थांबला तो संपला, काळ पुढे चालला
काळ कुणासाठी थांबत नाही. भूतकाळाचे रुपांतर कधीही वर्तमानकाळात होत नाही. क्षणभंगुर जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे. कालचक्र कुणासाठीही थांबत नाही. म्हणूनच वेळेचा सदुपयोग करून आपले जीवन सार्थकी लावणे हे केवळ मानवाच्याच हातात आहे. वेगाने पुढे सरकणाऱ्या कालचक्राबरोबर जो धावतो, तोच या जगात तरतो असा या उक्तीचा अर्थ आहे.
कित्येक लोक बाष्फळ गप्पा मारण्यात, निरर्थक बडबड करण्यात, सुस्त आणि ऐदी जीवन जगण्यात आपले बरेचसे आयुष्य वाया घालवतात. उरलेले आयुष्य झोपेत आणि पोट भरण्यात ! निष्क्रिय राहून आळसाने लोळत पडण्यापेक्षा आपल्याला मिळालेल्या आयुष्याचे सोने करणे हे केवळ माणसाच्याच हातात असते.
सूर्याचे आयुष्य एक हजार अब्जवर्ष । पृथ्वीचे आयुष्य पाचशे अब्जवर्ष । आणि मानवाचे? केवळ शंभर वर्षे ! मानवाला मिळालेल्या मर्यादित आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा उपयोग सत्कार्यासाठी, मानवी कल्याणासाठी आणि यश मिळवण्यासाठी करायला हवा. ‘कल करे सो आज कर’ आजचे काम उद्यावर ढकलण्यापेक्षा उद्याचे काम आज करायला शिकले पाहिजे. कणाकणाने मधु गोळा करणाऱ्या मधमाशीचा आदर्श घेऊन जीवनाची वाटचाल केली तरच यशस्वी जीवनाचा मार्ग सापडेल. थांबू नका सतत कार्य करत राहा. जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल.
पुढे वाचा:
- तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी
- जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मराठी निबंध
- जनसेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध
- छत्रीची आत्मकथा मराठी निबंध
- चॉकलेटचे झाड उगवले, तर… निबंध मराठी
- चित्रपटाचे फायदे तोटे निबंध मराठी
- चित्रपटाचे फायदे तोटे निबंध मराठी
- चांदण्या रात्रीतील वाळवंट निबंध मराठी
- घारीचे मनोगत निबंध मराठी
- घरकाम करणारे आमचे सदाकाका मराठी निबंध
- घड्याळ नसते तर मराठी निबंध
- ग्रीष्म ऋतु मराठी निबंध
- ग्रंथालयाचे मनोगत निबंध मराठी
- ग्रंथप्रदर्शन निबंध मराठी
- ग्रंथ आपले गुरू निबंध मराठी
- गुलाबाच्या फुलाची आत्मकथा
- गांधीजींचे विचार निबंध मराठी
- गरज सरो वैद्य मरो निबंध मराठी
- खोटे कधी बोलू नये निबंध मराठी
- खेळ आणि खिलाडूपणा मराठी निबंध
- कालचे खेळ व आजचे खेळ मराठी निबंध