कोकीळ पक्षी मराठी निबंध – Kokila Pakshi Nibandh Marathi

पक्ष्यांची किलबिल आपल्याला आवडते. भल्या पहाटे अंगणातील झाडांवरील पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली की, मन प्रसन्न होते, वसंत ऋतूत मात्र एक वेगळाच आवाज आपले लक्ष वेधून घेतो. आंब्याच्या झाडाला मोहोर आला की, ‘कुहू, कुहू’ ऐकू येते. मग आपण त्या आवाजाचा वेध घेतो; पण खूप वेळा निरीक्षण करूनही तो पक्षी दिसत नाही, तो असतो कोकीळ.

कोकीळ रंगाने काळा कुळकुळीत असतो, पण त्याच्या मधुर आवाजामुळे कुणालाही त्याचा रंग खटकत नाही. गंमत अशी आहे की, मधुर आवाज काढतो तो कोकीळ नर; कोकिळा नव्हे. पण आपण माणसे गोड आवाजात गाणाऱ्या गायिकांना ‘गानकोकिळा’ म्हणतो!

काही महिला ‘कोकिळा-व्रत’ करतात. त्या व्रतात त्यांना दररोज कोकीळ पक्ष्याचे दर्शन घ्यायचे असते. झाडात लपून गाणारा हा पक्षी चटकन दिसत नाही. म्हणूनच हे व्रत अवघड असते.

असे सांगतात की, कोकिळा आपले अंडे कावळीच्या घरट्यात ठेवते. म्हणून संस्कृत भाषत कोकिळेला ‘परभृत’ म्हणतात.

कोकीळ पक्षी मराठी निबंध – Kokila Pakshi Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply