माणुसकी निबंध मराठी – Manuski Nibandh Marathi
माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकी. पण अनेक वेळा माणूस माणसासारखा वागत नाही, तो राक्षसासारखा वागतो.
आज अनेक वेळा माणसातील माणुसकी हरवलेली दिसते. तो दुसऱ्याचा अजिबात विचार करत नाही. तो इतरांना फसवतो, लुबाडतो. औषधांत भेसळ करून दुसऱ्यांचे प्राण घेतो. अतिरेकी लोक निरपराध लोकांना ठार मारतात. यांना माणूस म्हणता येईल काय?
आज कित्येक लोक जातिधर्मावरून भेदभाव करतात. ते श्रीमंतांना श्रेष्ठ व गरिबांना कनिष्ठ मानतात. भाषेवरून आपला व परका असा भेदभाव करतात. देशादेशांमध्ये युद्ध होतात. निष्पाप माणसांचे बळी जातात. ही माणुसकी नव्हे. हा माणुसकीला काळिमा आहे.
या जगातील सर्व माणसे समान आहेत. म्हणून पृथ्वीवर कोठेही माणसे भुकेली असतील, तर आपण त्यांना अन्न दिले पाहिजे. कोणत्याही आपत्तीच्या वेळी मदत करण्यासाठी आपण धावून गेले पाहिजे. तहानलेल्यांना पाणी दिले पाहिजे. भुकेलेल्यांना अन्न दिले पाहिजे. संत गाडगेबाबांनी हाच संदेश दिला आहे. हीच माणुसकी आहे.
पुढे वाचा:
- माणसे अमर झाली तर मराठी निबंध
- माणसाला भाषाच येत नसती तर निबंध मराठी
- माझ्या हातून झालेली चूक निबंध मराठी
- माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण मराठी निबंध
- माझे बाबा निबंध मराठी
- माझा आवडता छंद मराठी निबंध
- माझे गाव निबंध मराठी
- माझे कुटुंब निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझे आवडते महिने – चैत्र आणि श्रावण
- माझे आवडते फूल निबंध मराठी
- माझे आवडते फूल कमळ निबंध मराठी
- माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी
- माझे आवडते पुस्तक महाभारत मराठी निबंध