Set 1: संगणक शाप की वरदान मराठी निबंध – Sanganak Shap Ki Vardan Nibandh in Marathi

“राजूऽऽऽ, आधी तो कॉम्प्युटर बंद कर आणि अभ्यासाला बस. नाही तर घरातून कॉम्प्युटर काढून टाकणार!” आईने अशी तंबी दिल्यावर मी भानावर आलो. संगणक पटकन बंद केला. अभ्यासाला बसलो. पण माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले.

संगणकावर अनेकांचा राग आहे. तो योग्यही आहे. खूप वेळ संगणकावर काम करत राहिल्यास डोळे खराब होतात. संगणकावर खेळ खेळण्यात मुले खूप गुंग होतात.

त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होत नाही. मुले बाहेर खेळायला जात नाहीत. संगणकामुळे नोकऱ्या कमी होतात, असेही काही लोक सांगतात. त्यामुळे संगणक हा शाप आहे, असे लोकांना वाटते.

मात्र, नीट विचार केला, तर संगणक वरदानच आहे, हे लक्षात येईल. संगणकावर वेगाने लेखन करता येते. चित्रे काढता येतात. गणिते सोडवता येतात. सर्व विषयांचा अभ्यास करता येतो. पुस्तक लिहून छापता येते. इंटरनेटमुळे वाटेल त्या विषयावरील वाटेल ती माहिती मिळते. इंटरनेटच्या साहाय्याने कितीही दूरच्या व्यक्तीशी संपर्क साधता येतो. इंटरनेटमुळे तिकिटांचे आरक्षण करता येते. घरबसल्या तिकिटे काढता येतात. किती फायदे सांगावेत? म्हणून संगणक हा वरदानच आहे!

Set 2: संगणक शाप की वरदान मराठी निबंध – Sanganak Shap Ki Vardan Nibandh in Marathi

संगणक आज मानवजातीचा मित्र म्हणून प्रत्येक घरात निवासत आहे. ज्यांना संगणक विकत घेणे परवडत नाही ते संगणक शिकण्यासाठी ‘कोचिंग क्लासेस’ लावतात व संगणकाशी मैत्री साधतात. प्रत्येक शाळेत ‘कॉम्प्युटर’ हा विषय सक्तीचा झाला आहे. आजचे युग संगणकाचे युग आहे. घरी, दारी, नोकरीत, कार्यालयांत, बँकांत, रेल्वे स्थानक, रुग्णालय या सर्व क्षेत्रांत संगणकाला पर्याय नाही. अनेक लोकांची कामे एक संगणक करतो.

सुमारे पन्नास वर्षापूर्वी संगणक जेव्हा तयार झाला तेव्हा ते एक प्रचंड धूड होते. पण आज ते वेगवेगळ्या रुपात मिळते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. लॅपटॉप, कॅरीअवे पॉकेट डायरीप्रमाणे अत्यंत हलके आहेत. संगणक फक्त आकडेमोडच करत नसून वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी, घरगुती हिशोब ठेवण्यासाठी, वैदयकीय पेशातील सर्व व्यवहारात संगणक उपयोगी आहे. चित्रपटाची ध्वनीफीत टाकुन गाणी, चित्रपट पाहू शकतो, निरनिराळे आलेख, बातम्या, प्रकल्प आपण काढू शकतो. संगणकाच्या अभूतपुर्व क्रांतीमुळे जगाचे चित्र इतक्या झपाट्याने बदलत आहे की भविष्यकालीन समाजाचे स्वरुप काय राहिल, ही मानवजातीची यात्रा कुठे संपेल काही सांगता येत नाही. पण संगणक आपल्याला ज्याप्रमाणे फायद्याचे आहेत तसेच नुकसानकारक ही आहेत याची अनेक निरनिराळी कारणे आहेत.

प्रथम कारखान्यात व कंपनीत संगणकाचा उपयोग केल्यामुळे बहुतेक कामगार बेरोजगार झाले आहेत. इंटरनेट द्वारा जगातील कानाकोपऱ्याची माहिती अचूक ज्ञान मिळाल्यामुळे पुस्तक वाचून स्वअभ्यास करण्याची वृत्ती कमी होत आहे. हल्ली आपले जीवन घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालते त्यामुळे वेळ वाचविण्यासाठी सर्रास संगणकाचाच वापर होतो. एवढेच नव्हे तर डॉक्टर सुद्धा आपली दुखणी, लक्षणे व त्यावरील उपाय संगणकातुन माहिती काढुन लगेच पुढे ठेवतात. गतीचे जीवन जगण्यासाठी अन्न, पाणी या प्रमाणे संगणकही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

संगणक शाप की वरदान मराठी निबंध – Sanganak Shap Ki Vardan Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply