हलासन मराठी माहिती – Halasana Information in Marathi
Table of Contents
हलासन म्हणजे काय?
‘‘हल’’ म्हणजे ‘‘नांगर’’. या आसनात शरीराचा आकार नांगरासारखा बनतो म्हणून या आसनास हलासन असे म्हणतात.
हलासन करण्याची पद्धत
- जमिनीला पाठ टेकवून चटईवर पडा.
- दोन्ही हात शरीराच्या बाजूला सरळ चिकटवून ठेवा.
- तळहात जमिनीवर दाबा.
- उत्तानपादासनासारखे दोन्ही पाय हळूहळू आणि सावकाश वर उचलून आकाशाच्या दिशेने सरळ करून थांबा.
- श्वास सोडून कंबर उचला.
- पाय डोक्याकडे मागे घ्या.
- दोन्ही पाय सावकाश जमिनीवर आणा.
- हात मुडपून दोन्ही हातांची मिठी डोक्याखाली ठेवा किंवा दोन्ही हात जमिनीवर सरळ पसरवा.
- पाय सरळ आणि जुळवून असू द्या. त्यांच्यामध्ये सांध ठेवू नका.
- या आसनाची ही अंतिम अवस्था आहे.
- या स्थितीत श्वासोच्छवास सामान्य ठेवा.
- या स्थितीत शक्य तितका वेळ आरामात थांबा.
- थांबण्याचा वेळ हळूहळू वाढवा.
- शेवटी हात सोडा. त्यांना दोन्ही बाजूंस जमिनीवर ठेवा.
- सावकाश श्वास घ्या.
- शवासन करून विश्रांती घ्या.
हलासन चे वैशिष्ट्य
- हलासन हे सोपे आसन नाही.
- याचा सराव नियमित व सावकाश करावा.
- आसन करतेवेळी झटके देऊ नका.
हलासन फायदे मराठी
- हार्निया आणि मधुमेहाकरिता हे उपयुक्त आसन आहे.
- वांझ स्त्रियांनी या आसनाचा सराव करावा.
- अपचनाचा विकार कमी होऊन भूक चांगली लागते.
- पोट, पित्ताशय आणि पाणथरी यातील रोगांवर गुणकारी आहे.
- पाठीचा कणा सशक्त आणि लवचिक होण्यास मदत होते.
- पुठ्ठे आणि पोट यांची अवास्तव वाढ कमी होण्यास हलासनाचा चांगला उपयोग होतो.
हलासन विडिओ मराठी
अजून वाचा: