चांदण्या रात्रीतील नौका विहार निबंध मराठी

निसर्गाची अनंत रूपे आहेत. तो एक महान जादूगार आहे. शरदाचे स्वच्छ चांदणे, आकाशात चमकणारी नक्षत्रे, शीतल, मंद, सुंगधित वारा आणि क्षितिजापर्यंत पसरलेले चांदणे आपल्या मनाला मोहून टाकते. आनंद देते.

एका अशाच मनोहर वातावरणात माझ्या मित्रांनी गंगा तटी फिरावयास जाण्याचा कार्यक्रम ठरविला. शरदाचे प्रफुल्लित दिवस होते. गंगा आमच्या घरापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. आम्ही सगळे रात्री जेवण झाल्यावर फिरत फिरत गंगा किनारी गेलो. अतिशय सुंदर दृश्य होते. त्या चांदण्या रात्री दूरवर पसरलेली रेती चांदीप्रमाणे चमकत होती. गंगातटाजवळच एक जुने भव्य मंदिर होते. तेथे आरती चालू होती. घंटा ध्वनी होत होता. मंदिराजवळच काही अंतरावर कीर्तन चालू होते. नदीत अनेक तरुण-तरुणी नौका विहार करीत हाते. आम्हाला नौका विहार करावासा वाटला. आम्ही एक नाव ठरविली. ती नाव छान सजविलेली होती. आजूबाजूचे सुंदर दृश्य पाहून गाणे म्हणण्याची इच्छा झाली. नावाडीही आमच्या सोबत गाऊ लागला. काहींनी विनोद सांगितले. नावाड्यास त्याचे अनुभव विचारले. तो ही गप्पीष्ट होता. त्यामुळे किती वेळ गेला कळलेच नाही. आम्ही नावेत बसूनच सोबत आणलेले पदार्थ खाल्ले.

काही वेळाने हवेत गारवा वाढला. जवळ पास दीड वाजला होता. बऱ्याच नौका किनाऱ्यावर परत आल्या होत्या. आम्ही पण नावाड्याला परत चलण्यास सांगितले. नावाडी चतुर होता. सांभाळून नेत होता. आम्हीही नाव वल्हवण्याचा प्रयत्न केला. नाव पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असल्याने बरीच शक्ती लागत होती. २०-२५ मिनीटात आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो. आणि घरी गेलो. चांदण्या रात्रीतील त्या नौका विहाराची आठवण झाली की आम्ही आजही रोमांचित होतो.

पुढे वाचा:

Leave a Reply