विवाहासाठी भटजींना लागणाऱ्या सामानाची यादी
Table of Contents
देवदेवक:
१ किलो तांदूळ, १ वाटी हळद, १ वाटी गुलाल, १ वाटी कुंकू, रांगोळी, गंध, फुले, दुर्वा, दर्भ, समिधा, उदबत्त्या, समई, निरांजन, वाती, तूप, १ वाटी साखर, गूळ, थोडी हळकुंडे, २ कोरी सूपे, १ पंचा, १ खण, सुपात घालायला १ किलो गहू, १ साडी, खण २, कच्च्या सुताचा गुंडा, २ मातीचे कलश, ताम्हण, सुगंधी तेल, ऊन पाणी, ८ पाट, पाटावर घालण्यासाठी शाल, १० पत्रावळी, ५० द्रोण, पंच पल्लव: आंबा, उंबर, पिंपळ, जांभूळ, पाहीरा ह्यांची पाने, आंब्याचे ५ टहाळे, पांगायाच्या झाडाची अग्रासह फांदी, ५० विड्याची पाने, ५० सुपाऱ्या, ८ ते १० फळे, नारळ, दक्षिणा.
ग्रहमख :
पूजा साहित्य: वस्त्र, मृत्तिका, १ फुंकणी, समिधा (पळस, आघाडा, उंबर, खैर, पिंपळ, शमी) फुले, तुळशी, दुर्वा, १५ हळकुंडे, १ किलो तांदूळ, पाव किलो तूप, गूळ खोबऱ्याचे ५ नैवेद्य, १/२ किलो तांदळाचा भात.
ग्रहस्थापना, पूर्व पूजा, उत्तर पूजा : १५-२० विड्याची पाने, ११ सुपाऱ्या, १ फळ, १ वाण (खण, नारळ, सुपारी) मुंडावळ्या, दक्षिणा, ५ खोबऱ्याच्या वाट्या, २ जानवी जोड, लामणदिवा, समई.
सीमान्तपूजन :
१ हार, १ गुच्छ, २ गजरे, १ नारळ, वरासाठी केलेला पोषाख.
गणपतीपूजन, पुरोहित पूजन, वरपूजन : ७ नारळ, ६ विड्याची पाने, ४ सुपाऱ्या, वाण १ (खण, नारळ, सुपारी), दक्षिणा. ह्याच वेळी वराचा मान म्हणून बटव्यात ऐच्छिक रक्कम घालून देणे.
घटिकास्थापन:
१ किलो गहू, ४ विड्याची पाने, ४ सुपाऱ्या, १ नारळ.
पंचपल्लव: आंबा, उंबर, पिंपळ, जांभूळ, पाहीर, पूजेचे सामान, दक्षिणा.
गौरीहार: पाटा किवा पाट मंडपी, देवी, गणपती, तांदूळ.
वाङनिश्चय:
समई, कणकेचे लेणे, पूजासाहित्य,
पूजासाहित्य : १ किलो तांदूळ, ५ हळकुंडे, १० सुपाऱ्या, १० विड्याची पाने, १ नारळ. वधू साडीचोळी, १ दागिना. कन्येपेक्षा वराकडील दक्षिणा मात्र दुप्पट.
गणपतीपूजन, वरुणपूजन, पत्रिकापूजन, दैवज्ञपूजन, शचीपूजन यासाठी- ५० विड्याची पाने, २० सुपाऱ्या, ४ नारळ, ४ वाणे (खण, नारळ, सुपारी), दक्षिणा.
मधुपर्क : कन्यादान
पूजासाहित्य : १ वाटी दूध, १ वाटी साखर, दही, मध, काशाची थाळी, समई, ताम्हण, तांब्या, पंचपात्री, पळी, कच्चे सूत, धोतर जोडी, अर्घ्य, २ हळकुंडे, गोरुत्सर्ग.
मधुपर्क सांगता : कन्यादान सांगता : सुवर्णाभिषेक, कंकणपूजन, महालक्ष्मीपूजन, वाण (खण, नारळ, सुपारी), वधूसाठी लगीनसाडी, मंगळसूत्र व ओटीचे सामान, ५० विड्याची पाने, २५ सुपाऱ्या.
विवाहहोम
मृत्तिका, समिधा, फुंकणी, १ पावशेर तूप, १ पावशेर साळीच्या लाह्या, १ किलो तांदूळ, सहाण, पूजासाहित्य, दर्भमुष्टी, ४ सुपाच्या कानपिळ्यासाठी टोपी किंवा पैसे, दक्षिणा.
ऐरणी पूजन
पूजा साहित्य : (कणकेचे दिवे) झाल: १६ दिवे, ३२ वाती, तेल, बळीचा दिवा, १ खण, दही, २५ विड्याची पाने, ११ वाट्या, १ किलो तांदूळ, २० सुपाऱ्या, २ हार, १ गुच्छ, ४ गजरे, मुंडावळ, फुलांची जाळी. वरमातेस दक्षिणा, वधूवरास दक्षिणा.
लक्ष्मीपूजन
१ किलो तांदूळ, १/२ किलो गहू, २५ विड्याची पाने, २० सुपाऱ्या, ३ नारळ, १ खण, पूजा साहित्य, दुर्वा, पंचपल्लव ३ वाट्या, १ ताट, दक्षिणा.
देवकोत्थापन
पूजा साहित्य : १/२ किलो तांदूळ, १/२ किलो गहू, २५ विड्याची पाने, १५ सुपाऱ्या, ३ वाट्या तेल, ऊन पाणी, उपाध्यायाची पाठवणीदक्षिणा.
सत्यनारायण पूजा
पूजेसाठी बाळकृष्णाची मूर्ती. चौरंग, १ तांब्या, १ ताम्हण, पाट, १ शाल, ४ केळीचे खांब, १/२ किलो तांदूळ, १/२ किलो गहू,
पूजेचे साहित्य : हळद, कुंकू, बुक्का, अरगजा, सुगंधी तेल, ऊन पाणी, कापूर, निरांजन, वाती, समई, रांगोळी, गुलाल, दुर्वा, फुले, हार, तुळस, पंचपल्लव, अक्षदा, २५ विड्याची पाने, ५० सुपाऱ्या, १ नारळ, १ खोबऱ्याची वाटी, २ बदाम, ३ खारका, पंचामृत : (दही, दूध, तूप, मध, साखर)
नेवेद्यास शिरा: ( रवा, साखर, तूप, केळी, दूध १।शेर, अगर १। पावशेर असावे.) महानैवेद्य अन्नाचा, पूर्वपूजा, उत्तर पूजा, दक्षिणा, सत्यनारायण पोथी वाचन.
पुढे वाचा: