माझे आवडते महिने – चैत्र आणि श्रावण – Maza Avadta Mahina Chaitra Ani Shravan Essay in Marathi

मी लहान असताना माझ्या आईने मराठी महिन्यांची नामावली माझ्याकडून पाठ करून घेतली होती. तेव्हापासून मनात ठसला तो पहिल्या क्रमांकाचा चैत्रमास! या महिन्याचा प्रारंभ होतो तोच मुळी गुढीपाडव्याने. वर्षातून एकदाच येणाऱ्या त्या गुढीच्या सोहळ्याचे मला मोठे अप्रूप आहे. वर्षाचा पहिला दिवस म्हणून जेवणात गोड पक्वान्न असतेच.

साडेतीन मुहूर्तातला हा एक शुभदिवस समजला जातो. लहानपणी दरवर्षी गुढीपाडव्याला बारसे, जायवळ, गृहप्रवेश अशा निमित्ताने कोणाकडे ना कोणाकडे जायला मिळायचे. आईच्या मैत्रिणीकडे हळदीकुंकवाचे कार्यक्रम सुरू व्हायचे. आंब्याची डाळ आणि पन्हं म्हणजे काय मजाच ! प्रभू रामचंद्र आणि रामसेवक हनुमान यांचे जन्मदिन याच महिन्यात येतात. चैत्र म्हणजे आनंदाचा ठेवाच !

चैत्रानंतर तीन महिने गेले की येणारा श्रावण महिना मला सर्व महिन्यांचा राजाच वाटतो. श्रावण आला की सणांची आणि सुट्ट्यांची लयलूट. श्रावणात उपवास, व्रतवैकल्ये यांत मोठी माणसे गढलेली असतात. या वेळी साऱ्या वातावरणातून एक आगळेच चैतन्य ओसंडत असते.

चैत्रात प्रभू रामचंद्राच्या वाढदिवसाचा सुंठवडा, तर श्रावणात कृष्ण जन्माष्टमीचा काला खायला मिळतो. गोपालकृष्णाच्या ‘हॅपी बर्थ डे’ची आगळीच धमाल श्रावण महिन्यात अनुभवायला मिळते. ‘गोविंदा आला’ म्हणून पाण्यात भरपूर खेळायचे. दहीहंडी फोडून त्यातील प्रसादासाठी भांडायचे. नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन हे श्रावणातील अत्यंत आनंदाचे सण. असा हा श्रावण वर्षातून एकदाच का येतो बरे? माझ्या मनाला चुटपूट लावणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर कोणी सांगेल का!

माझे आवडते महिने – चैत्र आणि श्रावण – Maza Avadta Mahina Chaitra Ani Shravan Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply