माणसाला भाषाच येत नसती तर निबंध मराठी – Mansala Bhashyach Yet Nasti Nibandh Marathi
बाजारात नेहमी गोंगाट असतो. वर्गातही नेहमी गोंगाट असतो. अशा वेळी वाटते की, माणसाला भाषा येत नसती, तर बरे झाले असते. सर्वत्र शांतता नांदली असती. गडबड नाहीशी झाली असती. सगळेजण एकमेकांशी फक्त खाणाखुणांनी बोलले असते.
आमच्या वर्गात नेहमी आरडाओरड होते. मग बाई दम देतात. भाषा नसती, तर बाईंनी दम दिला नसता. अरे हो! पण भाषा नसेल, तर शाळासुद्धा नसेल. मग मित्रही नसतील. मग खेळ, मौजमजाही नसेल! घरी नुसता कंटाळा येईल.
भाषा नसेल, तर पुस्तके नसतील. आपला इतिहास आपल्याला कळणार नाही. इतरांकडील ज्ञान आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे माणसाची प्रगतीच होणार नाही. बापरे! केवढा मोठा तोटा! भाषेमुळे आपण आनंद व्यक्त करतो. दुःख व्यक्त करतो. भाषा नसेल, तर भावना व्यक्त करता येणार नाहीत. आपले जीवन जनावरांसारखे बनेल. छे! छे! भाषा हवीच. भाषेशिवाय आपल्याला जगताच येणार नाही.
पुढे वाचा:
- माझ्या हातून झालेली चूक निबंध मराठी
- माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण मराठी निबंध
- माझे बाबा निबंध मराठी
- माझा आवडता छंद मराठी निबंध
- माझे गाव निबंध मराठी
- माझे कुटुंब निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझे आवडते महिने – चैत्र आणि श्रावण
- माझे आवडते फूल निबंध मराठी
- माझे आवडते फूल कमळ निबंध मराठी
- माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी
- माझे आवडते पुस्तक महाभारत मराठी निबंध
- माझे आवडते झाड निबंध मराठी
- माझी सोसायटी निबंध मराठी