गुणांचे मोल निबंध मराठी

“स्वप्नील, बाबांना उलट बोलतात का कधी? तो शेजारचा राजू बघ, किती गुणी आहे!” असे उद्गार नेहमी ऐकायला मिळतात. कारण प्रत्येक आईवडिलांना आपली मुले गुणी असावीत असे वाटते.

येथे गुणी असणे म्हणजे सद्गुणी असणे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. काही माणसे गोरी असतात. काही माणसे काळी असतात. हे आपल्या हातात नसते. आपण काळे असलो, तर कितीही प्रयत्न केले, तरी आपण गोरे होऊ शकत नाही. मात्र आपले वागणे आपल्या हातात असते. हे आपल्या मनाचे सौंदर्य होय. हे सौंदर्यच आपल्या व्यक्तिमत्त्वाला सुंदर बनवते. म्हणून हे मनाचे सौंदर्य आपण वाढवायला हवे.

चांगले वागायचे म्हणजे काय करायचे? आपण सदा प्रसन्न राहावे. कधी गर्व करू नये. कोणाचा अपमान करू नये. वडील माणसांशी आदराने व नम्रतेने वागावे. दुसऱ्यांचा द्वेष करू नये. दुसऱ्यांशी प्रेमाने वागावे. त्यांना नेहमी मदत करावी.

चांगले वागण्याचा खूप फायदा होतो. आपले सगळीकडे स्वागत होते. सगळेजण आपल्याशी प्रेमाने वागतात. आपल्याला मदत करतात. नम्रतेमुळे आपली कामे चुटकीसरशी होतात. अडचणीच्या काळात सगळेजण मदत करायला धावतात. आपले जीवन सुखी व आनंदी बनते. म्हणून गुणी असावे; दुर्गुणी असू नये.

पुढे वाचा:

Leave a Reply