माझी सोसायटी निबंध मराठी – Mazi Society Nibandh Marathi

माझ्या सोसायटीचे नाव आहे सुमन सहनिवास. आमच्या सोसायटीत एकुण दहा इमारती आहेत त्यामुळे मला खेळायला पुष्कळ मित्र मिळाले आहेत.

आमची सोसायटी खूप जुनी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वीपासूनची आहे. माझे आजीआजोबा तिथे राहायला आले. त्यामुळे सगळेजण एकमेकांना चांगले ओळखतात. ते तिथे राहायला आले तेव्हा आसपास सगळी शेते होती. गावाबाहेरच होती आमची सोसायटी. पण आता ती अगदी गावातच आलेली आहे.शेते तर गायबच झालेली आहेत.

सोसायटीच्या पटांगणावर रोज सकाळी आणि संध्याकाळी आम्ही खेळतो. सोसायटीत बागसुद्धा आहे. त्या बागेत झोपाळे आणि घसरगुंडी आहे त्यामुळे तिथेही खेळायला मला खूप आवडते. सोसायटीच्या गच्चीवरून आम्ही पतंगसुद्धा उडवतो.

आमच्या सोसायटीत सार्वजनिक गणेशोत्सव होतो तसेच नवरात्रोत्सवसुद्धा होतो. त्यावेळेस वेगवेगळ्या स्पर्धा होतात. त्यात मी भाग घेतो. कधीकधी बक्षीस मिळते. सोसायटीत होणा-या नाटकातही मी भाग घेतो. आमच्यातील कलागुणांना इथे चांगला वाव मिळतो.

मला माझी सोसायटी खूप आवडते. इथे बकुळीचे आणि गुंजांचे झाडही आहे. बकुळीची फुले गोळा करून ताईला द्यायला मला खूप आवडते.

ह्या बकुळीच्या फुलांसारख्याच सोसायटीच्या आठवणीही आम्हाला नेहमीच सुगंध देत राहातील.

पुढे वाचा:

Leave a Reply