धर्मनिरपेक्षता निबंध मराठी – Dharmnirpekshta Nibandh in Marathi
भारत हे एक विशाल राष्ट्र आहे. ‘विविधतेत एकता’ हे आपले ब्रीद आहे. ह्या देशात अनेक भाषा, अनेक वंश आणि अनेक धर्मांचे सहवास्तव्य ब-याच काळापासून होते. भारताची मूळ मनोवृत्ती ही संकुचित नाही, ‘हे विश्वची माझे घर’ असा सर्वसमावेशक मानवताधर्म आपल्या देशाचा मूळ स्त्रोत आहे.
म्हणूनच जेव्हा धर्माच्या नावावर १९४७ साली आपल्या देशाची फाळणी झाली तीफाळणी फार धक्कादायक होती. ‘फोडा आणि राज्य करा’ ह्या इंग्रजी डावपेचाच्या विषवृक्षाला आलेले ते विषारी फळ होते. पाकिस्तान फुटून निघाल्यावर उर्वरित भारताने काय करायचे? आपली संस्कृती तर संकुचित नव्हती ना? इथे राहाणा-या उर्वरित सर्व जातीधर्मांच्या नागरिकांना स्वातंत्र्याची फळे मिळणे आवश्यक होते. त्याशिवाय ब्रिटिशांच्या अंमलाखालील भारत आणि संस्थानिकांच्या अंमलाखाली असलेला भारत येथील सर्व नागरिकांची एकी होणे त्यासाठी गरजेचे होते. म्हणूनच आपले तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती निर्माण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या समितीचे एक सदस्य होते. समितीने अथक काम करून आपली राज्यघटना बनवली. त्यात धर्मनिरपेक्षता हा मुख्यधागा होता.
आपला देश हा एक निधर्मी किंवा धर्मनिरपेक्ष देश आहे. ह्याचा अर्थ आपल्या शासनाचा कुठलाही एक असा विशिष्ट धर्म नाही. आपल्या राज्यघटनेने प्रत्येकाला आपला स्वतःचा धर्म पाळण्याची मोकळीक दिली आहे. आपल्या देशातील प्रत्येक नागरिक त्याला हव्या त्या धर्मावर विश्वास ठेवू शकतो. राज्य त्याच्या धर्मात हस्तक्षेप करीत नाही. राज्याच्या दृष्टीने सर्व धर्म समानच आहेत.धर्म ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे.
भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळेस माणुसकीला काळीमा लागेल असे दंगे झाले. भविष्यात जर आपल्याला विकसित आणि प्रगत राष्ट्र म्हणून उदयाला यायचे असेल तर धर्मनिरपेक्षता आणि सौहार्द आपल्याला ठेवावेच लागेल. धार्मिक कारणांमुळे भावना भडकवणे सोपे असते परंतु त्याचे परिणाम खूप भयंकर असतात. पाकिस्तान धर्मावरून वेगळे झाले खरे परंतु अवघ्या २३ वर्षातच त्या देशापासून बांगला देश हा देश फुटून निघाला. ह्याचाच अर्थ असा की केवळ धर्माच्या पायावर केलेली राष्ट्रनिर्मिती टिकत नाही. आज पाकिस्तान आणि चीन आपल्या येथील फुटीरांना सहाय्य करतात. त्यांचा डाव आपण वेळीच ओळखला पाहिजे.
म्हणूनच आपल्या देशात जर एकता, बंधुता आणि शांती टिकवायची असेल, आपल्या भावी पिढ्यांना सुखी आणि संपन्न झालेले आपल्याला पाहायचे असेल तर धर्मनिरपेक्षतेचा सहारा घेतल्याशिवाय आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. असते. येथे झाडेझुडपे उगवू शकत नाहीत परंतु शेवाळ आणि बुरशीचे काही
प्रकार तग धरून राहू शकतात. इथे पेंग्वीन आणि सील प्राण्यांची वस्ती असते. येथील भूगर्भात असलेली खनिजे आणि सागरी संपत्ती, येथे चाललेले वैज्ञानिक संशोधन ह्यांच्यामुळे ह्या प्रदेशाला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. अनेक देशांनी येथे आपली संशोधन केंद्रे स्थापन केली आहेत, भारतही त्या मोहिमेचा एक भाग आहे. १९८७ साली भारताचे पहिले शोधपथक ह्या भागात गेले. त्यात २१ सभासद होते. ह्या शोधपथकाने तिथे पुष्कळ महत्वाचे शास्त्रीय प्रयोग केले. त्याशिवाय आपला तिरंगाही तिथेफडकवला.
आता दर वर्षी आपली शोधपथके तिथे जातात. ह्या पथकात काम करण्यासाठी देशभरातील शास्त्रज्ञ, सैनिक, संशोधक ह्यांची खास निवड करून त्यांना पाठवले जाते.
सर्वात पहिल्यांदा गेलेल्या भारतीय शोधपथकाने इथे एक स्थायी केंद्र निर्माण केले, त्याचे नाव त्यांनी ठेवले दक्षिण गंगोत्री. काही काळाने ‘मैत्री’ नावाचे आणखी एक स्थायी केंद्र स्थापन केले. प्रत्येक शोधपथकातील लोक काही काळ तिथे वास्तव्य करतात. तिथे ते महत्वाचे प्रयोग करतात. ह्या सर्व मोहिमा सफल झाल्या हे आपले फार मोठे सुयश आहे.
हे सगळे प्रयोग आपण आणि इतर राष्ट्र का करीत असतो? त्या मागील महत्वाचे कारण हे आहे की पृथ्वीवरील वातावरण, तापमान, समुद्र आणि जलप्रदुषणाच्या समस्या ह्या प्रयोगांमुळे आपण समजावून घेऊ शकतो. भारत आणि इतर राष्ट्रे ह्या भागातील प्रयोगांवर आधारित असलेले पायाभूत शोध लावू शकतात. आपल्या पृथ्वीचा भूतकाळ समजून घेण्याच्या कामी अंटार्क्टिका महत्वाचे योगदान देऊ शकतो. तेथील सागरात संपूर्ण मानवजातीला बराच काळ पुरेल एवढे मौल्यवान धातू, वायू आणि तेल आदी खनिजांचे अपार स्त्रोत असावेत असा अंदाज आहे. अंटार्क्टिकाच्या आर्थिक आणि व्यावसायिक शक्यता अमर्याद आहेत म्हणूनच जगातील सर्व देश तिथे मोहिमा काढत असतात. आपला भारतही त्यास अपवाद नाही.
पुढे वाचा:
- मी पाहिलेला एक देशभक्त निबंध मराठी
- देव जरी मज कधी भेटला निबंध मराठी
- दूरदर्शनचे फायदे व तोटे
- दूरदर्शन शाप की वरदान निबंध मराठी
- दूरचित्रवाणी निबंध मराठी
- दूरचित्रवाणीचे फायदे निबंध मराठी
- दूरचित्रवाणीची कैफियत निबंध मराठी
- दूध निबंध मराठी
- दिल्लीची कथा निबंध मराठी
- भारताची राजधानी दिल्ली निबंध मराठी
- भारताची राजधानी कोणती आहे
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- ताजमहाल निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- दिनदर्शिका निबंध मराठी
- दारूबंदी निबंध मराठी
- गरिबी एक शाप मराठी निबंध