माझे आवडते झाड निबंध मराठी – My Favourite Tree Essay in Marathi

मला नारळाचे झाड खूप आवडते. कारण त्याच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग असतोच. म्हणूनच नारळाच्या झाडाला कल्पतरू असे म्हणतात.

नारळाचे उंच झाड समुद्रकिनारी वाढते. त्याला माड असेही म्हणतात. त्या झाडाला फांद्या फुटत नाहीत त्याऐवजी लांब लांब मोठी पानेच असतात. त्या पानांना झावळ्या असे म्हणतात. कोकण किंवा केरळचा किनारा ह्या माडांच्या बनामुळे केवढा हिरवागार आणि सुंदर दिसतो.

नारळापासून खोबरे मिळते. ह्या खोब-यापासून आपल्याला खोबरेल तेल मिळते. हे तेल केरळात स्वयंपाकासाठी वापरतात परंतु आपल्या इथे मात्र त्याचा उपयोग केसांसाठी होतो. त्यापासून साबण, शैंपूही बनवतात, नारळाचे खोबरे वापरून स्वयंपाक चविष्ट बनतो. नारळाचे पाणी खूप मधुर असते. त्याचे औषधी उपयोगही असल्यामुळे आजारी माणसांना शहाळ्याचे पाणी मुद्दाम शहाळ्याचे पाणी देतात.

त्याशिवाय नारळाच्या झावळ्यांचा गावाकडे घरे शाकारण्यासाठीही उपयोग होतो. नारळाच्या करवंट्यांपासून. शोभेच्या वस्तू बनवतात तसेच त्या करवंट्या जळणासाठीही वापरता येतात. नारळाच्या करवंटीवरील केसांचा उपयोग गाद्या बनवण्यासाठीही करतात. म्हणूनच तर नारळाच्या झाडाला कल्पतरू असे म्हणतात ना.

झाडे आमचे मित्र निबंध मराठी – Zade Amche Mitra Nibandh in Marathi

संत तुकारामांनी म्हटले आहे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हे किती खरे आहे. खरोखर झाडे ही आमची संपत्तीच आहे.

झाडांच्या हिरव्या पानांमध्ये हरितद्रव्य असते. त्या हरितद्रव्याच्या आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने झाडे आपले अन्न स्वतः तयार करतात. ह्या क्रियेत झाडे ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि कार्बन डाय ऑक्साईड हा वायू आत घेतात. त्यामुळे हवा आपोआप शुद्ध होते. म्हणूनच झाडांच्या जवळ गेले की आपल्याला खूप प्रसन्न आणि उत्साही वाटते ह्यामागील गुपित हेच आहे.

झाडांची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळे पावसाच्या पाण्यासोबत माती वाहून जात नाही. तसेच त्यांच्यामुळे पाणी जमिनीत मुरते. म्हणूनच पावसाळा नसतो तेव्हा विहिरींना, तळ्यांना पाणी राहाते.

झाडे आपल्याला सावली देतात, फळे देतात, घरातील सामानासाठी लाकूड देतात, रबर, डिंक, कागद, लाख इत्यादी पदार्थ झाडांमुळेच तर मिळतात. म्हणूनच झाडे ही आमची मित्र आहेत.

माझे आवडते झाड निबंध मराठी – My Favourite Tree Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply