मुळाशी खत टाकले. त्याने मला पाणी घातले. त्याने जोराच्या हवेपासून माझे संरक्षण केले. त्याच्या देखरेखीखाली मी मोठा झालो. हिरवीगार पाने भरलेल्या माझ्या फांद्या आकाशात पसरल्या.

2 माझ्या फांद्यांवरती पक्षी घर करू लागले. सकाळ-संध्याकाळ पक्षांचा आवाज ऐकून मला खूप आनंद होतो. लहान मुले माझ्यावर दगड फेकून फळे तोडतात, झोका बांधतात, लपंडाव खेळतात. ह्या सर्व काही गमती पाहून मला खूप आनंद होतो. काही प्रवासी माझ्या सावलीत बसून आराम विश्रांती घेतात.

माझ्या आयुष्यात मी वादळ-वारा ह्याच्यापासून खूप दुःख सहन केले. कडाक्याची थंडी व कडक उन्हापासून सुद्धा मी बरेच सहन केले. इतके काही सगळे सहन करून मी माझ्या जागेवर गुपचूप उभा आहे. मला तो दिवस आठवतो, तेव्हा फार मोठे वादळ आले होते. ढगांचा गडगडात झाला व माझ्यावर वीज पडली. माझे सर्व शरीर थरथर कापत होते. त्याच्या जखमा अजून माझ्या शरीरावर आहेत. आता मी म्हातारा झालो आहे. तरी पण माझ्या मनात एक इच्छा आहे की मी असाच उभा राहून सर्वांची सेवा करत राहीन.

झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी – Zadache Atmavrutta in Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply