Set 1: छत्रीची आत्मकथा मराठी निबंध – Chatri Chi Atmakatha in Marathi

मी लाल रंगाची छत्री आहे. मला तीनदा दुमडता येते त्यामुळे राजूच्या आईच्या पर्समध्ये मी मावते. म्हणूनच तर त्यांनी मला विकत घेतले ना. माझा जन्म मुंबईतील धारावी येथे झाला. तिथल्या कारखान्यात माझ्यासारख्या बयाच छत्र्यांचे सांगाडे तयार झाले. मग त्या सांगाड्यांवर लाल, हिरवे, निळे, पिवळे, गुलाबी, मोरपिशी अशा रंगाचे प्लास्टीकचा थर दिलेले कापड चढवले गेले. त्या कापडाला शोभेशी मूठही लावली गेली. अशा त-हेने तयार झालेल्या आम्हा सर्व छत्र्यांना आमच्या कारखान्याच्या मालकाने विकण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या व्यापायांच्या गोदामात पाठवले. त्या गोदामातूनच एक दुकानदाराने मला विकण्यासाठी घेतले. त्या दुकानात राजूची आई खरेदी करायला आली होती. तिला मी आवडले. तिच्या पर्समध्येही मी अगदी नीट बसत होते. म्हणून राजूच्या आईने मला घेतले.

राजूची आई फार नीटनेटकी आहे. तिच्या पर्समध्ये राहायला मला खूप आवडले कारण तिच्या पर्समध्ये ती फालतू कचरा अजिबात ठेवत नाही. मला घेतल्यावर पहिल्यांदा जेव्हा पाऊस आला तो खूप जोराचा आला परंतु माझ्यामुळे राजूच्या आईला अजिबात भिजावे लागले नाही. तिने ‘ छत्री चांगली आहे बरे का,’ असे म्हणून माझे कौतुक केले ते मला खूपच आवडले. मी ओली झाले की राजूची आई घरी आल्यावर मला पर्समधून बाहेर काढून वाळवते आणि मग नीट जपून मला पुन्हा पर्समध्ये ठेवते. ती माझी अशी काळजी घेते म्हणून मलाही छान वाटते.

त्या दिवशी राजूची आई म्हणत होती की पावसाळा काय थोड्याच दिवसांचा असतो. पण आमच्या मुंबईत मात्र उन्हाळा नेहमीच असतो त्यामुळे पाऊस संपला तरी मी उन्हासाठी ही छत्री वापरणार. ते ऐकून मला बरे वाटले. कारण नाहीतर पावसाळा संपल्यावर आम्हा छत्र्यांना लोक माळ्यावरच टाकून देतात. पुढल्या वर्षी पाऊसयेतो तेव्हा त्यांना छत्रीची आठवण होते.

देवा, तूमला चांगली मालकीण दिलीस म्हणून तुझे खूप आभार.

Set 2: छत्रीची आत्मकथा मराठी निबंध – Chatri Chi Atmakatha in Marathi

मी आहे एक छत्री. मला कालच रोहिणीताईने विकत घेतले. आता जून महिना सुरू झाला ना. आता पुढील चार महिने पावसाचे. त्यामुळे ज्याला त्याला छत्रीची गरज लागतेच कारण हा पाऊस कधी पडेल त्याचा काही नेमच नसतो ना. माझा रंग सुंदरसा लाल गुलाबी आहे. माझी मूठही लाल रंगाची आहे. पाहाताक्षणी मी कुणाच्याही नजरेत भरेन अशीच मी होते.

आणि माझ्या बाबतीत झाले ही अगदी तसेच. म्हणजे मला दुकानात येऊन दोन तासही लोटले नसतील तेवढ्यात रोहिणी दुकानात आली आणि तिने मला खरेदी करून टाकले. मला एकुण तीन वेळा दुमड पडते. त्यामुळे मी रोहिणीच्या पर्समध्ये मावू शकतेच शिवाय मी ओली झालेले असले तर माझा ओलेपणाचा भागही आतल्या बाजूला राहातो आणि रोहिणीची पर्स ओली होत नाही. लोकांची तक्रार अशी असते की त्यांच्या छत्र्या सारख्या हरवतात. त्यावर उपाय म्हणून माझ्यासारखी ही पर्समध्ये राहाणारी छोटीशी छत्री बाजारात आली. आता रोहिणी मला नीट ठेवेल अशी आशा बाळगून आहे मी.

फार पूर्वी लोक पावसापासून रक्षण करण्यासाठी इरले वापरत असत. नंतर मग छत्रीचा जन्म झाला. सुरूवातीच्या छत्र्या काळ्या आणि भल्या मोठ्या दांड्याच्या असत. त्या बहुदा पुरूषच वापरत असत. नंतर मग बायका जेव्हा छत्र्या वापरू लागल्या तेव्हा त्या अधिक नाजूक आणि रंगीबेरंगी बनवण्यात येऊ लागल्या. छत्रीचा उपयोग फक्त पावसातच नाही तर बरेचदा उन्हापासून रक्षण करण्यासाठीसुद्धा होतो.

माझे कापड जलनिरोधक आहे.खास बनवलेले नायलॉन वापरले आहे त्या कापडात. माझा सांगाडा पोलादाचा आहे. पतियाळाच्या एका मोठ्या कारखान्यात माझा जन्म झाला. माझ्या सांगाड्यावर हे सुंदर लालगुलाबी कापड ताणून बसवले गेले. मगच मी ह्या दुकानात आले आणि रोहिणीने मला विकत घेतले. जुन्या काळी राजेमहाराजांवर छत्र धरले जात असे. तो माझाच जुना अवतार होता.

आता मला आशा वाटते की रोहिणी मला नीट ठेवेल, मला कुठेही हरवणार नाही. तिच्या संगतीत पुढली दोन तीन वर्षे तरी मी सहज चांगली राहू शकेन ह्याची मला अगदी खात्री आहे. लोकांच्या उपयोगी पडतो. माझे तेल डोक्याला लावले तर डोके शांत राहाते. देवाच्या चरणी वाहाण्यासाठीही माझा उपयोग होतो.

Set 3: छत्रीची आत्मकथा मराठी निबंध – Chatri Chi Atmakatha in Marathi

मी एक जुनी-पुराणी छत्री आहे. पावसाळा सुरु झाला की लोकांना माझी आठवण येते. जगभरात सर्वत्र माझा वापर केला जातो. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला माझा वापर सुरु झाला. सुरुवातीला माझा आकार खूप मोठा होता व मी फक्त काळया रंगातच असे. पण हळूहळू माझा आकार व रूप दोन्ही बदलले. माझा आकार इतका लहान झाला की आता मी तुमच्या पर्समध्येही मावते. माझे कापड आता विविध रंगांचे असते. मी पावसाळा व उन्हापासून तुमचे संरक्षण करते.

माझा जन्म एका मोठ्या कारखान्यात सात वर्षांपूर्वी झाला. माझा रंग लाल व निळा होता. व कपड्यावर खूप सुंदर नक्षी काढलेली होती. त्यानंतर मला एक मोठ्या दुकानात पाठविण्यात आले. तेथे माझ्यासोबत माझ्या इतर मैत्रिणीही होत्या. पावसाळा सुरु झाला आणि त्या दुकानात आलेल्या एका गृहस्थाने मला विकत घेतले. तो माझी खूप काळजी घेत असे.

माझा मालक अतिशय चांगला होता. तो मला रोज त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जाई. त्याच्यासोबत मी हॉटेल, बाजार, सिनेमागृह अशा अनेक ठिकाणी फिरले. पण एक दिवस बाजारातील एका दुकानात तो मला विसरून गेला. मी त्या दुकानात बराच काळ राहीले. माझा मालक न आल्याने त्या दुकानदाराने मला त्याच्या नौकराच्या हवाली केले. तो ही चांगला होता परंतु तो माझी पुरेशी काळजी घेत नसे. त्याने पावसाळा व उन्हाळयातही माझा खूप उपयोग केला. मला त्यामुळे विश्रांती मिळेना. याचा माझ्यावर वाईट परिणाम झाला. मी घाणेरडी व खराब दिसू लागले. माझे सांधे व दांडी ढिली झाली. माझ्या कपड्यांना छिद्र पडले. परंतु माझ्या मालकाने माझी कोणतीही दुरुस्ती केली नाही. शेवटी मी पुर्णपणे नादुरुस्त झाल्यावर त्याने मला या कोपऱ्यात फेकून दिले. आता माझ्याकडे कोणाचेच लक्ष नाही.

परंतु तरीही माझ्या भूतकाळाचा विचार करुन मला आनंद होतो. माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी झाला होता. मी माझे कर्तव्य व्यवस्थित पार पाडले. मला आशा आहे की माझ्या मालकाला कधी तरी माझी आठवण येईल आणि मला माझे वैभव परत मिळेत.

Set 4: फाटक्या छत्रीचे आत्मवृत्त

घरात रद्दी व भंगार सामान पडले होते ते भंगारवाल्याच्या दुकानात पोहचवल्या शिवाय खेळायला सुटका नव्हती म्हणून अडगळीच्या खोलीत भंगार घेण्यासाठी गेले. रद्दी, फाटक्या चपला, तुटक्या छत्र्यांना पिशवीत भरताना अचानक विव्हळण्याचा आवाज आला, म्हणून बावरुन इकडे-तिकडे पाहिले परंतु कुणीच दिसेना म्हणून खाली पाहिले तर फाटक्या छत्रीतुन विव्हळण्याचा आवाज येत होता.

थोड्या वेळाने त्यातुन आवाज आला, “घाबरु नकोस बाळ, मला अडगळीतुन आता भंगारमध्ये टाकले जाणार म्हणून वाईट वाटले”. गेल्याच वर्षी तुझ्या ताईने बाजारातुन मला खरेदी केले. माझा रंग, नक्षी आणि आकार पाहून तुझ्या ताईने बघताक्षणीच १०० रु देऊन मला विकत घेतले. तिच्या सर्व मैत्रीणींनी तिच्या पसंतीबद्दल तिची तारीफ केली तेव्हा ताई खुश झाली. पण पावसात भिजताना तिच्या

मैत्रीणीच्या छोट्या भावाने खेळता खेळता मला खाली आपटले आणि माझी सर्व हाडे खिळखिळी झाली. माझे सुंदर, नक्षीदार कापड जागोजागी फाटले. मैत्रीणीने तुझ्या ताईला मला देऊन टाकले. परंतु आता माझ्या रुपात ती शान राहिली नव्हती जी खरेदी करताना होती. ताई थोडा वेळ हळहळली. माझी अवस्था पाहून दु:खी झाली परंतु आता तिला मला घेऊन कॉलेजला जाता येणार नव्हते म्हणून माझी रवानगी इथे अडगळीच्या खोलीत झाली.

मला फार वाईट वाटले. दुकानातील हँगरला अडकवलेले माझे रुप व हे रुप यात जमीनअस्मानचा फरक होता पण आनंद इतकाच होतो की पावसापासुन रक्षण करण्यासाठीच आमची रचना होते मी काही काळतरी तुझ्या ताईचे पावसापासून रक्षण केले आणि उपयोगी पडले आता भंगारातुन माझे आणखी तुकडे होतील व दुसरी नवीन छत्री बनविण्यासाठी माझे अवयव वापरले जातील.

उपयोगी पडण्याचे काम माझ्याकडून झाल्याने जनसेवेचे पुण्य मिळेल पण आयुष्य फार कमी मिळाल्याचे फार वाईट वाटते. तु एवढी माझी व्यथा ऐकून घेतलीस याबद्दल आभारी आहे. अलविदा.

छत्रीची आत्मकथा मराठी निबंध – Chatri Chi Atmakatha in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply