Set 1: संत ज्ञानेश्वर मराठी निबंध – Sant Dnyaneshwar Essay in Marathi

संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचे महान वैभव. मराठी साहित्यातील महान तत्त्वज्ञ कवी. त्यांचा जन्म इ. स. १२७५ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठठलपंत कुलकर्णी होते. संत निवृत्तिनाथ हे त्यांचे वडील बंधू. संत सोपानदेव व संत मुक्ताबाई ही त्यांची लहान भावंडे. या चारही भावंडांचा समाजाने अतोनात छळ केला.

समाजाने ज्ञानदेवांना छळले. पण ज्ञानदेवांनी सदैव समाजाच्या हिताचाच विचार केला. संस्कृतमधील ‘भगवद्गीता’ या महान ग्रंथाचा भावार्थ त्यांनी मराठीत समजावून सांगितला. यालाच ‘भावार्थदीपिका’ किंवा ‘ज्ञानेश्वरी’ म्हणतात.

संत ज्ञानेश्वरांनी लोकांना परमेश्वरभक्तीचा अत्यंत सोपा मार्ग दाखवला. साधे नामस्मरण हासुद्धा भक्तीचा मार्ग आहे, हे त्यांनी दाखवून दिले. त्यासाठी त्यांनी ‘वारकरी पंथा’ ची स्थापना केली. समाजातील सर्व स्तरांतल्या लोकांना त्यांनी वारकरी पंथात आणले.

‘अमृतानुभव’, ‘चांगदेव पासष्टी’ व ‘हरिपाठाचे अभंग’ या ग्रंथांचीही संत ज्ञानेश्वरांनी रचना केली. त्यांनी इ. स. १२९६ मध्ये आळंदी येथे समाधी घेतली.

Set 2: संत ज्ञानेश्वर मराठी निबंध – Sant Dnyaneshwar Nibandh Marathi

संत ज्ञानेश्वर हे महान संत तेराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांचा जन्म पैठणजवळील आपेगाव येथे झाला. त्यांचे पिता विठ्ठलपंत कुळकर्णी ह्यांनी पत्नी रूक्मिणीबाईला न विचारता संन्यास घेतला होता म्हणून त्यांच्या गुरूंनी त्यांना पुनश्च संसार करण्याची आज्ञा दिली. संसारात पडल्यानंतर त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाली. संन्यास घेऊनही संसारात आले म्हणून सर्व समाज त्यांची हेटाळणी करू लागला त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या मातापित्यांनी आत्महत्या केली. परंतु मागे उरलेल्या चार मुलांचीही लोक ‘संन्याशाची मुले’ म्हणून टवाळी करू लागले.

म्हणून मग ही मुले पैठण येथे गेली. ज्ञानेश्वरांची विद्वत्ता पाहून तिथले लोक खूप प्रभावित झाले.

निवृत्तीनाथ हे थोरले बंधूच ज्ञानेश्वरांचे गुरू होते. त्यांनी ज्ञानेश्वरांना आज्ञा दिली की तुम्ही मराठीमध्ये गीतेवर एक ग्रंथ लिहा. त्यानुसार ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला. आजही ह्या ग्रंथाचे पठण महाराष्ट्रातले लोक भक्तिभावाने करतात.

ज्ञानेश्वरांनी पुष्कळ अभंग, भारूडेही लिहिली. त्यांची पंढरीच्या पांडुरंगावर नितांत भक्ती होती. आजही पंढरीचे वारकरी ‘ज्ञानबा तुकाराम’ असा गजर करीतच पंढरीची वारी करतात.

Set 3: संत ज्ञानेश्वर वर निबंध – Essay on Sant Dnyaneshwar in Marathi

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले.

संतांच्या शिकवणूकीमुळे लोकांच्या मनातील अंधश्रद्धा व वाईट भावना नष्ट झाल्या.

संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी संन्यास घेतल्यामुळे ज्ञानेश्वरांना व त्यांच्या भावंडांना लोक सन्याशांची पोरे असे हिणवत असत. संत ज्ञानेश्वरांचे गुरू त्यांचे भाऊ निवृत्तीनाथ होते. सर्व जग सुखी व्हावे, सर्वत्र प्रेममय वातावरण असावे म्हणून त्यांनी उपदेश केला. आपल्या ज्ञान व योग सामर्थ्याने त्यांनी अनेक चमत्कार करून दाखवले. रेड्याच्या तोंडातून वेद वदवून घेतले, भिंत चालवून दाखवली, मुक्ताबाईने केलेले मांडे पाठीवर भाजले. या सर्व चमत्कारातून त्यांनी लोकांना समता व बंधूता यांची शिकवण दिली.

परंतु मुक्ताबाईच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली.

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध – Sant Dnyaneshwar Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply