शवासन मराठी माहिती – Shavasan in Marathi
Table of Contents
शवासन म्हणजे काय?
शवासन या आसनात शरीराची कोणतीही हालचाल होत नाही आणि शरीर मृतदेहासारखे दिसते म्हणून या आसनास शवासन म्हणतात.
शवासन करण्याची पद्धत
पाठ जमिनीला टेकवून चटईवर पडा. शरीर सैल सोडा. हात शरीरालगत पसरून तळव्याची दिशा आकाशाकडे असू द्या. डोळे बंद करा. श्वासोच्छवास सामान्य ठेवा.
- दोन सेकंद डोळे बंद करा. दोन सेकंद डोळे उघडा. ही उघड-झाप 3 वेळा करा.
- डोळे उघडा. वर, खाली आणि नंतर समोर पाहा. डावीकडे, उजवीकडे आणि नंतर समोर पाहा. नंतर डोळे बंद करा. ही क्रिया 3 वेळा करा.
- आता तोंड जास्तीत जास्त उघडा. जीभ तोंडात फिरवा आणि जिभेचा शेंडा नरड्यापर्यंत आणून तोंड 10 सेकंद बंद करा. तोंड उघडून जीभ पूर्वस्थितीत आणा. ही क्रिया 3 वेळा करा.
- डोळे बंद करा. उगवत्या सूर्याकडे तुम्ही पाहत आहा अशी कल्पना करा. सूर्यकिरणे तुमच्या डोक्यात शिरून शरीराच्या सर्व अवयवात खालीलप्रमाणे प्रवेश करीत आहेत अशी कल्पना करा.
- डोके, शरीराचा उजवा भाग, उजवी तंगडी, पायाचा अंगठा, दुसरे-तिसरे, चौथे, पाचवे बोट, पाचही बोटे एकत्र, पंजा, तळपाय, टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी, पुठ्ठा, कंबर, पोटाचा उजवा भाग, छातीचा उजवा भाग, उजवा बाहू, उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी, मधले बोट, अनामिका, करंगळी, उजव्या हाताची सर्व बोटे एकत्र, तळहात, मनगट, कोपर, उजवा खांदा, याच क्रमाने शरीराच्या डाव्या भागातील अवयवांवर लक्ष केंद्रित करा.
- त्यानंतर मान, डोक्याचा मागचा भाग, डोक्याचा वरचा भाग, केस, कपाळ, उजवी व डावी भुवई, उजव्या व डाव्या पापण्या, उजवे व डावे डोळे, उजवे व डावे गाल, उजवा व डावा कान, नाक, उजवी व डावी नाकपुडी, तोंड, वरचा व खालचा ओठ, खालचा व वरचा जबडा, दात, जीभ, हनुवटी, नरडे, उजवे व डावे फुफ्फुस, हृदय, अन्ननलिका, उदर आणि शेवटी बेंबीवर लक्ष स्थिर करा.
- बेंबीवर शक्य तितके जास्त वेळ स्थिर व्हा. नंतर फूल किंवा आवडत्या वस्तूवर लक्ष केंद्रित करा. या स्थितीत 5 ते 10 मिनिटे लक्ष केंद्रित करा.
शवासन करताना घ्यायची काळजी किंवा सावधगिरी
शेवटच्या अवस्थेत बऱ्याच वेळा झोप येण्याचा संभव असतो. मात्र झोपू नका.
शवासन फायदे मराठी
- रक्तदाबाच्या रुग्णाकरिता हे फार उपयुक्त आसन आहे.
- घबराट, मानसिक तणाव, अस्वस्थता, फुफ्फुस, हृदय, जठर यातील विकारांत शवासन फार उपयुक्त आसन आहे.
- अशक्तता वाटते आणि थकवा येतो त्यांना या आसनामुळे तरतरी येते. प्रत्येक आसनानंतर 5 सेकंद शवासन करावे. ज्यांना योगासने, ध्यान आणि प्राणायाम एकाच बैठकीत करावयाचा असेल त्यांनी सुरुवातीस आसने, नंतर ध्यान आणि शेवटी प्राणायाम करून शवासन करावे.
शवासन विडिओ मराठी
अजून वाचा:
- शीर्षासन मराठी माहिती
- पवनमुक्तासन मराठी माहिती
- सर्वांगासन मराठी माहिती
- भुजंगासन मराठी माहिती
- शलभासन मराठी माहिती
- मयूरासन मराठी माहिती
- धनुरासन माहिती मराठी
- अर्धमच्छेंद्रासन मराठी माहिती
- मत्स्यासन मराठी माहिती
- योग मुद्रा (योगमुद्रासन) मराठी माहिती
- पद्मासन माहिती मराठी
- ध्यान कसे करावे
- योगासन करताना कोणती काळजी घ्यावी
- योगाचे फायदे