Set 1: माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी – My Favourite Fruit Mango Essay in Marathi

आपण वेगवेगळी फळे खातो. मला आंबा खूप आवडतो. कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरीचे लोणचे घालतात. कैरी रंगाने हिरवी असते. ती पिकल्यावर पिवळी होते. त्याला आंबा म्हणतात. कोकणात भरपूर आंबे असतात. आंब्याला ‘हापूस’, ‘पायरी’ अशी नावे असतात. आंब्यापासून आमरस बनवतात. आमरसापासून वड्या बनवतात. आंबा हा फळांचा राजा आहे.

Set 2: माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी – My Favourite Fruit Mango Essay in Marathi

दर वर्षी आम्ही मे महिन्याची आतुरतेने वाट पाहात असतो कारण मे महिन्यात आम्हाला फळांचा राजा आंबा ह्याचा मनापासून आस्वाद घ्यायला मिळतो. दर वर्षी मार्च महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहर येतो. हाच आपल्याकडचा वसंत ऋतू असतो. कोकिळांचे कुजन सुरू होण्याचा आणि कावळ्यांनी घरटी बांधायला घेण्याचा हाच ऋतू. आंब्याचा मोहर म्हणजे आंब्याच्या झाडांना येणारी फुलं. चांगला मोहर धरला की झाडांना आंबे पुष्कळ धरतात.

आमचे गाव रत्नागिरी आहे. त्यामुळे तिथे हापूसच्या आंब्यांची नुसती रेलचेल असते. मी दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे जातो. आमच्या वाडीत कलमी आंब्याची शंभर झाडे आहेत. माझे काका तिथेच राहून वाडीची देखभाल करतात. आंब्यांना फळे जरी एप्रिल आणि मे महिन्यात आली तरी त्यांची काळजी मात्र वर्षभर घ्यावी लागते. आम्ही अर्धी फळे बाजारात विकायला पाठवतो. उरलेल्या आंब्यांतील काही आंब्यांचा रस काढून त्याचे डबे तयार करणे, आंबा पोळी बनवणे, आंब्याचा जॅम बनवणे असेही उद्योग माझ्या काकांनी लहान प्रमाणात सुरू केले आहेत. आमच्या उत्पादनांच्या अस्सलपणामुळे त्यांना अगदी परदेशातही मागणी असते.

मी मोठा झालो की काकांच्या व्यवसायात मदत करायची असे मुळी आमचे ठरूनच गेले आहे. आंब्याचा आमरस हा तर अगदी अमृततुल्यच असतो. त्याशिवाय माझी आई पिकलेल्या आंब्याचा मोरंबा करते, आमरस घालून शिरा करते, पोळ्या करते. त्यामुळे आम्हा मुलांना काय बरे जेवायचे असा प्रश्नच ह्या दिवसात पडत नाही.

आमचा आंबा गेल्या वर्षीपासून युरोपमध्येही जाऊ लागला आहे. मुख्य म्हणजे त्यांच्याकडील कडक तपासणीला उतरल्यामुळे गेल्या वर्षी जसे इतरांचे आंबे परत आले तसे आमचे आंबे परत आले नाहीत.

माझे काका नेहमी म्हणतात की मार्चमध्ये येणारे आंबे कोवळे असतात. त्यांना फारशी चव नसते. त्यावर रासायनिक पावडर मारून ते पिकवले जातात. शिवाय सुरूवातीच्या काळात म्हणून त्यांचे भावही अव्वाच्या सव्वा असतात. त्यामुळे तेव्हा आंबे खाऊ नयेत. त्याऐवजी एप्रिल महिन्याच्या अखेरीस बाजारात येणारा आंबा चवीच्या दृष्टीने अगदी उत्कृष्ट असतो, त्याची किंमतही तुलनेने कमी असते

खरोखर हे अमृततुल्य फळ आपल्याला खायला मिळते ही निसर्गराजाची केवढी कृपा आहे.

Set 3: माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी – My Favourite Fruit Mango Essay in Marathi

भारतात द्राक्षे, सफरचंद, केळी, संत्री, पेरू, डाळिंब आदी अनेक प्रकारची मिळतात. ती खाल्ल्यास आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांची उणीव भरून निघते. सर्वच फळे शरीरासाठी आवश्यक असतात. पण माझे आवडते फळ ‘आंबा’ हे आहे. आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात.

भारतीय आंबे आपल्या चवीसाठी,लज्जतीसाठी, रंगांसाठी साऱ्या जगात प्रसिद्ध आहेत. आंबा उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक आहे. संपूर्ण जगातील आंबा उत्पादनाच्या ६४% आंबे भारतात उत्पादित होतात. अनेक प्रकारचे आणि चवीचे आंबे मिळतात.

उदा. दसरा, लंगडा, अल्फान्सो, आम्रपाली, नीलम, तोतापुरी, इ. भारताखेरीज मेक्सिको, व्हेनेझुएला, मलेशिया, जमैका, माली या देशांतही आंब्याचे उत्पादन होते. टॉर्मा, एटकिल, केंट, वॉटर, लिली या विदेशी आंब्यांच्या जाती आहेत. केंट आंब्याचा आकार अगदी डाळिंबासारखा असतो. आंब्याचा रंग हिरवा, पिवळा, केशरी, सोनेरी, लालसुद्धा असतो. .

उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओरिसा, बिहार, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि आसामात आंब्याचे उत्पादन होते. आंब्यामुळे भारताला भरपूर परकीय चलन मिळते. अरब राष्ट्र आणि युरोपमध्ये आंब्यांना खूप मागणी आहे.

उन्हाळा आला की, आंबा आपणास आनंदी करतो. रसाळ आंबे उन्हाळ्याच्या उष्णतेत शांती प्रदान करतात. आंबा केवळ फळ नसून ते एक घरगुती औषध पण आहे. कच्चे, पिकलेले आंबे, त्याची साल, कोय, पाने, फूल या सर्वांचा औषध बनविण्यासाठी उपयोग होतो. मी तर उन्हाळयाची वाट आतुरतेने पहातो. रस खाल्ल्याशिवाय या दिवसात जेवण अपुरे वाटते.

आंब्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनतात. उदाहरणार्थ कच्च्या वाळवून केलेला आमचूर, रस, आंब्याच्या पोळ्या, लोणचे, चटणी, पन्हे, इ. आंब्यात केरोटिन नावाचा घटक असतो, जो शरीरातील जीवनसत्त्वाची कमी पूर्ण करतो. कैऱ्या

दिल्लीला दरवर्षी आंब्याचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरते. त्यात उत्तमोत्तम आंबे व आंब्यांचे खाद्यपदार्थ असतात. यात आंब्यांचे ५०० प्रकार असतात. त्यांची विक्रीही करण्यात येते. सोबतच करमणुकीचे कार्यक्रमही असतात. आंबा खाण्याची मनोरंजक स्पर्धा पण असते. मला या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा आहे. अशा प्रकारे वर्षातील तीन महिनेच मिळणारे हे राजसी फळ माझ्याच काय सर्वांच्याच आवडीचे आहे.

Set 4: माझा आवडता वृक्ष आंबा निबंध मराठी – My Favourite Fruit Mango Essay in Marathi

आमच्या गावी अनेक झाडे आहेत. त्यापैकी काहींची तर मला नावेही माहीत नाहीत. पण वड, चिंच, आंबा, नारळ अशी अनेक झाडे माझ्या आवडीची आहेत. पण उन्हाळ्याची गंमत म्हणजे आंबा. आंबा म्हटले की तोंडाला पाणी सुटते आणि मन पळू लागते ते आंब्याच्या गार सावलीला आणि डोळे उंचावतात आंब्याच्या झाडावर.

दसरा-दिवाळीला घराला तोरणासाठी आंब्याचीच पाने लागतात. पूजेलाही आंब्याची पाने व लाकडे लागतात. आणि खरी चव तर उन्हाळ्याची आंबे खाण्यात आणि कैरीचे पन्हे पिण्यातच आहे.

आंब्यांची खूप नावे आहेत. हापूस, पायरी अशी अनेक. कोकणचा राजा म्हटले की हापूस आंबाच आठवतो. हा आंबा नुसता कोकणचा राजाच नाही तर तो फळांचाही राजा आहे. आंब्यापासून आमरसही तयार करतात. आम्रखंडही तयार करतात. म्हणूनच मला आंबा खूप आवडतो.

Set 5: माझा आवडता वृक्ष आंबा निबंध मराठी – My Favourite Fruit Mango Essay in Marathi

मी आणि माझे कुटुंब पूर्णपणे शाकाहारी आहोत. मला सर्व तहेचे फळ पसंत आहेत. अंगूर, केळी, पेरू, पपई, सफरचंद, कच्चे नारळ, चेरी, आदी सर्व फळ खायला मला खूप आवडतं. परंतु मला सर्वात जास्त आवडतो तो आंबा. अंबा फळांचा राजा आहे. याचा रंग, गंध आणि स्वाद म्हणजे एकमेकाद्वतीय.

पिकलेले अंबे फारच गोड, रसाळ, चविष्ठ आणि आरोग्यवर्धक असतात. अंबा एका विशिष्ट ऋतूमध्ये येणारं फळ आहे आणि केवळ उन्हातान्हाच्या दिवसातच उपलब्ध होतो. किती छान झालं असतं जर तो वर्षभर खायला मिळाला असता तर. अंब्याचा उपयोग अनेक प्रकारे केल्या जावू शकतो. त्याला कापून, चोखून किंवा दूधात मिसळून सेवन केल्या जावू शकते. एप्रिल महिन्यात अंबे बाजारात येतात. परंतु सुरूवातीला तो खूप महाग असतो. हळूहळू बाजारात अंबे येऊ लागतात आणि याची किंमत घसरत जाते.

अंब्याचा मुरब्बा, चटणी, लोणचे आदी बनवले जातात.त्यासाठी कैया उपयोगी पडतात. अंब्याचा अमचूर देखील बनवतात. भारतात सर्वात जास्त आणि सर्वात चांगले अंबे उत्पादीत होतात. अंब्याच्या शेकडो जाती आहेत. लंगडा, दशहरी, हाफुस, पांढरा, ठिपक्याचा, गोट्या, रसाचा आदी काही लोकप्रिय प्रकार आहेत. आंबे परदेशात पाठवले जातात. यामधून परदेशातला पैसा भारतात येता

माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी – My Favourite Fruit Mango Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply