डॉ ए पी जे अब्दुल कलाम मराठी निबंध – Dr A P J Abdul Kalam Nibandh in Marathi

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे थोर शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या महान कामगिरीमुळे त्यांना १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ ही सर्वोच्च पदवी बहाल करण्यात आली.

डॉ. कलाम यांचे संपूर्ण नाव डॉ. अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम. त्यांचा जन्म १९३१ साली तमिळनाडूमध्ये झाला. त्यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. डॉ. कलाम यांनी लहानपणी वर्तमानपत्रे टाकण्याचेही काम केले आहे.

डॉ. कलाम हे भारतीय क्षेपणास्त्रांचे प्रणेते आहेत. भारताने १९८० साली ‘रोहिणी’ या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण केले. नंतर ‘पृथ्वी’ व ‘अग्नी’ ही क्षेपणास्त्रे निर्माण केली. या सर्वांचे सर्व श्रेय डॉ. कलाम यांनाच आहे.

डॉ. कलाम हे अत्यंत साध्या स्वभावाचे आहेत. त्यांना लहान मुले खूप आवडतात. कोठेही गेले, तरी ते लहान मुलांना भेटतात. अशा या थोर शास्त्रज्ञांनी २००२ ते २००७ या कालावधीत भारताचे राष्ट्रपतिपद भुषवले होते.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम मराठी निबंध – Dr A P J Abdul Kalam Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply