थेंबे थेंबे तळे साचे अर्थ निबंध मराठी – Thembe Thembe Tale Sache in Marathi

काही वस्तू दिसण्यात खूप क्षुल्लक असतात; पण हळूहळू त्यांचा संग्रह केला असता त्यांचा संचय वाढतो. त्यांचे महत्त्वही वाढते. तळे पावसाच्या थेंबाथेंबाने साचत जाते आणि शेवटी त्याचे विशाल जलाशयात रुपांतर होते. त्याप्रमाणे माणसाचे कर्तृत्वही कणाकणाने वाढत गेले पाहिजे.

ज्ञान म्हणजे विशाल महासागरच ! ते मिळवताना कणाकणाने वाढत गेले पाहिजे. एक दिवस त्या ज्ञानाला महासागराचे स्वरुप नक्कीच येईल. गांधीजींनी सातशे श्लोक पाठ करण्याचा निश्चय केला. रोज एक श्लोक याप्रमाणे सर्व श्लोक पाठ करण्यास त्यांना सातशे दिवस लागले. आपण केलेला निश्चय पूर्ण करण्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि सातत्य आवश्यक असते. गांधीजींनी आपल्या कृतीतून हे गुण दाखवून दिले.

मधमाशा कणाकणाने मकरंद गोळा करून मधुसंचय करतात. मुंग्या रेतीच्या कणाकणापासून मोठे वारुळ निर्माण करतात. ज्ञान आणि संपत्ती हे कणाकणानेच वाढले पाहिजे. मुंग्यांच्या आणि मधमाशांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी या विषयांच्या वृद्धीसाठी दररोज नेमाने किमान पाच नवीन शब्दांचे पाठांतर केल्यास या विषयांत आपण नक्कीच पारंगत होऊ. मिळालेल्या धनातून नियमितपणे थोडी थोडी बचत केल्यास भविष्यात त्या पुंजीचा निश्चितच उपयोग होईल.

पुढे वाचा:

Leave a Reply