जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मराठी निबंध

मोठेपण विनासायास मिळत नाही. परिश्रमाशिवाय, यातना सोसल्याशिवाय महानता प्राप्त होत नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

मोठेपण हे कोणालाही सहजासहजी मिळत नाही. गुलाबाचे फूल मिळवण्यासाठी काट्याची बोचणी खावी लागते. हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय त्याला कोंदणात स्थान मिळत नाही. आपल्याला साधुसंत, थोर व्यक्ती, शास्त्रज्ञ यांची महानता दिसते; पण ती महानता प्राप्त होण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट सोसलेले असतात. मोठेपणा हा त्यागातून, कष्टातून, अखंड साधनेतून मिळालेला असतो. एका रात्रीत ताजमहाल बांधता येत नाही.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आज साऱ्या भारतीयांच्या हृदयात ‘गानकोकिळा’ म्हणून विराजमान आहेत. पण त्यासाठी त्यांनी केलेला रियाज, परिश्रम, कष्टातील सातत्य यामुळेच यश प्राप्ती झाली. महारथी कर्णाचे दातृत्व साऱ्या जगाला माहिती आहे. म्हणूनच दानशूर व्यक्तीला कर्णाचा अवतार मानतात. प्रभूरामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगला. एकपत्नीत्वाचा अंगीकार केला. रावणाशी युद्ध करून त्याचा नायनाट केला. म्हणूनच त्यांची कीर्ती ‘एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी’ म्हणून अमर आहे.

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मराठी निबंध

पुढे वाचा:

Leave a Reply