शालेय जीवनातील गमतीजमती – Shaley Jivanatil Aathvani

शाळा म्हणजे गंमत, शाळा म्हणजे दंगामस्ती, शाळा म्हणजे जिवलग दोस्त, अशी लहानपणी शाळेबद्दल माझी भावना होती. त्यामुळे शाळेत जाण्यास मी नेहमीच उत्सुक असे. माझ्या दोषांचा पाढा वाचणारी आई मोठ्या कौतुकाने सांगते, “आमच्या राजूला शाळा लहानपणापासून भारी प्रिय !”

बालवाडीतील गमती आता मला तितक्या आठवत नाहीत. तरी त्या वर्गातही मी खूप मस्तीखोर होतो, एवढे मात्र खरे ! बैठ्या खेळांपेक्षा मला पळापळीचे खेळ खूप आवडत. कुणाचा तरी खाऊचा डबा किंवा पाण्याची बाटली लपवून ठेवून त्याला रडकुंडीला आणण्यात मला खूप गंमत वाटे.

अशा दंगामस्तीत पूर्वप्राथमिक शाळा संपवून मी प्राथमिक शाळेत आलो. गप्पागोष्टी, गाणी यांऐवजी अभ्यास सुरू झाला. सुदैवाने सगळ्या विषयांचा अभ्यास मला झटकन जमत असे आणि मग मोकळा मिळालेला वेळ गमतीजमतीत जात असे. मधल्या सुट्टीत डबा खाण्यासाठी आमची मोठी अंगतपंगत बसे. तेव्हाही कुणाची तरी खोडी काढण्यात किंवा काही व्रात्यपणा करण्यात मला अधिक रस वाटे या प्राथमिक शाळेत.

असतानाच आम्ही एक गड पाहायला गेलो होतो. कुणालाही आधी कळू न देता, आम्ही चार मित्रांनी शिवरायांच्या कामगिरीवरचे एक छोटेसे नाटुकले बसवले होते. सहलीला जाताना नाटकाला आवश्यक असणारे थोडेसे कपडेही बरोबर घेतले होते. दुपारी जेवण झाल्यावर त्या- गडावर जेव्हा आम्ही आमचे नाटुकले सादर केले, तेव्हा सर्वांना खूप गंमत वाटली आणि शिक्षकांनी आमचे खूप कौतुक केले.

जेव्हा मी माध्यमिक शाळेत आलो, तेव्हा शालेय वातावरणाशी मी पूर्णपणे परिचित झालो होतो. त्यामुळे विविध गमतीजमतींना उधाणच आले. भरपूर मेहनत घेऊन आम्ही खो खो, कबड्डी आणि क्रिकेटचे सामने जिंकले आहेत. जिंकलेल्या मोठ्यामोठ्या ढाली शाळेत आणताना आनंद ओसंडून जायचा. आताच्या माझ्या या किशोरवयात वक्तृत्वस्पर्धा आणि नाट्यस्पर्धा जिंकताना आमची जिद्द उचंबळून येते.

वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे तर, गमतीजमतींचाच उत्सव ! भरपूर खोड्या करण्याची पर्वणीच! त्यातल्या शेल्यापागोट्याच्या कार्यक्रमात आमच्या बुद्धिमत्तेची कसोटी लागते. आमचे गुरुंजनही खेळीमेळीने या साऱ्या गमतीजमतीत सहभागी होतात. अशा या शालेय जीवनातील गमतीजमती कधीही न सरणाऱ्या व कधीही न विसरता येण्यासारख्याच आहेत.

शालेय जीवनातील गमतीजमती – Shaley Jivanatil Aathvani

पुढे वाचा:

Leave a Reply