Set 1: डॉ. जगदीशचंद्र बोस निबंध मराठी – Dr Jagdish Chandra Bose Nibandh in Marathi

डॉ. जगदीशचंद्र बोस हे भारतातील एक थोर वनस्पतीशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर, १८५८ रोजी पूर्व बंगालमध्ये मैमनसिंग ह्या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बंगाली भाषेतच झाले. नंतर त्यांनी कलकत्ता येथील सेंट झेवियर्स कॉलेजातून बीए केले आणि ते उच्च शिक्षणासाठी लंडन येथे गेले. तिथे त्यांना केंब्रिज विद्यापीठात अभ्यास करण्याची संधी मिळाली. तिथून ते १८८५ साली भारतात परतले तेव्हा कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजात त्यांना प्राध्यापकाची नोकरी मिळाली.

त्यांनी आपल्या संशोधनाने सा-या जगाला थक्क करून सोडले. वनस्पतींना संवेदना असतात, त्यांनाही अन्य प्राण्यांप्रमाणे उष्णता, थंडी, सुख, दुःख, भावना असतात हे त्यांनीच सर्वप्रथम सिद्ध केले. त्याशिवाय त्यांनी अनेक वैज्ञानिक यंत्रांचाही शोध लावला. त्यापैकी क्रेस्टोग्राफ हे यंत्र फारच महत्वाचे आहे. वनस्पतींच्या अत्यंत सूक्ष्म क्रियाही हे यंत्र हजारो पटीने मोठ्या करून दाखवते. ह्या यंत्राच्या मदतीनेच बोस ह्यांनी सिद्ध करून दाखवले की प्राणी आणि वनस्पती ह्या दोन प्रकारच्या सजीवांत अनेक बाबतीत सारखेपणा असतो.

लंडन येथील रॉयल सोसायटी ह्या वैज्ञानिक संस्थेत ह्या यंत्राची संपूर्ण तपासणी करण्यात आली तेव्हा ते यंत्र सर्व चाचण्यांना उतरले. त्या यंत्रामुळे पुराव्यानिशी सिद्ध झाले की सर्व सजीवांमध्ये संचालन, आकुंचन, प्रसरण, स्पंदन अशा क्रिया चालू असतात. प्राण्यांमध्ये रक्ताभसिरण होते तसेच वनस्पतीत वेगवेगळ्या रसांचे अभिसरण होते. शिवाय डॉ. बोसनी हेसुद्धा सिद्ध करून दाखवले की अचेतन पदार्थांवरही बाह्य उत्तेजनेचा प्रभाव पडतो.

अचेतन आणि सचेतन, प्राणी आणि वनस्पती ह्यांच्या सूक्ष्म रहस्यांचा भेद करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांच्या थोर कार्याने, त्यांनी लिहिलेल्या पांडित्यपूर्ण लेखांनी, पुस्तकांनी आणि संशोधनाने सारे जग विस्मयचकित झाले होते. त्यांनी वायरलेस टेलिग्राफीचाही शोध लावला होता परंतु मार्कोनी ह्या शास्त्रज्ञाने त्या शोधाचे पेटंट आधी घेतल्यामुळे त्याचे श्रेय डॉ. जगदीशचंद्र बोस ह्यांना मिळाले नाही.

डॉ. बोसनी लंडन, पॅरिस आणि युरोपात अन्य ठिकाणी विज्ञान परिषदांच्या निमित्ताने भरपूर प्रवास केला. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना भाषण करण्यासाठी सन्मानाने आमंत्रित केले जात होते.

१९१५ साली त्यांनी बोस विज्ञान मंदिर ही संस्था कलकत्ता येथे स्थापन केली आणि आपले कार्य चालूच ठेवले. २३ नोव्हेंबर, १९३१ रोजी वयाच्या ७९ वर्षी त्यांनी आपला देह ठेवला.

भारतमातेच्या ह्या थोर सुपुत्राला त्रिवार वंदन आहे.

Set 2: सर डॉ. जगदीशचंद्र बोस निबंध मराठी – Dr Jagdish Chandra Bose Nibandh in Marathi

सर जगदीशचंद्र बोस हे एक महान भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १८५८ साली झाला. लहानपणापासूनच ते बुद्धिमान होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण खेड्यात झाले. पुढील शिक्षण कोलकात्याला झाले. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. भारतात परतल्यावर ते प्रेसिडेन्सी महाविदयालयात प्राध्यापक झाले.

जगदीशचंद्रांकडे मुळातच संशोधक वृत्ती होती. विदयार्थी असतानाच त्यांनी घरातच प्रयोगशाळा निर्माण केली होती. त्यांचे वनस्पतीविषयीचे संशोधन जगभर गाजले. ‘वनस्पती सजीव आहेत.

त्यांना माणसांप्रमाणे भावना असतात.’ हे त्यांनी सर्वप्रथम सिद्ध केले. ‘क्रेस्कोग्राफ’ या यंत्राच्या साहाय्याने वनस्पतींची वाढ मोजतात. या यंत्राचा शोध जगदीशचंद्रांनी लावला. त्यासाठी त्यांना इंग्रज सरकारने ‘सर’ ही पदवी दिली.

सन १९३७ साली जगदीशचंद्रांचे निधन झाले.

Set 3: डॉ.जगदीशचंद्र बोस निबंध मराठी – Dr Jagdish Chandra Bose Nibandh in Marathi

जगदीशचंद्र बोस एक महान शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म नोव्हेंबर, १८५८ मध्ये बंगालच्या मेमनसिंह या ठिकाणी झाला होता. त्यांच्या वडिलाचे नाव भगवान चंद्र होतं, ते डिप्टी कलेक्टर होते. जगदीशचंद्र बालपणापासूनच तीव्र बुद्धीचे होते आणि शाळेत नबर एक होते. प्राथमीक शिक्षण घरीच झालं होतं आणि नंतर पुढील शिक्षणासाठी ते कलकत्त्याला आले. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना इंग्लडला जावे लागले. तिथे त्यांनी निसर्ग विज्ञान, भौतीकशास्त्र आणि रसायन शास्त्रात चांगलेच संशोधन केले. भारतात आल्यावर त्यांना कॉलेजमध्ये शिकवायला सुरूवात केली.

त्यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले. या शोधाने प्रभावीत होऊन, लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना डॉक्टर ऑफ साईसची उपाधी दिली होती. त्यांचा प्रसिद्ध शोध वनस्पती संबंधी होता. त्यांनी प्रथमच हे नजरेस आणून दिले की वनस्पती देखील सजीव असते. त्यांना देखील प्राण्यासमान भाव-भावना आहेत. त्यांना लंडन-पॅरीस आदी ठिकाणी भाषण देण्यासाठी बोलावल्या गेले तसेच त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य देखील करण्यात आले. ती एक मोठी गौरवास्पद गोष्ट होती. यामुळे संपूर्ण देशाची मान गर्वाने उंचावली होती. शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या प्रयोग शाळेत नवे नवे प्रयोग आणि संशोधन करीत राहिले. त्यांच्या त्या प्रयोगशाळेला “बोस मंदीर” या नावाने ओळखल्या जाते. २७ नोव्हेंबर १९३७ या दिवशी या महान शास्त्रांनी या जगाचा निरोप घेतला.

Set 4: डॉ.जगदीशचंद्र बोस निबंध मराठी – Dr Jagdish Chandra Bose Nibandh in Marathi

डॉक्टर सर जगदीशचंद्र बोस एक थोर भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या शोधांनी आणि मौलिक संशोधनाने साऱ्या जगाला चकित करून सोडले होते. ते पाहिले असे शास्त्रज्ञ होते ज्यांनी वनस्पती संवेदनशील असतात हे सिद्ध करून दाखविले. त्यांना पण सुख, दु:ख, थंडी, उष्णता प्रकाश, अन्न इत्यादी च्या अन्य प्राण्यांप्रमाणे जाणीवा असतात. त्यांनी अनेक वैज्ञानिक यंत्रांचा शोध लावला. त्यात क्रेस्टोग्राफ हे यंत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. वनस्पतींची संवेदनशीलता मोजण्यासाठी ते फार उपयुक्त आहे. कारण वनस्पतीच्या सूक्ष्मातिसूक्ष्म क्रिया हे यंत्र दहा हजार पट मोठ्या करून दाखवू शकते. या यंत्राच्या मदतीनेच डॉ. बोस यांनी वनस्पती आणि प्राणी यांच्यात असणारा अनेक बाबतीतील सारखेपणा सिद्ध करून दाखविला परंतु यामुळे बोस यांचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी चुंबकीय क्रेस्टोग्राफ बनविला. जो वनस्पतीची सूक्ष्म गती १० लाख पट मोठी करून दाखवितो.

लंडन येथे रॉयल सोसायटीत या यंत्राची पूर्ण तपासणी केली गेली आणि खरोखरच ते आश्चर्यकारक ठरले. या यंत्राच्या साह्याने निर्विवादपणे हे सिद्ध झाले की ज्याप्रमाणे सर्व जीवांमध्ये संचालन, आकुंचन, प्रसरण, स्पंदन आणि रक्ताभिसरण असते. त्याचप्रमाणे वृक्षवेली वनस्पतींमध्ये पण या सर्व क्रिया असतात. वनस्पतीला जीव असतो हे जसे डॉ. बोस यांनी सिद्ध केले तसेच जड़ पदार्थांवरही बाह्य उत्तेजनेचा प्रभाव पडतो आणि ते त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात हे सिद्ध केले. जास्त उत्तेजक पदार्थांमुळे त्यांची शक्ती वाढते व त्यामुळे ते थकतातही. यांनी हे पण दाखविले की जड पदार्थ विश्रांतीनंतर आपल्या पूर्वस्थितीत येतात आणि विषारी पदार्थांमुळे त्यांची शक्ती नष्ट होते.? जड आणि चेतन, जीव व वनस्पतींच्या या सूक्ष्म रहस्यांचा भेद करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होत. ते एक प्रसिद्ध वनस्पती व भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांच्या थोर कार्याने, लेखांनी, पुस्तकांनी आणि संशोधनाने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांनी वायरलेस टेलिग्राफीचाही शोध लावला होता पण त्याचे श्रेय त्यांना मिळाले नाही कारण मार्कोनीने आधीच याचे पेटंट घेतले होते.

लंडन, पॅरिस, युरोप इत्यादी ठिकाणांचा प्रवास डॉ. बोस यांनी केला. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी भाषणे दिली. आपले संशोधन सादर केले आणि खूप प्रसिद्धी मिळविली. प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता येथे अध्यापनाचे काम केले. इ. स. १९१५ मधे त्यांनी “बोस विज्ञान मंदिर” स्थापन केले व आपले कार्य चालू ठेवले. इ. स. १९३७ मध्ये वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते खऱ्या अर्थाने एक थोर शास्त्रज्ञ व थोर व्यक्ती होते. निर्जीव पदार्थ, वनस्पती आणि प्राण्यांमधील साम्य दाखवून जे महान कार्य केले त्यामुळे ते चिरस्मरणीय ठरले. त्यामुळे आपणास जीवनाच्या एकरूपतेचे नवे दर्शन घडले आणि सत्याचा साक्षात्कार झाला. एक अद्भुत चमत्कार घडला.

डॉ. बोस यांचा जन्म इ. स. १७५८ मध्ये पूर्व-बंगालमधील ढाका जिल्ह्यातील राढस्वाल गावी झाला. सेंट झेवियर कॉलेज कलकत्ता येथून त्यांनी बी.ए. केले. नंतर उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तिथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात अध्ययन केले. इ. स. १८८५ मध्ये ते भारतात परत आले. प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता येथे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. ते अत्यंत नम्र व स्वाभिमानी होते. अशा थोर शास्त्रज्ञाचा आम्हाला अभिमान वाटतो. वनस्पतीलाही जीव असतो हे सिद्ध करून मानव इतर प्राणी व वनस्पती यांच्यातील साम्य दाखविले. या सत्याने आपला दृष्टिकोन विशाल झाला, जीवनाच्या एकरूपतेचे रहस्य समजले आणि आपण अधिक संवेदनशील व दयाळू बनलो.

डॉ. जगदीशचंद्र बोस निबंध मराठी – Dr Jagdish Chandra Bose Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply