Set 1: मी कोण होणार निबंध मराठी – Mi Kon Honar Essay in Marathi

आम्हा लहान मुलांना मोठे बनण्याची खूप घाई झालेली असते. मोठ्या माणसांचे फार चांगले आहे, त्यांना अभ्यास करावा लागत नाही असे आम्हाला वाटत असते.

परंतु मोठेपणी कुणीतरी बनायचे असेल तर लहानपणी अभ्यास करावाच लागतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर मला मोठे होऊन डॉक्टर बनावेसे वाटते. पण मी अभ्यासच केला नाही तर डॉक्टर बनणे शक्य आहे का?

मला डॉक्टर बनावेसे वाटते कारण मला मानवजातीची सेवा करण्याची इच्छा आहे. एखाद्या आजारी माणसाच्या आजाराची कारणे शोधणे आणि त्याचा आजार बरा करणे ह्यासारखे दुसरे सुख नसेल असे मला वाटते.

डॉक्टर हा लोकांना देवासारखा वाटतो कारण तो त्यांचे प्राण वाचवतो. म्हणून समाजातही डॉक्टरांना खूप मान आहे. मात्र डॉक्टर झाले तर रोग्यासाठी कधीही धावून जावे लागते, त्या वेळेस स्वतःचे घरदार, घरातल्या लोकांना दिलेला वेळ हेसुद्धा कधीकधी विसरावे लागते. रोग्याचे प्राण हे फार महत्वाचे असतात. आपल्या देशातील खेड्यात वैद्यकीय सोयी नसतात. त्यामुळे मला खेड्यात जाऊन लोकांची सेवा करावी असे वाटते.

हे सर्व करण्याची मला इच्छा आहे आणि तयारीही आहे म्हणून मला डॉक्टर व्हावेसे वाटते.

Set 2: मी कोण होणार निबंध मराठी – Mi Kon Honar Essay in Marathi

माझी आई म्हणते मी डॉक्टर होणार. माझे बाबा म्हणतात मी इंजिनीयर होणार. पण नाही हं. मी मात्र सैनिकच होणार.

देशसेवा करायची असेल तर सैनिकच व्हावे लागेल. सैनिकांचे संचलन, त्यांचा पोशाख, आणि खांद्यावर बंदूक ! काय आकर्षक दृश्य दिसते ते!

देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करावे, शत्रूपासून देशाला वाचवावे हेच त्यांचे ध्येय असते. जीवाची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करण्यासारखी दुसरी सेवा कोणती असेल बरे ?

मी सैनिक झालो तर मातृभूमीचे रक्षण करण्याचे काम मला करता येईल. त्यासाठी लहानपणापासूनच नियमितपणे व्यायाम करून शरीर बळकट करीन. सैनिकाला थंडी-वारा, बर्फ व कडक उन्हाचा सामना करावा लागतो. म्हणून त्याचाही मी सराव करीन. मातृभूमीची सेवा करण्यासाठी तन-मन-धन अर्पण करीन. आणि म्हणून तर मला सैनिकच व्हायला आवडेल.

मी कोण होणार निबंध मराठी – Mi Kon Honar Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply