खोटे कधी बोलू नये निबंध मराठी

एक धनगराचा मुलगा होता. तो रोज आपल्या शेळ्या-मेंढ्या रानात चरायला घेऊन जात असे. तो रोज “लांडगा आला रे आला” असे ओरडत असे. त्याचे ओरडणे ऐकून आजूबाजूला शेतात काम करणारे लोक त्याच्या मदतीसाठी धावून जात. पण लांडगा आलेलाच नसे. लोकांची झालेली फजिती पाहून धनगराच्या मुलाला हसू येई.

एक दिवस लोकांनी निश्चय केला. ‘आज मुलाच्या मदतीला ‘ जायचे नाही’ ठराविक वेळेला मुलाचा आवाज आला- “धावा धावा! लांडगा आला रे आला!” लोकांना त्याचे हे नेहमीचेच ओरडणे वाटले आणि कोणीही मदतीला गेले नाही. परंतु त्या दिवशी खरेच लांडगा आला होता व तो शेळ्या-मेंढ्या खाऊ लागला होता. एकटा मुलगा काहीच करू शकला नाही. तो फक्त झाडावर चढून बसला आणि रडू लागला! पुढे मुलाला खूप पश्चात्ताप झाला. खोटे बोलल्यामुळे त्याला अशी शिक्षा मिळाली.

पुढे वाचा:

Leave a Reply