माझ्या हातून झालेली चूक निबंध मराठी
खरे तर मी एक चांगला विद्यार्थी आहे. चुकीचे वागणे मला आवडत नाही. पण गेल्या वर्षी माझ्या हातून चूक घडली. जेव्हा मला त्या चुकीची आठवण होते, तेव्हा मला खूप वाईट वाटते.
गेल्या वर्षीचा तो दिवस. सहामाही परीक्षा चालू होती. विज्ञानाची परीक्षा होती. प्रश्नपत्रिका हातात आली. मी संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचली आणि मला घामच फुटला! बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मला आठवत नव्हती. मी खूप घाबरलो.
मी मग माझी विज्ञानाची वही गुपचूप घेतली. कोणालाही कळले नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरे वहीत बघितली आणि लिहिली. मी कॉपी केली! नंतर परीक्षेचा निकाल लागला. विज्ञान विषयात मला सर्वांत जास्त गुण मिळाले! बाईंनी माझी खूप स्तुती केली.
मला मात्र खूप वाईट वाटले. मी आईला सगळी हकिकत सांगितली. मी सत्य सांगितले, म्हणून आईला आनंद झाला. तिने सांगितल्याप्रमाणे मी बाईंना पत्र लिहिले. त्यांची माफी मागितली. बाईंनाही आनंद झाला. त्यांनी मला शाबासकी दिली.
पुढे वाचा:
- माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण मराठी निबंध
- माझे बाबा निबंध मराठी
- माझा आवडता छंद मराठी निबंध
- माझे गाव निबंध मराठी
- माझे कुटुंब निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझे आवडते महिने – चैत्र आणि श्रावण
- माझे आवडते फूल निबंध मराठी
- माझे आवडते फूल कमळ निबंध मराठी
- माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी
- माझे आवडते पुस्तक महाभारत मराठी निबंध
- माझे आवडते झाड निबंध मराठी
- माझी सोसायटी निबंध मराठी
- माझी मावशी निबंध मराठी