बीरबल साहनी निबंध मराठी
महान भारतीय शास्त्रज्ञांची आठवण केली की बीरबल साहनी यांचे नाव घ्यावे लागते. वनस्पतीशी संबंधीत त्यांचे अनेक महत्त्वपूर्ण शोध आहेत. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८९१, ला पंजाबच्या एका गावात झाला होता. त्यांचे वडील रूग्धी राम साहनी लाहोरच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक होते.
बालपणापासूनच साहनी यांना निसर्गाचे वेड होते. १९११ मध्ये पदवीप्राप्त केल्यानंतर ते इंग्लडला निघून गेले आणि वनस्पती शास्त्रात पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर ते शोध कार्याला लागले. तिथेच त्यांनी डॉक्टर ही उपाधी प्राप्त केली आणि नंतर जर्मनीला गेले. भारतात आल्यावर त्यांनी अनेक विद्यापीठात अद्यापनाचे कार्य केले. त्यांनी अनेक वनस्पत्यांचा शोध लावला आणि नवी माहिती मिळवली. त्यांनी या दरम्यान अनेक लेख लिहिले. १९३६ मध्ये त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्व देण्यात आले. त्यांना अनेक मोठ-मोठ्या पदव्या आणि पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. ते एक चांगला माणूस आणि संगीतज्ञ देखील होते.
बीरबल साहनी यांचे व्यक्तीमत्व जितके महान होते तितकेच आकर्षक देखील. ते आपल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रेमाने भेटत आणि त्यांना संशोधनासाठी प्रेरीत करीत. बीरबल साहनी या नावाने सुरू करण्यास आलेली संस्था आज देखील कार्यरत आहे. ती लखनौत आहे.
पुढे वाचा:
- बाजारातील फेरफटका निबंध मराठी
- बाजारातील एक तास निबंध मराठी
- आमच्या गावचा बाजार निबंध मराठी
- शाळेची बस निबंध मराठी
- फळांची उपयुक्तता मराठी निबंध
- प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन
- पृथ्वीवर प्रदूषणाचे दुष्परिणाम
- ध्वनि प्रदूषण मराठी माहिती
- मृदा प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती
- पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
- हवा प्रदूषण मराठी माहिती
- राष्ट्रध्वजाचे मनोगत निबंध
- शाळेतील क्रीडांगणाचे मनोगत
- वर्गातील फळ्याचे मनोगत