जनसेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध – Janseva Hich Ishwar Seva Essay in Marathi

स्वत:साठी सगळेच जगत असतात. दुसऱ्यासाठी जगणे महत्त्वाचे असते. जो दुसऱ्यासाठी जगतो, तो मरूनही कीर्तीरुपी उरतो. ईश्वरसेवा म्हणजे त्याची पूजा करणे, प्रार्थना करणे, उपासना करणे असे काहीजण मानतात; पण खरी ईश्वरसेवा जनसेवेतच असते असे संतांचे म्हणणे आहे.

संत गाडगेबाबांनी ईश्वराची पूजाअर्चा, प्रार्थना करण्यात वेळ न घालवता गावोगावी जाऊन स्वच्छता केली, लोकांचे आरोग्य सांभाळले. जनसेवेतच धन्यता मानली. संत तुकाराम महाराजांनी ‘जो रंजल्या गांजलेल्यांना आपला मानतो, त्याला साधू मानावा’ असा संदेश दिला. त्यांनी गोरगरीब, दीनदुबळ्या लोकांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गावोगावी कीर्तने केली. राजर्षी शाहू महाराजांनी २० व्या शतकाच्या पूर्वार्धातच राधानगरी येथे धरण बांधून पाणी अडवले. त्यामुळे कित्येक लोकांचा उद्धार झाला.

लोकोद्धारासाठी महान कार्य करणाऱ्या संतांचा, थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल केल्यास जनसेवा करण्याची सवय लागेल. शाहू, फुले, आंबेडकर, गांधीजी या महान सत्पुरुषांनी जनसेवेतच ईश्वरसेवा मानली. असेच कार्य अनेकांच्या हातून घडल्यास या जगाचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही.

जनसेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध – Janseva Hich Ishwar Seva Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply