मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध – Mi Doctor Jhalo Tar Nibandh Marathi

अरे हो, मला डॉक्टर व्हावेसे वाटते. माझ्या वडिलांनासुद्धा मी डॉक्टर व्हावे असेच वाटते.

एकदा मी आजारी पडलो. आई मला दवाखान्यात घेऊन गेली. तिथे रोग्यांची गर्दी होती. डॉक्टर एक एक रोग्याला बोलावून रोग्यांना तपासत होते. मग त्यांना औषध देत होते. रोगी आनंदित होऊन जात होते. त्या दिवशी डॉक्टरांच्या प्रेमळ स्वभाव व सेवाभावं ह्या गोष्टीचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. आणि तेव्हापासूनच माझ्या मनात डॉक्टर होण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणूनच मी आतापासून खूप अभ्यास करतो.

डॉक्टरचा समाजाकरिता फार उपयोग आहे. तो रोग्याची सेवा करतो. म्हणून मी डॉक्टर होऊन लोकांची सेवा करीन. मी माझ्या रोग्यांना चांगली सेवा देईन व त्यांच्याशी चांगला व्यवहार करीन. मी त्यांचा रोग चांगल्या प्रकारे तपासून व सावधानीने त्यांना औषधोपचार करीन आणि गरीबांना फ्री तपासणी ठेवीन. अशा प्रकारे डॉक्टर होऊन लोकांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे.

मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध – Mi Doctor Jhalo Tar Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply