Set 1: मी पंतप्रधान झाले तर निबंध मराठी – Mi Pradhanmantri Zalo Tar Nibandh Marathi
जर मी पंतप्रधान झाले तर ही कल्पनाही हृदयाला आनंदाचा शहारा आणणारी आहे. पण मनाला मोहवणारी आहे. तितकीच बुद्धीला चालना देणारी आहे. देशाची पंतप्रधान म्हणजे सर्वोसर्वा त्यामुळे जबाबदारीही तितकीच त्यामुळे पुर्ण देशाच्या विकासाचे भविष्याचे प्रश्न सोडवण्यात आयुष्य सार्थकी लागणार परंतु मी जर पंतप्रधान होईन तर माझा ओढा सतत गरिबांच्या कल्याणाकडेच असेल. देशाचे हित अहित पाहूनच मी पुढचे पाऊल उचलेन. देशातील सर्वजातीधर्माच्या लोकांसाठी सर्वसमभाव असेल त्यांच्याशी मी तितक्याच निष्ठेने वागेन प्रामाणिक, होतकरु अशा तरुणांना उद्योग धंदयासाठी कर्ज, शिक्षण पुरवीन देशातील सर्व नागरिकांना साक्षर बनवण्याचा पाहिला प्रयत्न असेल. जर देशातील सर्व नागरिक साक्षर बनले तर निरनिराळे तंत्रज्ञान वापरुन देशाचा विकास करण्यास हातभार लावतील.
लोकांना कारखाने काढण्यासाठी प्रोत्साहन देऊन बेकारी व बेरोजगाराचा प्रश्न आपसूकच सूटेल. नवनवीन शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांना आर्थिक साहाय्य पुरवीन ठिकठिकाणी प्रचारात्मक भाषणे करुन लोकांना साक्षरतेचे महत्त्व पटवून देईन. सामाजिक समता प्रस्थापित करेन खेड्यातील लोकांना त्यांच्या शेतीविषयक गरजा पुरवून त्यांना खाद्यान्न पिकविण्यात सहाय्य करेन, प्रोत्साहन देईन.
निरनिराळ्या यंत्रांची आयात करुन जास्तीत जास्त उत्पादन वाढण्याचा माझा कल असेल. आपला देश विकसनशील न होता विकसित करण्याचा प्रयत्न असेल. गरीब श्रीमंत हा भेदभाव न राहता सर्वांना विकासाची संधी देईन देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अविरत झटेन जेणेकरुन देशातील गरीबी दारिद्र्य हटवण्यास मदत होईल. देशात सुजाण नागरिक वसतील व देश खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम बनेल व जगाच्या नकाशात एक वेगळ्या प्रकारे ठसा उमटवू शकेल.
Set 2: मी पंतप्रधान झाले तर निबंध मराठी – Mi Pradhanmantri Zalo Tar Nibandh Marathi
भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचा सोहळा पाहिला आणि मनात आले की, मी पंतप्रधान झालो, तर …
तर काय मजा येईल ! पण खरेच मजा येईल का? पंतप्रधान म्हणजे मोठा बंगला, सुंदर मोटारी, भरपूर जगप्रवास, अनेक सभासमारंभांत प्रचंड स्वागत. सदा सभोवती रक्षक व सेवक.
पण … पण खरे सांगू का ! मी पंतप्रधान झालो तर प्रथम सारा डामडौल कमी करीन. आपल्या भारतावर जागतिक बँकेचे केवढे कर्ज आहे ! मोठमोठ्या योजना पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा हवा, आम्ही मंत्रिमंडळातील लोकांनी आपले खर्च कमी केले तर खूप बचत होईल.
मी पंतप्रधान झालो, तर… प्रथम सभांना व घोषणांना बंदी घालीन. प्रत्यक्ष ‘कृतीवर’ माझा भर असेल. गरिबी हटवण्याचा संकल्प आम्ही कित्येक वर्षांपूर्वी सोडला आहे; पण गरिबी तसूभरही हटलेली नाही. उलट वाढतच आहे. ती दूर करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन.
आज देशात अराजक वाढत आहे. देशवासीयांत एकात्मता व ज्वलंत राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी मी अविरत झटेन. मी कोणा एका राज्याचा विचार करणार नाही, तर संपूर्ण भारताचाच सदैव विचार करीन. त्याच्या विकासासाठीच झटेन, पण त्यासाठी मी पंतप्रधान व्हायला पाहिजे ना?
पुढे वाचा:
- मी ढग झालो तेव्हा निबंध मराठी
- मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध
- मी कोण होणार निबंध मराठी
- मी अवकाशात गेलो तर निबंध मराठी
- मानवाधिकार निबंध मराठी
- माणुसकी निबंध मराठी
- माणसे अमर झाली तर मराठी निबंध
- माणसाला भाषाच येत नसती तर निबंध मराठी
- माझ्या हातून झालेली चूक निबंध मराठी
- माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण मराठी निबंध
- माझे बाबा निबंध मराठी
- माझा आवडता छंद मराठी निबंध
- माझे गाव निबंध मराठी
- माझे कुटुंब निबंध मराठी