Set 1: भारतीय शेतकरी निबंध मराठी – Farmer Essay in Marathi

शेतकऱ्याला अन्नदाता असे म्हणतात. शेतकरी शेतात काम करतो. तो खेड्यात, लहान गावात राहतो. भारतात बरेच शेतकरी आहेत. शेतकरी साधा पोशाख घालतो. तो पहाटे लवकर उठतो. बैलांना चारा घालतो व शेतावर काम करतो. तो ऊन, पावसाची पर्वा करत नाही. तो सतत शेतावर राबत असतो. तो शेतात वेगवेगळी पिके पिकवितो. तसेच विविध भाज्याही पिकवतो. तो गाई, म्हशी, बैल पाळतो. त्याच्या घरातील मंडळी त्याला कामात मदत करतात.

Set 2: एक भारतीय शेतकरी निबंध मराठी – Farmer Essay in Marathi

भारत हा खेड्यांचा देश आहे. बहुतेक लोक शेतकरी आहेत. सर्व शेतकरी खूप गरीब आहेत. महादू हा एक असाच शेतकरी आहे. तो खूप गरीब आहे. तो एका दूरच्या खेड्यात राहतो.

महादूचे घर अगदी लहान व साधेसे आहे. तो व त्याची पत्नी दिवसभर कष्ट करतात. महादू सकाळी उठतो व न्याहरी करतो. मग गुरांना चरायला घेऊन जातो. त्याची पत्नी स्वयंपाक करते; घरात पाणी भरते आणि मग गोठा स्वच्छ करते. गुरे चरत असताना महादू शेतीची दुसरी कामे करतो. पावसाळ्यात त्याला दिवसभर शेतातच काम करावे लागते.

महादूला दोन मुले आहेत. ती शाळेत जातात. गावात प्रवासाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकदा पायीच प्रवास करावा लागतो. गावात डॉक्टर नाही. त्यामुळे महादूला आजारपणात खूप त्रास होतो. महादू गरीब आहे त्यामुळे तो मुलांना वारंवार नवीन कपडे घेऊ शकत नाही. तरी तो व त्याचे कुटुंबीय आनंदात राहतात.

Set 3: शेतकरी निबंध मराठी – Farmer Essay in Marathi

माणूस खूप पूर्वी भटक्या स्थितीत होता. तेव्हा तो शिकार करीत असे. नंतर त्याला शेतीचा शोध लागला तेव्हा तो एका जागी स्थिर झाला आणि त्याचा भटकेपणा संपला. शेतीसाठी पाणी आवश्यक असल्याने नद्यांच्या काठी शेती सुरू झाली आणि मानवी संस्कृती बहराला आली.

भारत हा प्रामुख्याने शेतीप्रधान देश आहे. येथे मोसमी पाऊस पडतो त्यामुळे ठराविक काळातच शेती करता येते. वर्षभर शेतीला पाणीपुरवठा व्हावा म्हणून सरकारने खूप धरणे बांधलेली आहेत. त्याशिवाय पाटबंधारे बांधून आणि पाणी जिरवून बारमाही पाणी मिळावे ह्यासाठी प्रयत्न चालले आहेत.

भारतात १९७६ सालानंतर हरितक्रांती करण्यात आली. उत्तम बियाण्याचा वापर, रासायनिक खते आणि जंतुनाशके ह्यांच्यामुळे शेतीचे उत्पादन खूप वाढले. परंतु रासायनिक खतांचे आणि जंतुनाशकाचे वाईट परिणामही आता दिसू लागलेले आहेत.

विदर्भात आणि देशाच्या काही भागात शेतीतून उत्पन्न पुरेसे न मिळाल्यामुळे शेतक-यांना कर्ज घ्यावे लागते. त्या कर्जाची फेड न करता आल्यामुळे काही शेतक-यांनी आत्महत्यासुद्धा केल्या. हे योग्य नव्हे.

शेतमालाला रास्त भाव आणि घाम गाळणा-याला दाम हे झाले तरच शेतकरी सुखी होईल.

Set 4: एक भारतीय शेतकरी निबंध मराठी – Farmer Essay in Marathi

आपला भारत कृषिप्रधान देश आहे. गांधीजींनी ते ओळखले होते आणि म्हणूनच ‘खेड्यांकडे चला’ असा संदेश दिला होता.

आपल्या देशातील ७० टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून असते. हा शेतकरी आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ पिकवतो परंतु ह्या आपल्या अन्नदात्याची स्वतःची परिस्थिती कशी आहे? आज विदर्भातील शेतकरी आत्महत्या का करतात? शेतकरी बिचारा गरीब पण त्यांच्या कष्टाचे धान्य विकून मधले दलाल आणि अडते मालामाल का? ह्या प्रश्नांचे उत्तर कुणीच देत नाही.

आपल्या देशात १९७५ सालानंतर हरित क्रांती झाली. त्यामुळे दर एकरी पिकांचे उत्पन्न वाढले. ह्या हरित क्रांतीसाठी शास्त्रीय बीबियाणे, रासायनिक खते आणि रासयानिक जंतुनाशके वापरली गेली. परंतु त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला. शिवाय ही हरित क्रांती फक्त पंजाबसारख्या क्षेत्रात आणि जिथे कायम पाण्याची सोय आहे अशा क्षेत्रातच यशस्वी झाली आहे.

सर्वसामान्यतः मौसमी पावसावरच भारतीय शेतक-यांना अवलंबून राहावे लागते. पाऊस पडला नाही तर पिके वाळून जातात. नको त्या वेळी पडला तरी पिके सडून जातात. दुष्काळ पडला की उपाशी मरण्याची वेळ येते. उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकरी चांगले बियाणे, औजारे, बैल खरेदी करू शकत नाही. तो अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असल्याने अंधश्रद्ध आणि चुकीच्या रूढींचे पालन करणारा आहे. गावातील शाळा दूर दूर असतात, असल्या तरी तिथे शिक्षक नसतात अशी खेड्यांतील शाळांची दुरवस्था आहे. त्यातच भर म्हणून नाईलाजाने शेतक-यांना आपल्या मुलांना गुरे चारायला आणि शेतीकामासाठी पाठवावेच लागते.

परंतु भारत सरकारने शेतक-यांच्या मदतीसाठी काही चांगल्या योजना आणलेल्या आहेत. त्याला कमी व्याज दरावर कर्ज देण्याची व्यवस्था आहे. त्यातून तो बी बियाणे आणि खते घेऊ शकतो. विहीर बांधणे, कूपनलिका खोदणे ह्यासाठी मदत करणा-या योजनाही असतात. पण काय होते की बरेचदा योजना चांगल्या असतात. परंतु त्यांची अंमलबजावणी होताना मधलेच लोक पैसे खातात आणि ख-या गरजूंपर्यत योजनेचे फायदे पोचतच नाहीत. शिवाय अशिक्षितपणामुळे शेतकरीही आपल्या हक्कांबाबत जागरूक नसतो. ह्यासाठीच हल्ली सरकारने सर्वांना सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केलेला आहे. तो नीट राबवण्यात आला पाहिजे.

तसेच शेतक-याला कोंबडी आणि अंड्यांची पैदास, अळंबीचे उत्पादन, किना-या- वरच्या शेतक-यांना कोळंबीची शेती, गाईम्हशी पालन असे जोडधंदे करण्यासही उत्तेजन द्यायला हवे आहे. शेतीव्यतिरिक्तच्या वेळात करण्याचे इतरही काही उद्योग त्याला शिकवले पाहिजेत.

जोपर्यंत आपला शेतकरी अडाणी आणि निर्धन आहे तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे.

Set 5: एक भारतीय शेतकरी निबंध मराठी – Shetkari Nibandh in Marathi – Farmer Essay in Marathi

आपला भारत कृषिप्रधान देश आहे. गांधीजींनी ते ओळखले होते आणि म्हणूनच ‘खेड्यांकडे चला’ असा संदेश दिला होता. आपल्या देशाचा आत्मा खेड्यात आहे, खेड्यातील शेतक-यात आहे. आपल्या देशातील ७० टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून असते. हा शेतकरी आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ पिकवतो परंतु ह्या आपल्या अन्नदात्याची स्वतःची परिस्थिती कशी आहे? आज विदर्भातील शेतकरी आत्महत्या का करतात? शेतकरी बिचारा गरीब पण त्यांच्या कष्टाचे धान्य विकून मधले दलाल आणि अडते मालामाल का? ह्या प्रश्नांचे उत्तर कुणीच देत नाही.

आपल्या देशात १९७५ सालानंतर हरित क्रांती झाली. त्यामुळे दर एकरी पिकांचे उत्पन्न वाढले. ह्या हरित क्रांतीसाठी शास्त्रीय दृष्टीने तयार केलेले बीबियाणे, रासायनिक खते आणि रासयानिक जंतुनाशके वापरली गेली. परंतु त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला. शिवाय ही हरित क्रांती फक्त पंजाबसारख्या क्षेत्रात आणि जिथे कायम पाण्याची सोय आहे अशा क्षेत्रात यशस्वी झाली आहे.

सर्वसामान्यतः मौसमी पावसावरच भारतीय शेतक-यांना अवलंबून राहावे लागते. पाऊस पडला नाही तर पिके वाळून जातात. अवकाळी पडला तरी पिके सडून जातात. दुष्काळ पडला की उपाशी मरण्याची वेळ येते. इतकी मेहनत करूनही शेतकरी गरीब का? आणि शेतीचा उद्योग तोट्यात का? उत्पन्न कमी असल्यामुळे तो चांगले बियाणे, औजारे, बैल खरेदी करू शकत नाही. तो अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असल्याने अंधश्रद्ध आणि चुकीच्या रूढींचे पालन करणारा आहे. गावातील शाळा दूर दूर असतात, असल्या तरी तिथे शिक्षक नसतात अशी खेड्यांतील शाळांची दुरवस्था आहे. त्यातच भर म्हणून नाईलाजाने शेतक-यांना आपल्या मुलांना गुरे चारायला आणि शेतीकामासाठी पाठवावेच लागते.

परंतु भारत सरकारने शेतक-यांच्या मदतीसाठी काही चांगल्या योजना आणलेल्या आहेत. त्याला कमी व्याज दरावर कर्ज देण्याची व्यवस्था आहे. त्यातून तो बीबियाणे आणि खते घेऊ शकतो. विहीर बांधणे, कूपनलिका खोदणे ह्यासाठी मदत करणा-या योजनाही असतात. पण काय होते की बरेचदा योजना चांगल्या असतात. परंतु त्यांची अंमलबजावणी होताना मधलेच लोक पैसे खातात आणि ख-या गरजूंपर्यत योजनेचे फायदे पोचतच नाहीत. शिवाय अशिक्षितपणामुळे शेतकरीही आपल्या हक्कांबाबत जागरूक नसतो. ह्यासाठीच हल्ली सरकारने सर्वांना सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केलेला आहे. तो नीट राबवण्यात आला पाहिजे. तसेच शेतक-याला कोंबडी आणि अंड्यांची पैदास, अळंबीचे उत्पादन, किनायावरच्या शेतक-यांना कोळंबीची शेती, गाईम्हशी पालन असे जोडधंदे करण्यासही उत्तेजन द्यायला हवे आहे. शेतीव्यतिरिक्तच्या वेळात करण्याचे इतरही काही उद्योग त्याला शिकवले पाहिजेत.

जोपर्यंत आपला शेतकरी अडाणी आणि निर्धन आहे तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे.

Set 6: मी एक कष्टाळू शेतकरी निबंध मराठी

मी एक छोटा शेतकरी आहे. माझ्याकडे खूप कमी शेती आहे. ही जमीन मला माझ्या वाडवडिलांकडून मिळाली आहे. माझे माझ्या जमिनीवर प्रेम आहे. मी आणि माझी बायको आमच्या जमिनीची खूप काळजी घेतो. आम्ही मशागत करतो. त्यामुळे आमची ‘काळी आई’ आम्हांला उपाशी ठेवत नाही.

मात्र कितीही कष्ट केले, तरी संकटे चुकत नाहीत. मध्ये दोन वर्षे पाऊसच पडला नाही. पीक आले नाही. तेव्हा सरकारने सुरू केलेल्या दुष्काळी कामांवर आम्ही जात होतो. एका वर्षी बी-बियाण्यांत भेसळ निघाली. लावलेले पीक आलेच नाही. कष्ट वाया गेले!

कितीही कठीण वेळ आली, तरी मी सावकाराचे कर्ज काढत नाही. मला दारूचे व्यसन नाही. मला विडी-तंबाखूचेही व्यसन नाही. मी वारेमाप खर्च करत नाही. मी शेताच्या कडेला बांबू, बोरीबाभळी लावल्या आहेत. मी शेतात चिंचेची झाडे लावली आहेत. मला चिंचेचे थोडे पैसे मिळतात. शेतातील काही भागात मी फुलशेती करतो. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरतो. कष्टाला घाबरत नाही. त्यामुळे आमची पासमार होत नाही.

भारतीय शेतकरी निबंध मराठी – Farmer Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply