शस्त्रबंदी निबंध मराठी – Shastra Bandi Marathi Nibandh
आज सर्वच देशांमध्ये शस्त्रस्पर्धा चालू आहे. अक्षरशः हजारो कोटी रूपये शस्त्रास्त्रांच्या खरेदीवर ओतले जात आहेत. खरे तर भारतासारख्या विकसनशील देशाला शस्त्रास्त्रांवर जो अमाप खर्च करावा लागतो तो जर वाचला आणि त्या ऐवजी आपण तो विकासकार्यावर खर्च करू शकलो तर आपली मलेशिया किंवा सिंगापूरसारखी प्रगती होण्यास काहीच वेळ लागणार नाही. परंतु आपले शेजारी म्हणजे पाकिस्तान आणि चीन ह्यांच्यामुळे तसे करणे आपल्याला अजिबात शक्य नाही. जगात ब-याच ठिकाणी अशी रणांगणे धुमसती ठेवण्यात काही प्रगत देशांचे हितसंबंध असतात. त्यामुळे त्यांच्याकडच्या शस्त्रांची विक्री होते आणि त्यांना भरपूर फायदा करून घेता येतो.
परंतु असे किती काळ चालणार? ६ ऑगस्ट, १९४५ रोजी जपानमधील हिरोशिमा येथे आणि ७ ऑगस्ट, १९४५ रोजी नागासाकी येथे अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला, तेव्हा प्रचंड मोठा संहार झाला त्यानंतर अणूबॉम्ब किती विध्वंसकरूशकतो तेजगाला समजले.
हल्ली क्षेपणास्त्रे, बॉम्ब, अणुबॉम्ब, आरडीएक्स अशी अत्यंत विध्वंसक हत्यारे निर्माण झाली आहेत. पूर्वी काय व्हायचे की लढाई ही फक्त रणांगणात असलेल्या सैनिकांत व्हायची. परंतु ह्या अशा हत्यारांमुळे युद्धाची आग सर्वसामान्य नागरिकाच्या दारात येऊन पोचली. शिवाय आजच्या आधुनिक शस्त्रांची संहारक्षमता एवढी आहे की हिरोशिमा, नागासाकीवर पडलेले अणुबॉम्ब काहीच नव्हेत. सा-या पृथ्वीला जाळून टाकण्याची क्षमता आहे ह्या आधुनिक बॉम्बमध्ये ! अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन ह्या देशांपाशी एवढा शस्त्रसाठा आहे की त्यामुळे एकदाच नव्हे तर अनेकदा हे जग नष्ट करतायेऊ शकते. बाकीचे देशही ह्या शस्त्रस्पर्धेत मागे नाहीत.पण कुठेतरी ह्या स्पर्धेला आळा बसायला नको का? आज जर तिसरे महायुद्ध झाले तर परिस्थिती केवढी भयंकर बनेल?
आंधळ्या शस्त्रस्पर्धेत विकसित देश भाग घेतात कारण त्यांना त्यांचे वर्चस्व शाबूत राखायचे असते. तर विकसनशील देशांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्या उत्पन्नाचा बराच हिस्सा परवडत नसतानाही शस्त्रांपायी नासावा लागतो. जगातील कित्येक हुकुमशहा केवळ शस्त्रांच्या धाकावरच राज्य करीत आहेत आणि सामान्य जनतेच्या आशा आकांक्षांची बेछूट पायमल्ली करीत आहेत. धार्मिक दहशतवादही ह्या शस्त्रांच्या आधारावरच फोफावला आहे.
म्हणूनच संपूर्ण जगाला अण्वस्त्रांपासून भयमुक्त करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. निःशस्त्रीकरणामागील उद्देश हाच आहे. त्यासाठी भयानक संहारक्षमता असलेल्या हत्यारांची निर्मिती थांबवणे आणि जी तयार आहेत ती टप्प्याटप्प्याने नष्ट करणे ही कामे करावी लागतील.मानवी संस्कृती आणि मानववंश जर ह्या पृथ्वीतलावर टिकून राहावा असे जर आपल्याला वाटत असेल तर तसे करणे भाग आहे.
पुढे वाचा:
- शरदाचे चांदणे निबंध मराठी
- शरद ऋतु मराठी निबंध
- शब्द हरवले तर मराठी निबंध
- वेळेचा सदुपयोग मराठी निबंध
- वेरूळ अजिंठा लेणी निबंध मराठी
- वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध
- वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी
- वृक्षांचे सौंदर्य निबंध मराठी
- वृक्षांचे महत्व मराठी निबंध
- वृक्षसंपत्ती मराठी निबंध
- वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध
- वृक्ष आपले मित्र मराठी निबंध
- जर वीज नसती तर मराठी निबंध