जुन्या कोटाचे आत्मवृत्त निबंध मराठी

अरे बाळ ऐकलेस का ? लक्ष देतोस ना ? अरे बाळा आता मी म्हातारा झालो ना ? आता मी थकलो म्हणुन तुम्ही लोक माझ्याकडे दुर्लक्ष करता आहात पण थांब थोडा वेळ आणि ऐक माझ्या आयुष्याची कहाणी. माझा जन्म सर्वात प्रथम कॅनडामध्ये झाला. एका प्रसिद्ध शेतकऱ्याने मोठ्या उत्साहाने कापसाचे बी विकत आणले आणि ते शेतात पेरले. त्यापासून कापसाचे झाड निर्माण झाले. बोंडातून कापसाच्या धाग्याचे उत्पादन झाले ते तंतू नंतर गिरणीत जाऊन त्यापासून सुत कातण्यात येवू लागले आणि मागावर एक एक तंतु एकत्र येवून कापड तयार झाले. रंगाच्या कारखान्यात रंग देवून त्याच्यावर कारागिरांकडून सुंदर नक्षीकाम करण्यात आले. त्यामुळे ते कापड इतके सुंदर दिसू लागले की प्रत्येकाला ते मोहवू लागले. एका प्रसिद्ध शिंप्याने त्याचा कोट शिवला तोच मी!

काय त्यावेळी माझा रुबाब होता ! दुकानात सर्वात प्रथम मला अडकवण्यात आले. प्रत्येकजण दुकानात आला की मी माझ्या रुपाने त्यांना मोहवून काढत होतो. सर्वजण येत आणि किंमत विचारुन निराशेने निघून जात. गरीब माणसाला त्याची किंमत जास्त वाटत होती ना ! मनात असुनही त्यांना मला खरेदी करता येत नव्हते. एका श्रीमंत सावकाराने २००० रु देवून खरेदी केले. केवढा गर्व झाला मला तेव्हा ! माझी रवानगी लगेच एका कपाटात झाली. सावकार दररोज मला बाहेर घालुन जाताना खिशाला गुलाबाचे फुल लावत. त्यामुळे इतर कोटांना माझा मत्सर वाटू लागला. माझा आनंद मात्र गगनात मावत नव्हता. थोड्याच दिवसात माझ्या आयुष्याला उतरली कळा लागली. माझ्या अंगाला ठिकठिकाणी चरे पडू लागले. किती रडलो म्हणून सांगू ! आता मला एका खुंटीला टांगण्यात येवू लागले. मी जीर्ण झाल्यावर माझी रवानगी नोकराच्या घरात झाली. नोकरांकडून माझ्या अंगाला ठिकठिकाणी छिद्रे पाडली जाऊ लागली. तरीसुद्ध मला आनंद वाटतोय तो एवढ्याच गोष्टीचा की श्रीमंताबरोबर गरीबाच्याही शरीराचे मी संरक्षण करु शकलो आणि माझे आयुष्य माणसाच्या रक्षणासाठी कारणी लावू शकलो होतो.

पण आता मात्र फाटल्याने माझ्या चिंध्या झाल्या आहेत म्हणून माणसाने मला रस्त्यावर धूळीत फेकून दिले याचेच वाईट वाटते. प्रत्येकाची पायधूळ माझ्यावर झडली जाते आहे. एकीकडून दुसरीकडे माझी होलपट होत आहे. परंतु समाधान इतकेच की माझे जीवन सार्थकी लागले. ऐकलीस तर माझी व्यथा. आम्ही उपयोगी पडूनही मनुष्य आमच्याशी कृतघ्नपणे वागतो आहे. पण आम्ही तुमच्या शेवटपर्यंत उपयोगी पडतो हाच आनंद होतो.

पुढे वाचा:

Leave a Reply