माझी मावशी निबंध मराठी – Mazi Mavshi Nibandh in Marathi

माझी मावशी मला खूप आवडते. तिचे नाव आहे सरला. ती नावाप्रमाणेच अगदी सरळ स्वभावाची आहे. ती माझ्या आईची धाकटी बहीण आहे. ती खूपच माझ्या आईसारखी दिसते.

आम्ही मुंबईला राहातो आणि मावशी गुहागरला राहाते. तिला राज नावाचा मुलगा आहे आणि रिया नावाची मुलगी आहे. मी दर मे महिन्यात मावशीच्या घरी जाते तेव्हा ती माझे खूप लाड करते.

मी एकुलती एक असल्यामुळे मला भावंड नाही. त्यामुळे राज आणि रियाशी खेळायला मला खूप आवडते.

मी मावशीकडे गेले की ती माझ्यासाठी पुरणपोळी करते. संध्याकाळी मला समुद्रावर फिरायला घेऊन जाते. गुहागरच्या चौपाटीवरची वाळू पांढरी स्वच्छ आहे. तिथे जाऊन आम्ही वाळूचा किल्ला बनवतो.

मावशीचे घर खूप मोठे, जुन्या काळचे आहे. त्या घरात बारा खोल्या आहेत. घरात तेवढी माणसे नसल्यामुळे मावशी फक्त सहाच खोल्या वापरायला उघडते. इतर खोल्यांतून आम्हा मुलांना पकडापकडी आणि धावाधावी करायला मिळते.

मे महिन्यात मावशीकडे गेले की भरपूर आंबे खायला मिळतात. मावशीच्या एका खोलीत तर हापूस आंब्याची रास रचून ठेवलेली असते. तिच्या घरी दोन गाई आणि दोन म्हशीसुद्धा आहेत. मी रियासोबत म्हशीच्या पाठीवर बसते. तरी म्हैस आम्हाला काहीही करीत नाही. ते मला अगदी अद्भूतच वाटते.

मावशीच्या घरी गेले की अगदी खूप बागडायला आणि मस्ती करायला मिळते म्हणून माझी मावशी मला आवडते.

माझी मावशी निबंध मराठी – Mazi Mavshi Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply