खेळाचे महत्व निबंध मराठी – Khelache Mahatva in Marathi Essay

अभ्यासाइतकेच जीवनात व्यायाम व खेळ यांनाही महत्त्व आहे. मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच मुलांचा, शारीरिक विकासही झाला पाहिजे. व्यायाम, खेळ शारीरिक विकास करतात तर शिक्षण, चिंतन, मननामुळे व्यक्तीचा मानसिक विकास होतो. खेळांची अनेक रूपे आहेत. काही खेळ मुलांसाठी, काही मोठ्यांसाठी तर काही वृद्धांसाठी असतात. काही खेळ खेळण्यासाठी मोठी मैदाने लागतात. काही खेळांना मात्र लागत नाहीत. घरातल्या घरात खेळले जाणारे करम, पत्ते, बुद्धिबळं, सोंगट्या या खेळांमुळे मनोरंजन व बौद्धिक विकास होतो.

‘स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो” जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळ, उत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतात, शरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो.

मनुष्याला जे धडे शिक्षण शिकवू शकत नाही ते खेळाचे मैदान शिकविते. उदा, खेळ खेळताना शिस्त पाळावी, नेत्याच्या आज्ञेचे पालन करावे, खेळात विजयाच्या वेळी उत्साह असावा पण हार झाली तरी बदल्याची भावना नसावी. मुलांच्या किशोरावस्थेपासूनच त्यांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळू दिले पाहिजेत. त्यांना संघर्षासाठी तयार केले पाहिजे. म्हणजे ते भविष्यातही यशस्वी होतील. विश्व विक्रम करून आपला आणि देशाचा गौरव ते वाढवितील. सांघिक खेळांमुळे संघभावना व जबाबदारीची जाणीव होते.

खेड्यांतील आणि शहरांतील खेळात फरक असतो. खेड्यांतली मुले विटीदांडू, कबड्डी, गोट्या खेळतात. तर शहरातील मुले क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिससारखे खेळ खेळतात. वाढत्या लोकसंख्येमुळे खेळांची मैदाने कमी होत आहेत. खेळांडूसाठी खेळाचे मैदान मोठे आणि हवेशीर असले पाहिजे. त्यांनी हिरव्या भाज्या, दूध, फळे आदींचे सेवने केले पाहिजे. स्वच्छ वातावरणात राहिले पाहिजे. हे शरीर ईश्वराची देणगी आहे. त्याला निरोगी ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी खेळ, व्यायाम, आणि शिक्षण आवश्यक आहे. शाळेमध्ये खेळांत भाग घेण्यास उत्तेजन दिले पाहिजे.

खेळाचे महत्व निबंध मराठी – Khelache Mahatva Nibandh Marathi

आम्हा लहान मुलांना खेळायला खूप आवडते. आम्हाला मुळी हे सारे जगच नवे असते, त्यातच आमच्या शरीराचीही दिसामासा वाढ होत असते. ही वाढ होत असताना आमच्या शरीरात प्रचंड उर्जा ठासून भरलेली असते. त्या उर्जेचा निचरा होण्यासाठी आम्हा मुलाला खेळायला मिळाले पाहिजे, भरपूर खेळायला मिळाले पाहिजे. पण आजकाल तसे होत नाही. कारण आजकाल आम्ही राहातो त्या सोसायटीत खेळायला जागा नसते, आसपास मैदाने किंवा बागा नसतात. मग घरात बसून टीव्ही पाहाणे किंवा मोबाईलवर खेळ खेळणे ह्यात आम्हाला आमचा वेळ घालवावा लागतो. त्यातच भर म्हणून शाळा लांब असल्याने रोज दोन दोन तास शाळेत जाण्यायेण्यातच वाया जातात.

शिवाय अभ्यास, शिकवणी ह्या सगळ्या रगाड्यातून वेळ मिळाला तर आम्ही मैदानावर जाणार ना? अर्थात् मी मुंबईत राहातो म्हणून मुंबईतले सांगतो आहे. इतर ठिकाणी मुलांना खेळायला मिळत असेलच. माझ्या बाबांना ह्याची जाणीव असल्यामुळे ते आम्हाला दर सुट्टीत फुटबॉलच्या प्रशिक्षणाला पाठवतात. त्याशिवाय दर रविवारी त्यांच्यासोबत आम्हाला पोहायला घेऊन जातात. कधीकधी बॅडमिंटनचे कोर्ट बुक करून आम्ही सोसायटीतील मुले तिथे खेळायला जातो.सायकलही चालवतो.

माझ्या बाबांचे सांगणे असे आहे की मुलांना खेळाची आवड लावली की ती बहकत नाहीत, वाममार्गाला लागत नाहीत. म्हणून सर्वच मुलांना खेळायला मिळाले पाहिजे.

मुलांनीच नव्हे तर मोठ्यांनीही खेळले पाहिजे. कारण त्यामुळे व्यायाम घडतो. सर्व स्नायू लवचिक होतात. हृदयाचे स्नायूही बळकट झाल्यामुळे हृदयविकारासारखा आजार होत नाही.खेळामुळे शरीर तंदुरूस्त राहातेच.मग अशा ह्या तंदुरूस्त शरीरातले मनही घट्ट, समतोल आणि आनंदी का बरे राहाणार नाही?

खेळात कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. त्यामुळे आपल्या अंगी खिलाडूपणा येतो. एक प्रकारची निकोप स्पर्धा निर्माण होते. संघभावना वाढीस लागते. पुढे जगात वावरताना आपल्याला चारचौघांना घेऊन कसे चालायचे ते समजते त्यामुळेच खेळांचे महत्व फार आहे. सर्वांनाच लहानपणी खेळायला मिळाले पाहिजे. प्रत्येक बालकाचा तो हक्कच आहे.

खेळाचे महत्व निबंध मराठी – Khelache Mahatva Nibandh Marathi

विद्यार्थी जीवनात अभ्यासाइतकेच खेळालाही महत्त्व आहे. पालकांच्या आता हे लक्षात आले आहे की, मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. मानवाचे संपूर्ण जीवन मन आणि शरीररूपी गाडीच्या दोन चाकांवर चालते. शिक्षण, चिंतन, मनन, व्यक्तीचा मानसिक विकास आणि व्यायाम, खेळ, शारीरिक विकास करतात.

खेळाची दोन रूपे असतात. घरात बसून खेळले जाणारे खेळ उदा. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते इ. मैदानावर मोकळ्या जागी खेळले जाणारे खेळ उदा. खो खो, क्रिकेट, फुटबॉल इ. घरात खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे व्यायाम कमी पण बौद्धिक विकास आणि मनोरंजन होते. मैदानी खेळांमुळे शरीराला भरपूर व्यायाम होतो व मनोरंजनही होते.

‘निरोगी शरीरात निरोगी मनाचा निवास असतो शरीर अस्वथ असेल तर मनही अस्वस्थ असते. जी मुले केवळ पुस्तकातील किडे असतात त्यांचा शारीरिक विकास खुंटतो. ती चिडचिडी व सुस्त होतात. स्वत:चे रक्षणही ती करू शकत नाहीत. जी मुले अभ्यासाबरोबरच निरनिराळे खेळही खेळतात ती प्रसन्न व निरोगी राहतात.

उत्साही आणि चपळ राहिल्यामुळे शारीरिक शक्तीचा विकास होतो. यावरच मानसिक व आत्मिक विकास अवलंबून असतो. दिवसभर यत्राप्रमाणे काम केल्यानंतर जर खेळाच्या मैदानावर मुले गेली नाहीत तर बुद्धिमान विद्यार्थीसुद्धा निर्बुद्ध होऊन जाईल. आणखी काम करण्याची इच्छा मनात निर्माण होण्यासाठी खेळणे आवश्यक आहे.

विद्यार्थी, जीवनात फक्त अभ्यासच करीत राहू नये किंवा नुसते खेळतच बसू तथे तर “Work while you work, play while you play.” हे चांगल्या विद्यार्थ्याचे लक्षण आहे. माणसाचे मन सदैव अभ्यासात गुंतलोले राहिल्यास डोके जड़ पडते आणि त्याला विश्रांतीची गरज भासते. ही विश्रांती खेळण्यामुळेच मिळते. खेळण्यामुळे मानसिक द्वंद्व मिटते. मन हलके होऊन शरीरात नवीन ऊर्जा शक्ती येते. हाडे मजबूत होतात आणि चेहरा कातिमान होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळ्यांची ज्योती (तेज) वाढते. शरीर वज्राप्रमाणे होते. खेन जीवनात संजीवनी बुटीचे काम करते. खेळ मनोरंजनाचे एक चांगले साधन आहे. जेव्हा खेळाडू खेळाच्या मैदानावर खेळतो तेव्हा तो पुलकित होतो. खेळ खेळण्यामुळे खेळाडू, स्वतः प्रेक्षकही आनंदी होतात.

क्रिकेट आणि हॉकीचा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित असतात. खेळाडूची एकाग्रता खेज व अन्य कामांत सारखीच असारे शिक्षण घेऊन जे शिकावयास मिळत नाही ते खेळात शिकावयास मिळते. उदा. शिस्त विद्यार्थी जीवनात शिस्तीला खूप महत्त्व आहे. शिस्तीत राहूनच विद्यार्थी शिक्षण घेऊ शकता शिक्षकही शिस्तीतच अध्यापन करतात. शिस्त नसेल तर शाळा कुस्तीचे मैदान बनेल, जो संघ जितका शिस्तबद्ध असेल तितके सामना जिंकणे त्याला सोपे होते. अन्यथा हरणयाचा शक्यता जास्त असते. याखेरीज खेळात परस्पर सहकार्याची भावना पण उत्पन्न होत क्रिकेट, फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघाचे खेळ बगल असतात व प्रत्येकाचे महत्त्वही वेगळे असते. कप्तान संघनेता असतो. त्याच्या आदेशाच सगळे खेळाडू पालन करतात. संघातील खेळाडूंच्या परस्पर सहकार्यामुळे संघ विजयी हातो.

खळ मनुष्याला स्वावलंबी व आत्मविश्वासू बनवितो. ज्याप्रमाणे विद्यार्थी जीवनाचे उद्दिष्ट अभ्यास करणे हे असते त्याचप्रमाणे खेळाच्या मैदानावर उतरल्यावर खेळाडूचे टद्दिष्ट आत्मविश्वासाने खेळून विजय प्राप्त करणे हे असते. विजयाची इच्छा खेळाडूला विजयी बनविते. खळ हा खेळाडूचा आत्मा असतो. खेळ केवळ खेळाच्या भावनेतूनच खेळले जावेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये परस्पर सहकार्य, शिस्त, संघटन, सहनशीलपणा येतो. खेळात संघर्ष हा असतोच. त्यातून जो विजय मिळतो त्याचा आनंद खास असतो. विजय मिळाल्यावर उत्साह वाटणे, पराजय सहन करणे व बदल्याची भावना मनात न ठेवता पराजयाच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करून जिंकण्याचा प्रयत्न करणे ही खऱ्या खेळाडूची लक्षणे हात. पराजयच यशाचा संदेश देते.

खेळांमध्ये केवळ दोन संघांमध्येच जवळीक निर्माण होते, असे नसून क्रिकेटसारख्या खेळांमुळे दोन देशांमध्ये ही जवळीक निर्माण होते. खेळ क्विबंधुत्वाची भावना निर्माण करतात. धनुर्विद्या, घोडेस्वारी, कबड्डी, मल्लयुद्ध यासारख्या खेळांची परंपरा आपल्या देशात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आजही या खेळांचे महत्त्व कमी झालेले नाही.

भारत खेळांमध्ये मागे नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने येथे नेहमीच होतात. जिल्हा, मंडळ, प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धा होत राहतात. विजयी खेळाडूंना पुरस्कार दिले जातात. नव्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. खेळामध्ये नव्या गोष्टी शिकावयास मिळतात. आपल्या पराजयाची कारणे शोधून ती दूर करून पुन्हा विजय प्राप्त केला जातो. यात गुरू वा प्रशिक्षकाचे सहकार्य मिळते म्हणून भारत सरकार विजयी खेळाडूला “अर्जुन पुरस्कार” देते आणि प्रशिक्षकाला ‘द्रोणाचार्य पुरस्कार” देते.

शिक्षण मनुष्याला सभ्य आणि देशप्रेमी बनविते. खेळांमुळे बंधुत्व, सहकार्य, शिस्त, निष्ठा, स्वावलंबीपणा इत्यादी गुण विकसित होतात. म्हणून जीवनात खेळांचे स्थान गौण नाही.

खेळाचे महत्व निबंध मराठी – Khelache Mahatva Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply