श्रावणातील गमती जमती निबंध मराठी – Shravanatil Gamti Jamti Essay in Marathi

‘श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे’ असा हा हरितश्रावण फार फसवा असतो. ऊन पडले आहे म्हणता म्हणता पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागतात. परंतु हा श्रावण पक्ष्यांचा राजा मोर यांस डौलदार पिसारा फूलवून नृत्य करण्यास आव्हान करतो. पावसाच्या धारा येवू लागल्या की मोराला थुई थुई नाचायला प्रोत्साहन चढते. पिसारा फुलवून नाचताना त्याची छबी मनोहारी दिसते. श्रावणात वेली, वनस्पतींना वेगळीच पालवी फोला असते. जसे काही नववधूचा वेशच. धरणी हिरव्या मखमलींचा साज अंगावर ल्यालेल्या हरितवसना नववधूच्या तोऱ्यात डौल दाखवते. फळाफुलांनी वृक्षलता बहरुन येतात. पिवळी व जीर्ण पाने झडून जातात व हरिव्या लेण्यांचा साज चढवतात. गवते आपली पिवळी कात टाकून हरित वस्त्रे परिधान करतात. वातावरणात प्रसन्नता येते. मृगसरी बरसून जाताच खग आपले इवलाले पंख झटकून पिलांसाठी चारा आणायला घरट्याबाहेर झेपावतात.

‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा’ सारखी बालगीते गुणगुणत रिमझिम सरी अंगावर घेत आबालवृद्ध पावसात चिंब भिजतात व आनंदाने उड्या मारतात. कार्यालयात जाणारे लोक छत्र्या व पिशव्या सांभाळत, ऑफीस गाठण्याचा प्रयत्न करत असतात. रस्त्यातच वर्षाराणी बरसू लागली की त्यांना पळता भूई थोडी होते टपोरे थेंब अंगोवर झेलत त्यांना पळताना पाहून कोण मजा येते! असा हा श्रावणमास लहानथोर वृद्धबालके यांच्या आवडीचा महिना आहे. कारण पाऊस पडताच सर्वांना गरम गरम भजी व चहा यांची मेजवानी मिळते आणि विद्यार्थीवर्गाला मुसळधार पावसामुळे शाळेला सुट्टी मिळते.

शेतकरी लोक मात्र या ऋतुची या महिन्याची आतुरतेने वाट पहात असतात कारण त्यांना शेतातील बरीच खोळबलेली कामे पूर्ण करायची असतात. श्रावणात सण आणि सुट्यांची मुबलकता असते. निरनिराळ्या सणांचे निराळे महत्व असते. त्यामुळे स्त्रिया मुलींना या सणांत नवीन वेश, अलंकाराने मिरवायची संधी मिळते. सर्व मुलामुलींना, स्त्रीपुरुषांना आनंद देणारा हा श्रावण सर्वांना प्रिय असतो, सर्व बाबतीत सुखावणारा असतो. परंतु ओल्या हवेमुळे व चिखलामुळे निरनिराळे कीडे कीटक व कृमजीवींचा उपद्रव होतो. जागोजागी तळी साचून त्यात ‘डराव- डराव’ करत बेडूक वास्तव्य करतात. मुले कागदांच्या होडया तळयात सोडून आनंद मिळवतात असा हा श्रावण ऊन पावसाचा लपंडाव खेळत आनंद देतो. या महिन्यात हिंदू सणांची रेलचेल असते. निरनिराळे फराळाचे पदार्थ खायला मिळतात.

पुढे वाचा:

Leave a Reply