Set 1: माझे आवडते पुस्तक मराठी निबंध – Maze Avadte Pustak Nibandh Marathi
Table of Contents
मी अनेक चांगली-चांगली पुस्तके वाचली आहेत. ती मला आवडलीत देखील. परंतु माझे आवडते पुस्तक आहे “पंचतंत्राच्या गोष्टी” या पुस्तकात अनेक गमतीदार आणि बोधपर गोष्टी आहेत. खूप काळापूर्वी त्यांचे लेखन करण्यात आले होते. परंतु आजही त्यातील विषय-वाचकाला बांधून ठेवतात. यातील गोष्टी लिहिणारा व्यक्ती अतिशय विद्वान होता ज्यांचं नाव होतं विष्णु शर्मा. हे पुस्तक मी एका पुस्तक –
प्रदर्शनातून पंचतंत्रातील गोष्टी मला तोंडपाठ आहेत. या गोष्टींतून पशुपक्षांच्या माध्यमातून अनेक नैतीक आणि व्यवहारीक गोष्टी समजावल्या आहेत. मानवी स्वभाव आणि निसर्गाचा एकत्रित ताळमेळ घालण्यात आलेला आहे. यातील गोष्टी खरोखरच अद्भूत आहेत.
विकत घेतलं होतं.
मनोरंजक तर आहेतच पण सोबतच शिक्षणाच्या दृष्टिने देखील यातील गोष्टींना अतिशय महत्त्व आहे. या गोष्टी वाचण्यात-ऐकण्यात मला खूप आनंद मिळतो. यातील गोष्टी नव्या जगात घेऊन जातात जिथे मानवी स्वभावाचे अतिशय सुंदर व मानसिक चित्रण शब्दबद्ध केलेले दिसते. .
Set 2: माझे आवडते पुस्तक महाभारत मराठी निबंध – Maze Avadte Pustak Mahabharata Nibandh Marathi
रामायण आणि महाभारत ही भारतातील दोन खूप प्राचीन अशी महाकाव्ये आहेत. ‘व्यासोच्छिष्टम् जगत्सर्वम ‘ हे वाक्य तर सुप्रसिद्धच आहे. त्याचा अर्थ असा की जगात जे काही ज्ञान आहे ते सर्व महर्षी व्यासांनी महाभारतात लिहून ठेवले आहे.
महाभारताच्या कहाणीला खूप पैलू आहेत. ती जणू अनेक कहाण्यांची मालिकाच आहे. ह्या सर्व कहाण्या एकात एक गुंतलेल्या आहेत. त्यातून आपल्याला मानवी स्वभावातील अनेक गुण आणि दुर्गुण दिसतात.
थोडक्यात सांगायचे तर महाभारत ही कुरू वंशाची कहाणी आहे. स्वर्गात गंगा आणि अष्टवसू ह्यांच्याकडून काहीतरी अपराध घडला तेव्हा त्यांना शाप मिळाला की तुम्हाला मनुष्यजन्म स्वीकारावा लागेल. म्हणून गंगा स्त्रीरूप घेऊन पृथ्वीवर आली. हस्तिनापूरचा राजा शंतनू ह्याने तिला पाहिले आणि तिच्या प्रेमात पडला. गंगा त्याला म्हणाली की मी जे काही करीन त्यावर तू ‘ हे का केलेस?’ असा प्रश्न विचारायचा नाहीस. शंतनूने ते मान्य केले. मग त्याच्यापासून गंगेला ओळीने सात पुत्र झाले. पुत्र जन्मला की गंगा त्याला मारून टाकत असे. तेच ते अष्टवसूंमधील सात वसू होते. आठवा पुत्र जन्मला तेव्हा मात्र शंतनूला राहावले नाही आणि त्याला मारण्यापासून त्याने गंगेला ” अडवले. तेव्हा गंगा त्या बाळाला शंतनूकडे देऊन म्हणाली की “माझा शापही आता संपला. मी पुन्हा स्वर्गलोकी जाणार.
हे बाळ मात्र तुझ्याकडे राहाणार आणि मानवी जीवनातील सगळी सुखदुःखे भोगणार.” शंतनूने त्या बाळाचे नाव देवव्रत ठेवले. पुढे शंतनूचे प्रेम कोळ्याची मुलगी सत्यवती हिच्यावर बसले तेव्हा सत्यवतीने त्याला अट घातली की माझाच मुलगा राजा झाला पाहिजे. वडिलांचे मन राखण्यासाठी देवव्रताने तिला वचन दिले की “तुझ्याच मुलाला राज्य मिळेल. एवढेच नव्हे तर मी कधीही लग्न करणार नाही त्यामुळे मला मुले होतील आणि ती तुझ्या मुलांचे राज्य घेतील अशीही भीती राहाणार नाही.” त्याने ही कठीण प्रतिज्ञा घेतली म्हणून त्याला भीष्म असे नाव पडले.
पुढे ह्या भीष्माच्या सावत्र भावाला म्हणजेच विचित्रवीर्याला धृतराष्ट्र आणि पांडू हे पुत्र होतात. त्यांची मुले म्हणजेच कौरव आणि पांडव. ह्या कौरव पांडवांची कथा म्हणजेच महाभारत. पांडवाची आई कुंती, कौरवांची आई गांधारी, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे पांडव, दुर्योधन, दुःशासन हे मुख्य कौरव, पांडवपत्नी द्रौपदी, कौरव-पांडवांचे गुरू द्रोणाचार्य, कुंतीचा लग्नापूर्वीचा पुत्र कर्ण ही ह्या कथेतील महत्वाची पात्रे असली तरी ह्यातील सर्वात महत्वाची व्यक्तिरेखा आहे भगवान श्रीकृष्ण. शेवटल्या युद्धप्रसंगी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. त्या गीतेचे सार आज हिंदू धर्माला परमवंदनीय आहे.
महाभारतातील व्यक्तिरेखा फक्त चांगल्या किंवा फक्त वाईट नाहीत. म्हणूनच त्या मानवी वाटतात. त्यांचे संघर्ष, कर्णाची अवहेलना, द्रौपदीची तडफड, कुंतीचे दुःख पाहून मन हेलावून जाते.
खरोखरच महाभारत हा एक महान ग्रंथ आहे हे अगदी निश्चित.
Set 3: माझे आवडते पुस्तक महाभारत मराठी निबंध – My Favourite Book Mahabharata Essay in Marathi
मानवाचे उद्दिष्ट आनंदप्राप्ती हे आहे. त्यासाठी तो निरनिराळ्या साधनांचा वापर करतो. चित्रपट पाहतो, गाणी ऐकतो, खेळ खेळतो, प्रवास करतो. पण या सर्वांमध्ये पुस्तकांपासून मिळणारा आनंद अवर्णनिय असतो. मला वाचनात रस आहे. माझे आवडते पुस्तक आहे ‘महाभारत’.
महाभारताची रचना महर्षि वेद व्यासांनी केली. हा ग्रंथ मूळ संस्कृतमध्ये आहे. महाभारतात एक लाख श्लोक आणि अठरा पर्व आहेत. महाभारताची मुख्य कथा कुरुक्षेत्रावरील महायुद्धाची आहे. हे युद्ध हस्तिनापूरच्या राजगादीसाठी कौरव आणि पांडवांत झाले.
कथा अशी आहे की-धृतराष्ट्र आणि पांडू हे दोघे भाऊ होते. त्यांची राजधानी हस्तिनापूर होती. धृतराष्ट्र आंधळे असल्यामुळे वयाने मोठे असूनही राज्यावर बसू शकले नाहीत. पांडूला राजा बनविण्यात आले. दुर्योधन आणि दुःशासन हे धृतराष्ट्राचे पुत्र होते. पांडूला पाच पुत्र होते-धर्म, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव. हे पाच भाऊ, ‘पांडव’ ‘ म्हणून प्रसिद्ध होते. युधिष्ठिर वयाने मोठा असल्यामुळे राज्याचा उत्तराधिकारी होता. दुर्योधनाने आपले मामा शकुनी यांच्याशी संगनमत करून पांडवांना मारायाचे अनेक वेळा प्रयत्न केले पण ते सगळे अयशस्वी ठरले. पुढे कौरवांनी पांडवांना द्यूत खेळण्यासाठी आमंत्रित केले. पांडव द्रौपदीसहित सगळे राज्य हरले. त्यांना बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात जावे लागले. वनवास संपल्यावर राज्य परत न मिळाल्या मुळे युद्धाला तोंड लागले. हे युद्ध १८ दिवस चालले ज्यात कौरव पराजित झाले.
अनेक दृष्टींनी महाभारत महत्त्वपूर्ण आहे. यात राजकीय, कूटनीती, आचार-विचार, शौर्य, रण, व्रत, पर्व, धर्म-अधर्माची चर्चा, स्त्रियांची स्थिती, समाजात त्यांचे स्थान, विवाह. शिक्षण, योग, त्याग राजधर्माचा उपदेश, मित्रत्व, शत्रुत्व आदींचे विवेचन आहे. महाभारत ही एका व्यक्तीची रचना नाही. शेकडो वर्षांत याचा विकास झाला. यातून काही सुटू नये म्हणून याचा आकार वाढत गेला. महाभारतात खूप काही लिहिले गेले. त्यासंबंधी एक म्हणच तयार झाली-‘जे यात आहे ते अन्य ठिकाणी आहे, जे यात नाही ते कुठेही नाही’,
महाभारतात भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते. ही भारतीयांची आचारसंहिता आहे. ही कौरव-पांडवांच्या संघर्षाची कथा नसून भारतीयांचे धर्मशास्त्र आहे. प्रत्येक वाचनाच्या वेळी ते नवेच वाटते. अनेक भाषांमध्ये याचा अनुवाद झाला व होत आहे. आपल्या श्रेष्ठत्त्वाची कथा हा ग्रंथ स्वतः च सांगतो म्हणून हा माझा प्रिय ग्रंथ आहे.
Set 4: महाभारत- एक थोर महाकाव्य निबंध मराठी
आपला भारत हा खूप महान देश आहे. इथं राम, कृष्ण आदि महापुरूष होऊन गेले. त्यांच्या जीवनकथा सांगणारी महाकाव्ये आज शतकानुशतकं झाली तरी गायली जात आहेत आणि ऐकलीही जात आहेत.
रामायण आणि महाभारत ही भारतातील दोन खूप प्राचीन अशी महाकाव्ये आहेत. ‘व्यासोच्छिष्टम् जगत्सर्वम् ‘ हे वाक्य तर सुप्रसिद्धच आहे. त्याचा अर्थ असा की जगात जे काही ज्ञान आहे ते सर्व महर्षी व्यासांनी महाभारतात लिहून ठेवले आहे.
महाभारताच्या कहाणीला खूप पैलू आहेत. ती जणू अनेक कहाण्यांची मालिकाच आहे. ह्या सर्व कहाण्या एकात एक गुंतलेल्या आहेत. त्यातून आपल्याला मानवी स्वभावातील अनेक गुण आणि दुर्गुण दिसतात.
थोडक्यात सांगायचे तर महाभारत ही कुरू वंशाची कहाणी आहे. स्वर्गात गंगा आणि अष्टवसू ह्यांच्याकडून काहीतरी अपराध घडला तेव्हा त्यांना शाप मिळाला की तुम्हाला मनुष्यजन्म स्वीकारावा लागेल. म्हणून गंगा स्त्रीरूप घेऊन पृथ्वीवर आली. हस्तिनापूरचा राजा शंतनू ह्याने तिला पाहिले आणि तिच्या प्रेमात पडला. गंगा त्याला म्हणाली की मी जे काही करीन त्यावर तू ‘ हे का केलेस?’ असा प्रश्न विचारायचा नाहीस. शंतनूने ते मान्य केले. मग त्याच्यापासून गंगेला ओळीने सात पुत्र झाले. पुत्र जन्मला की गंगा त्याला मारून टाकत असे. तेच ते अष्टवसूंमधील सात वसू होते.
आठवा पुत्र जन्मला तेव्हा मात्र शंतनूला राहावले नाही आणि त्याला मारण्यापासून त्याने गंगेला अडवले. तेव्हा गंगा त्या बाळाला शंतनूकडे देऊन म्हणाली की “माझा शापही आता संपला. मी पुन्हा स्वर्गलोकी जाणार. हे बाळ मात्र तुझ्याकडे राहाणार आणि मानवी जीवनातील सगळी सुखदुःखे भोगणार.” शंतनूने त्या बाळाचे नाव देवव्रत ठेवले. पुढे शंतनूचे प्रेम कोळ्याची मुलगी सत्यवती हिच्यावर बसले तेव्हा सत्यवतीने त्याला अट घातली की माझाच मुलगा राजा झाला पाहिजे. वडिलांचे मन राखण्यासाठी देवव्रताने तिला वचन दिले की “तुझ्याच मुलाला राज्य मिळेल. एवढेच नव्हे तर मी कधीही लग्न करणार नाही त्यामुळे मला मुले होतील आणि ती तुझ्या मुलांचे राज्य घेतील अशीही भीती तुला राहाणार नाही.” त्याने ही कठीण प्रतिज्ञा घेतली म्हणून त्याला भीष्म असे नाव पडले.
पुढे ह्या भीष्माच्या सावत्र भावाला म्हणजेच विचित्रवीर्याला धृतराष्ट्र आणि पांडू हे पुत्र झाले. त्यांची मुले म्हणजेच कौरव आणि पांडव. ह्या कौरव पांडवांची कथा म्हणजेच महाभारत. पांडवाची आई कुंती, कौरवांची आई गांधारी, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे पांडव, दुर्योधन, दुःशासन हे मुख्य कौरव, पांडवपत्नी द्रौपदी, कौरव-पांडवांचे गुरू द्रोणाचार्य, कुंतीचा लग्नापूर्वीचा पुत्र कर्ण ही ह्या कथेतील महत्वाची पात्रे असली तरी ह्यातील सर्वात महत्वाची व्यक्तिरेखा आहे भगवान श्रीकृष्णाची. शेवटल्या युद्धप्रसंगी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. त्या गीतेचे सार आज हिंदू धर्माला परमवंदनीय आहे.
महाभारतातील व्यक्तिरेखा फक्त चांगल्या किंवा फक्त वाईट नाहीत. म्हणूनच त्या मानवी वाटतात. त्यांचे संघर्ष, कर्णाची अवहेलना, द्रौपदीची तडफड, कुंतीचे दुःख पाहून मन हेलावून जाते.
खरोखरच महाभारत हा एक महान ग्रंथ आहे हे अगदी निश्चित.
पुढे वाचा:
- माझे आवडते झाड निबंध मराठी
- माझी सोसायटी निबंध मराठी
- माझी मावशी निबंध मराठी
- माझी मामी निबंध मराठी
- माझी महत्वाकांक्षा निबंध मराठी
- माझी दैनंदिनी निबंध मराठी
- माझी इच्छा (अभिलाषा) निबंध मराठी
- माझी आवडती भाजी निबंध मराठी
- माझा विमान प्रवास निबंध मराठी
- माझा वाढदिवस मराठी निबंध
- माझा वर्ग निबंध मराठी
- माझा मामा निबंध मराठी
- माझा भारत महान निबंध मराठी