माझे आवडते फूल निबंध मराठी – Maze Avadte Phool Essay in Marathi

फुले हा निसर्गातील दागिनाच आहे. लाल, गुलाबी, पिवळा असे फुलांचे रंग खूपच सुंदर असतात. जाई, जुई, मोगरा, अनंत अशा पांढ-या फुलांना उत्तम सुगंध असतो.

माझे आवडते फूल कुठले असा मी विचार करते तेव्हा मला बकुळीचे फूल आठवते. आमच्या गावी अंगणात बकुळीचे एक मोठे झाड आहे. त्यावर रोज हजार फुले फुलत असतात. सकाळच्या वेळेस वा-यावर उडून ती फुले जमिनीवर पडतात. ताजी फुले इवलीशी आणि पांढरी शुभ्र असतात. त्यांचा गंधही अगदी सुंदर आणि मंद असतो. बकुळीचे वैशिष्ट्य असे की इतर फुले सुकली की त्यांचा वास निघून जातो. पण बकुळीचे तसे होत नाही. बकुळीची फुले सुकली की ती पिवळट रंगाची होतात पण त्यांचा सुगंध तसाच राहातो.

गावाला आम्ही परडीत फुले गोळा करीत असू मग माडाच्या झावळीची दोरी घेऊन त्यात ती ओवून त्याचे गजरे करीत असू. एक गजरा आम्ही देवाला वाहत होतो आणि उरलेले गजरे आईला आणि काकूला देत होतो. ते गजरे केसात माळताना मला खूप आनंद होत असे.

आज बकुळीची फुले सहज मिळत नाहीत पण त्या फुलांचे नाव घेतले तरी तो सुगंध माझ्या मनात फिरू लागतो.

माझे आवडते फूल निबंध मराठी – Maze Avadte Phool Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply