माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्पनात्मक – Manus Amar Zala Tar Essay In Marathi
माणूस हा मर्त्य आहे.’ म्हणजे या जगात येणाऱ्या प्रत्येकाला केव्हा ना केव्हा या जगातून निघून जावे लागतेच. पण काय सांगावे? माणूस आपल्या हुशारीने कदाचित ‘अमरत्व’ प्राप्त करून घेईलही आणि मग भलेबुरे अनेक नवनवीन जटिल प्रश्न माणसापुढे उभे राहतील.
माणसे अमर झाली तर लोकसंख्या बेसुमार वाढेल. सध्या बालमृत्यूंचे प्रमाण घटले आहे आणि आयुर्मर्यादा वाढली आहे. त्यामुळे लोकसंख्या अफाट वाढली आहे. मृत्यू नसेल तर आपल्याभोवती किड्यामुंग्यांसारखी माणसेच माणसे दिसतील. त्यांत वयोवृद्ध माणसांचे प्रमाण प्रचंड असेल. म्हणजे मृत्यू टळला तरी म्हातारपण व त्याची व्यथा टळणार नाही. शरीर थकेल, गात्रे काम करू शकणार नाहीत. वार्धक्याबरोबर येणाऱ्या नाना आजारांना माणूस दूर ठेवू शकणार नाही आणि मग रात्रंदिवस मरणाचा धावा सुरू होईल.
माणसे अमर झाली तर ती सुखी होतील का? सप्त चिरंजीवांची नावे आपल्याकडे घेतली जातात; पण आज ते खरोखरच सुखी आहेत का? अश्वत्थाम्याची व्यथा आपण जाणतोच. माणसे अमर झाली तर इतिहासाची पुस्तके लिहिण्याची गरज उरणार नाही. चालतेवोलते इतिहासच आपल्याला उपलब्ध होतील. भूतकाळही वर्तमानात असेल.
माणसे अमर झाली तर ती अधिक धाडसी बनतील. कोणतेही साहस करताना त्यांना भीती वाटणार नाही. युद्ध, अपघात, चकमकी यांतून जखमींची संख्या खूपच वाढेल. मृत्यूचे भय नसल्याने कोणतेही अपकृत्य करण्यास माणूस कचरणार नाही. या साऱ्या ष्टींनी कंटाळलेला माणूस मग परमेश्वरापाशी प्रार्थना करील, ‘देवा, मला मरण हवे आहे ‘ आणि देव प्रसन्न होऊन म्हणेल, ‘तथास्तु !’ पण
पुढे वाचा:
- माणसाला भाषाच येत नसती तर निबंध मराठी
- माझ्या हातून झालेली चूक निबंध मराठी
- माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण मराठी निबंध
- माझे बाबा निबंध मराठी
- माझा आवडता छंद मराठी निबंध
- माझे गाव निबंध मराठी
- माझे कुटुंब निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझे आवडते महिने – चैत्र आणि श्रावण
- माझे आवडते फूल निबंध मराठी
- माझे आवडते फूल कमळ निबंध मराठी
- माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी
- माझे आवडते पुस्तक महाभारत मराठी निबंध
- माझे आवडते झाड निबंध मराठी