Set 1: डॉक्टर निबंध मराठी – Doctor Nibandh Marathi

ताप आला की पहिली आठवण होते ती डॉक्टरांची. मला ताप येतो त्या दिवशी माझी आई ऑफिसला जात नाही. त्याऐवजी ती मला डॉक्टरांच्या दवाखान्यात घेऊन जाते. तिथे माझ्यासारखे बरेच आजारी लोक बसलेले असतात. पंधरावीस मिनिटांनी नंबर लागला की आम्ही आत जातो. आत गेल्यावर डॉक्टर सुहास्यवदनाने विचारतात,” काय ग? काय झालंय? ” त्यांच्या बोलण्यामुळेच अर्धा आजार पळून जातो.आमच्या डॉक्टरांच्या हाताला खरेच चांगला गुण आहे.

डॉक्टरांना म्हणूनच समाज देवमाणूस मानतो. त्यांच्याकडे आदराने पाहातो. सैनिक देशाचे रक्षण करतात तसेच डॉक्टर आपल्या आरोग्याचे रक्षण करतात. आपल्या देशात आयुर्वेदिक, युनानी, ऍलोपथी, होमिओपथी अशा वेगवेगळ्या वैद्यकीय उपचार पद्धती आहेत. प्रत्येक उपचार पद्धतीचे डॉक्टर वेगवेगळे असतात. रोगाची लक्षणे पाहून अचूक रोगनिदान करणे आणि त्यानुसार उपचार करणे हे डॉक्टरांचे काम असते. किरकोळ आजारापासून ते गंभीर आजारांपर्यंत सर्व आजारांवर डॉक्टर प्रयत्नपूर्वक उपचार करतात.

डॉक्टरांचे जीवन हे एक सेवाव्रतच असते. कित्येकदा अत्यंत कठीण अशा शस्त्रक्रिया करताना त्यांना तासंतास एकाग्र चित्ताने काम करावे लागते कारण रूग्णाच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. कधीकधी तर त्यांना हातातली कामे टाकून तातडीने रोग्याचे प्राण वाचवायला जावे लागते.

डॉक्टर हा स्वभावाने मृदू असावा. त्याने रोग्याच्या मनात विश्वास निर्माण करावा. त्याला धीर द्यावा. रोग्याची मानसिक स्थिती सुधारल्यामुळे अर्धी लढाई जिंकल्यासारखे होते. केवळ पैसा कमावणे हा डॉक्टरांचा उद्देश असूनये. परंतु हल्ली काहीकाही डॉक्टर संगनमत करून रूग्णांना लुटतात. डॉक्टरी शिक्षणाचा खर्चच एवढा जास्त असतो की शिक्षणासाठी खर्च केलेले पैसे लौकर वसूल व्हावे म्हणून डॉक्टर ह्या मार्गाने जातात. परंतु काही डॉक्टर असेही आहेत जे जन- सेवेसाठी आपले सगळे जीवन पणाला लावतात.

डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग, डॉक्टर रवींद्र कोल्हे, डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे ह्यासारखे अनेक डॉक्टर शहरात मिळणा-या सुखसोयी लाथाडून रूग्णसेवेसाठी खेडोपाडी गेलेले आहेत. डॉक्टरांना सलाम.

Set 2: डॉक्टर निबंध मराठी – Doctor Nibandh Marathi

ज्याप्रमाणे सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतो त्याप्रमाणे डॉक्टर आपल्या आरोग्याचे रक्षण करतात. प्राध्यापक, इंजिनियरप्रमाणेच डॉक्टरचे समाजात एक महत्त्वाचे स्थान असते. डॉक्टरांकडे समाज आदराच्या दृष्टीने पाहतो. आपल्या देशात विभिन्न प्रकारच्या चिकित्सा पद्धती आहेत. उदा. आयुर्वेदिक, अॅलोपॅथिक इत्यादी. प्रत्येक चिकित्सा पद्धतींचे डॉक्टर वेगळे असतात. डॉक्टरचे काम रोगाचे निदान करणे हे असते. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टरकडे जातो. किरकोळ तापापासून गंभीर आजारापर्यंतचे सर्व प्रकारचे रोग डॉक्टर दूर करतात.

सामान्य रोगांवर कोणतेही डॉक्टर इलाज करू शकतात. परंतु अपघातग्रस्त झाल्यावर, किडनी खराब झाल्यावर, डोळे अधू झाल्यावर आपल्याला शल्यचिकित्सकांची किंवा तज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. डॉक्टर शल्यक्रियेद्वारे आपणास नवजीवन प्रदान करतात. अनेक मोठमोठे आजार डॉक्टर प्रयत्नपूर्वक बरे करतात.

डॉक्टरचे जीवन म्हणजे सेवा व साधना. कित्येकदा ऑपरेशनच्या वेळी अनेक तास त्यांना काम करावे लागते. शांतपणे झोपताही येत नाही. इस्पितळात डॉक्टरांना अनेक रोग्यांना तपासावे लागते. रोग्याची स्थिति गंभीर असल्यास रात्रीसुद्धा रोग्याला अनेकदा तपासण्यास जावे लागते. डॉक्टर मनुष्याला जीवनदान देऊन त्याच्यावर उपकार करतात. डॉक्टर मृदू स्वभावाचा असावा. डॉक्टरने आपल्या रोग्यांना दिलासा द्यावा. त्यांच्या मनांत स्वत:बद्दल विश्वास निर्माण करावा. आपल्या सुहास्य मुद्रेने रोग्याच्या वेदना दूर कराव्यात. केवळ पैसे कमावणे हा डॉक्टरचा उद्देश असू नये.

अनेक डॉक्टर धर्मार्थ इस्पितळात जाऊन रोग्यांची सेवा करतात. ते खूप कमी पगार घेतात. असे डॉक्टर प्रशंसा पात्र आहेत. ते खऱ्या अर्थाने मानवतेचे सेवक आहेत. मला मोठे झाल्यावर डॉक्टर बनायचे आहे.

Set 3: डॉक्टर मी होणार निबंध मराठी – Doctor Nibandh Marathi

डॉक्टरांना समाज देवमाणूस मानतो. त्यांच्याकडे आदराने पाहातो. सैनिक देशाचे रक्षण करतात तसेच डॉक्टर आपल्या आरोग्याचे रक्षण करतात. आपल्या देशात आयुर्वेदिक, युनानी, ऍलोपथी, होमिओपथी अशा वेगवेगळ्या वैद्यकीय उपचार पद्धती आहेत. प्रत्येक उपचार पद्धतीचे डॉक्टर वेगवेगळे असतात. रोगाची लक्षणे पाहून अचूक रोगनिदान करणे आणि त्यानुसार उपचार करणे हे डॉक्टरांचे काम असते. किरकोळ आजारापासून ते गंभीर आजारांपर्यंत सर्व आजारांवर डॉक्टर प्रयत्नपूर्वक उपचार करतात.

डॉक्टरांचे जीवन हे एक सेवाव्रतच असते. कित्येकदा अत्यंत कठीण अशा शस्त्रक्रिया करताना त्यांना तासंतास एकाग्र चित्ताने काम करावे लागते कारण रूग्णाच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. कधीकधी तर त्यांना हातातली कामे टाकून तातडीने रोग्याचे प्राण वाचवायला जावे लागते.

ताप आला की पहिली आठवण होते ती डॉक्टरांची. मला ताप येतो त्या दिवशी माझी आई ऑफिसला जात नाही. त्याऐवजी ती मला डॉक्टरांच्या दवाखान्यात घेऊन जाते. तिथे माझ्यासारखे बरेच आजारी लोक बसलेले असतात. पंधरावीस मिनिटांनी नंबर लागला की आम्ही आत जातो. आत गेल्यावर डॉक्टर सुहास्यवदनाने विचारतात,” काय रे? काय झालंय तुला?” त्यांच्या बोलण्यामुळेच अर्धा आजार पळून जातो. आमच्या डॉक्टरांच्या हाताला खरेच चांगला गुण आहे.

डॉक्टर हा स्वभावाने मृदू असावा. त्याने रोग्याच्या मनात विश्वास निर्माण करावा. त्याला धीर द्यावा. रोग्याची मानसिक स्थिती सुधारल्यामुळे अर्धी लढाई जिंकल्यासारखे होते. केवळ पैसा कमावणे हा डॉक्टरांचा उद्देश असू नये. परंतु हल्ली काहीकाही डॉक्टर संगनमत करून रूग्णांना लुटतात. त्यावर त्यांचे म्हणणे असते की डॉक्टरी शिक्षणाचा खर्चच एवढा जास्त असतो की शिक्षणासाठी खर्च केलेले पैसे लौकर वसूल व्हावे म्हणून डॉक्टर ह्या मार्गाने जातात. परंतु काही डॉक्टर असेही आहेत जे जन-सेवेसाठी आपले सगळे जीवन पणाला लावतात.

डॉ. अभय आणि डॉ.राणी बंग, डॉक्टर रवींद्र कोल्हे, डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे ह्यासारखे अनेक डॉक्टर शहरात मिळणा-या सुखसोयी लाथाडून रूग्णसेवेसाठी खेडोपाडी गेलेले आहेत.

म्हणूनच मला वाटते की आपणही डॉक्टर व्हावे आणि लोकांची सेवा करावी.

डॉक्टर निबंध मराठी – Doctor Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply