मी अवकाशात गेलो तर निबंध मराठी

‘ यंदा दिवाळीच्या सुट्टीत सहलीला कोठे जायचे याबद्दल चर्चा चालली होती, तेवढ्यात छोट्या मिंटूने आपले मत मांडले, ‘यंदा आपण अवकाशात जाऊ या.’ सर्वांना हसू आले, पण मी विचार करू लागलो, ‘मी अवकाशात गेलो, तर.

…तर किती मजा येईल. मला दूरचित्रवाणीवर प्रसिद्धी मिळेल. मी अवकाशात गेलो, तर मी वजनविरहित होऊन तरंगू लागेन. अवकाशात दररोज आंघोळीची कटकट नाही. केवळ स्पंज केला की झाले काम! भरपूर मोकळी जागा, मनाला लागेल तेवढ्या उड्या माराव्यात.

मी अवकाशात गेलो, तर तेथून आपल्या पृथ्वीचे दर्शन घेईन. मी माझ्या कॅमेऱ्यातून तिचे हवे तेवढे फोटो काढीन. आपला गाव, आपले घर, आपली शाळा तेथून कशी दिसेल, हे पाहीन.

अवकाशात गेल्यावर मला चांदोबाही जवळून पाहता येईल. मंगळ, यांना भेट देता येईल. शनीचेही जवळून दर्शन घेता येईल. पण हो, अवकाशात जमीन नसेल. तेथे तरंगतच हिंडावे लागेल… आणि एखादे वेळी अवकाशयान नादुरुस्तच झाले तर? बाप रे! मग कुठल्या कुठे फेकला जाईन! पृथ्वीवर परत येऊच शकणार नाही! नको रे बाबा! ते अवकाशात जाणेच नको!

मी अवकाशात गेलो तर निबंध मराठी

पुढे वाचा:

Leave a Reply