हुंडा : एक अनिष्ट प्रथा – हुंडा एक सामाजिक समस्या – Hunda Ek Samajik Samasya Marathi Nibandh

हुंडा ही मनुष्यजातीला आणि आपल्या संस्कृतीला लागलेली कीड आहे. तिला आधीच समूळ उपटले नाही तर ती सगळ्या समाजाला पोखरुन काढेल. त्यासाठी सुशिक्षित मुलामुलींचा सहभाग महत्वाचा आहे. युवक, युवतींनी हुंडा न देता व घेता लग्न करण्याची तयारी ठेवावी. खोटया प्रतिष्ठेच्या आहारी न जाता डामडौल टाळावा. हुंडा देणे किंवा घेणे दोन्हीही वाईटच कारण जे हुंडा देतात किंवा देऊ शकतात त्यामुळे घेणाऱ्यांची हाव वाढत जाते. आणि जे लोक हुंडा किंवा हुंडारुपी लाच देऊ शकत नाही त्यांना आपल्या मुलींची लग्ने करणे फार अवघड होते. मुलीचे भले व्हावे म्हणून त्यांना हुंडा जमा करण्यासाठी घरदार-शेतीवाडी सर्व काही विकावे लागते. परंतु मुलीच्या सासरकडच्या लोकांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या लागतात.

इसवी सन १२०० सालानंतर हुंडयाची पध्दत समाजात अधिकाधिक रुढ झाली, पूर्वी हया देवाणघेवाणीलाच स्त्रीधन म्हणत असत. या धनावर स्त्रीचा अधिकार असून मृत्युनंतर ते धन मुलीला मिळण्याची व्यवस्था होती. पूर्वी मुलीला हुंडा म्हणून गाईही दिल्या जात. अडीअडचणीला उपयोगी पडणारे स्त्रीधन आज हुंडा या स्वरुपात भस्मासूर म्हणून पुढे येत आहे. याचाच परिणाम म्हणून मुलीला विकाऊ वस्तु समजले जाते तसेच ज्या मुलाला हुंडा जास्त मिळेल त्याची पत किंवा मागणी जास्त आहे असा गैरसमज करुन घेतला जातो. शेजाऱ्यापेक्षा किंवा अमुक पेक्षा आपल्या मुलाला जास्त हुंडा मिळावा म्हणून वरपक्षाची हाव वाढतच जाते व मुलीच्या माहेरच्या माणसांवर अपेक्षांचे ओझे लादले जाते. या त्यांच्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही तर मुलीला जाळून मारणे किंवा तिचा वध करायलाही मागे पुढे पाहिले जात नाही.

आजची युवापिढी साक्षर आहे. काळाचे व परिस्थितीचे भान ठेवून त्यांनी आपल्या आईवडिलांना समजावयास हवे. पालकांच्या मागे लपून हुंडयाची अपेक्षा करु नये. हुंडा या अनिष्ठ प्रथेमुळे पैशाच्या मागे लागून मनाविरुध्द जोडीदार पसंत केला तर आयुष्यभर मनस्तापच होतो. आयुष्य सुखमय न होता नरक होऊन जाते. हल्लीच्या युवापिढीने जुन्या बुरसटलेल्या अंधश्रध्दा आणि कल्पना यांचा त्याग करावा जनमनात नवविचारांचे वारे वाहू दयावे. नवविचारांनी गुलामी झुगारून देणे व रुढीचे बंधन तोडणे हे महत्वाचे, मुलामुलींनी या जाचक प्रथेविरुध्द प्रतिकार करावा, मनावरील भार झुगारुन दयावा तेव्हाच या प्रथेचा समूळ नायनाट होईल.

मुलींचा देखील या बाबतीत सबळ पाठींबा असावा हुंडा देऊन लग्न करण्यात त्यांचाही विरोध हवा त्यादेखील मुलांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाहीत त्यामुळे उच्च-नीच भाव न ठेवता सर्वसमभाव असावा. वडिलांच्या संपत्तीत भावाएवढाच वाटा आहे त्यामुळे मी हुंडारुपी माझा वाटा नेते ही भावना ठेवू नये. हा युक्तिवाद फसवा असतो कारण हुंडयाची रक्कम वराला मिळते व भांडण झाल्यावर मुलीला हात हलवत बाहेर पडण्याची पाळी येते. आजच्या काळात कायदयाने हुंडाबंदी असली तरी परंपरा म्हणून तसेच मुलगी सुखी होण्यासाठी हुंडा दिला-घेतला जातो. लोभी आणि स्वार्थी माणसे हुंडयासारख्या प्रथेला खतपाणी घालत असतात. म्हणून सरकारने अशा लोकांना शिक्षा करायला हवी त्यामुळे या प्रथेला थोडातरी आळा बसेल.

आपल्या घरात परक्याची मुलगी आपले सर्व सगेसोयरे सोडून रहायला येते. आपल्या मुलाचा संसार फुलविण्याचे सोडून तिच्या मृत्युस कारणीभूत होणारा वरपक्ष आपली इज्जत पणाला लावतो आणि कायदयाच्या कचाटयात सापडून आपलेही जीवन बरबाद करतो म्हणूनच म्हणावसे वाटते ‘हुंडा नको ग बाई’

या अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी युवापिढीने जागोजागी हुंडाविरोधी पथनाटये, जाहीर भाषणे, मुलाखती याद्वारे समाजपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे नाजुक, कोवळया मुली आपले भावी आयुष्य सुखासमाधानात घालवतील. आपला संसार फुलवतील. मुलीला देखील समाजात प्रतिष्ठा मिळेल आणि मुलीच्या जन्मानंतर आईवडिलांना पश्चात्ताप किंवा काळजी वाटण्याऐवजी तिचे आईवडील तिचा जन्म सन्मानाने स्विकारतील इतकेच नव्हे तर बेटी ही धनाची पेटी मानुन मुलामुलींना समानतेने वागवतील. म्हणून सर्वांना पुढील निर्धार करावा.

मुलगी ही तर सोनं हो सोनं हवं कशाला तिला हुंडयाचं लेणं हुंडयाची चिरेबंदी तोडुन टाकीन जाईनच जाईन मी जाईनच जाईन”

हुंडा- एक सामाजिक कलंक – Hunda Ek Samajik Samasya Marathi Essay

स्त्रीचे स्थान समाजात दुय्यम कसे आहे ते आपल्या विवाहपद्धतीत दिसून येते. हुंडा प्रथा ही त्या दुय्यमत्वाचाच एक भाग आहे. म्हणजे एकीकडे आपला देश विकासाच्या मार्गावर चालत आहे, उद्याची महासत्ता होण्याची स्वप्ने बाळगत आहे. आपल्या देशात कित्येक स्त्रिया आज मानाचे स्थान भूषवित आहेत. स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक अशासारख्या बँकांच्या सर्वोच्चपदी आज स्त्रियाच आहेत. एके काळी आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी होत्या. असे असतानाही हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा आजही समाजात टिकून आहेत. एवढेच नव्हे तर फोफावत आहेत, हे फारच वाईट आहे.

हुंड्याची प्रथा हा आपल्या समाजाला लागलेला कलंक आहे, त्या प्रथेपोटी कित्येक नवविवाहित स्त्रियांचा बळी गेला आहे, आणि आजही जात आहे.

आपल्या देशात पुरूषसत्ताक जीवनपद्धती आहे. पुरूष श्रेष्ठ असतो आणि स्त्री कनिष्ठ असते असे लहानपणापासूनच सर्वांच्या मनावर बिंबवले जाते. त्यामुळे लग्न झाल्यावर स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहावयास जायचे, आपली प्रेमाची माणसे सोडून नव्या घरातील परंपरा आत्मसात् करायच्या अशीच रूढी आहे. स्त्रीने संसार करावा, घरातच राहावे अशी परंपरा असल्यामुळे ब-याच समाजात तिला फार शिकू दिले जात नाही. कुठलीही वेगळी कौशल्ये आत्मसात् करू दिली जात नाहीत. तसेच नवरामुलगा नव-या मुलीपेक्षा वयाने, उंचीने, शिक्षणाने, पगाराने सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ हवा अशीही विचारसरणी असते. त्यामुळे मुलगा जेवढा जास्त शिकलेला, जास्त उत्पन्न मिळवणारा तेवढ्या त्या स्थळावर वधुपित्यांच्या उड्या जास्त असतात. त्या मुलाच्या घरचे लोकही मुलीच्या माहेराकडून भलीमोठी वरदक्षिणा, गाडी, सोने, चांदी, भपकेदार लग्नसोहळा ह्यांची अपेक्षा ठेवतात.

मुलीच्या आईवडिलांनी आपल्या हौसेप्रमाणे आणि ऐपतीप्रमाणे लग्न करून देणे ही वेगळी गोष्ट आहे आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने वस्तू मागून घेणे, त्या जर मिळाल्या नाहीत तर सुनेचा छळ करणे, तिला मारणे, जाळणे ह्या गोष्टी फार वाईट आहेत असेच म्हणावे लागेल.

भारत सरकारने १९६९ साली हुंडाबंदी कायदा केला आहे, त्यानुसार हुंडा देणे आणि हुंडा घेणे हा गुन्हा आहे. परंतु फक्त कायदा करून उपयोग नाही. त्यासोबत जनजागृती व्हायला हवी आहे.

उद्याचे तरूण म्हणून आपण आज शपथ घ्यायला हवी आहे की आम्ही हुंडा घेणार नाही आणि देणारही नाही.

हुंडा- एक वाईट प्रथा – Hunda Ek Vait Samasya Marathi Essay

एकीकडे आपला देश विकासाच्या मार्गावर चालत आहे, उद्याची महासत्ता होण्याची स्वप्ने बाळगत आहे. आपल्या देशात कित्येक स्त्रिया आज मानाचे स्थान भूषवित आहेत. स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक अशासारख्या बँकांच्या सर्वोच्चपदी आज स्त्रियाच आहेत. एके काळी आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी होत्या तर राष्ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील होत्या. परंतु असे असतानाही हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा आजही समाजात टिकून आहेत. एवढेच नव्हे तर फोफावत आहेत, हे फारच वाईट आहे.

हुंड्याची प्रथा हा आपल्या समाजाला लागलेला काळा डाग आहे, त्या प्रथेपोटी कित्येक नवविवाहित स्त्रियांचा बळी गेला आहे, आणि आजही जात आहे.

आपल्या देशात पुरूषसत्ताक जीवनपद्धती आहे. पुरूष श्रेष्ठ असतो आणि स्त्री ही दुय्यम असते असे लहानपणापासूनच सर्वांच्या मनावर बिंबवले जाते. त्यामुळे लग्न झाल्यावर स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहावयास जायचे, आपली प्रेमाची माणसे सोडून नव्या घरातील परंपरा आत्मसात् करायच्या अशीच रूढी आहे. स्त्रीने संसार करावा, घरातच राहावे असे असल्यामुळे बयाच समाजात तिला फार शिकू दिले जात नाही. कुठलीही वेगळी कौशल्ये आत्मसात् करू दिली जात नाहीत. तसेच नवरामुलगा नव-या मुलीपेक्षा वयाने, उंचीने, शिक्षणाने, पगाराने सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ हवा अशीही विचारसरणी असते. त्यामुळे मुलगा जेवढा जास्त शिकलेला, जास्त उत्पन्न मिळवणारा तेवढ्या त्या स्थळावर वधुपित्यांच्या उड्या जास्त असतात. त्या मुलाच्या घरचे लोकही मुलीच्या माहेराकडून भलीमोठी वरदक्षिणा, गाडी, सोने, चांदी, भपकेदार लग्नसोहळा ह्यांची अपेक्षा ठेवतात.

मुलीच्या आईवडिलांनी आपल्या हौसेप्रमाणे आणि ऐपतीप्रमाणे लग्न करून देणे ही वेगळी गोष्ट आहे आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने वस्तू मागून घेणे, त्या जर मिळाल्या नाहीत तर सुनेचा छळ करणे, तिला मारणे, जाळणे ह्या गोष्टी फार वाईट आहेत असेच म्हणावे लागेल.

भारत सरकारने १९६९ साली हुंडाबंदी कायदा केला आहे, त्यानुसार हुंडा देणे आणि हुंडा घेणे हा गुन्हा आहे. परंतु फक्त कायदा करून उपयोग नाही. त्यासोबत जनजागृती व्हायला हवी आहे.

तर आपण विद्यार्थ्यांनीच प्रतिज्ञा करायला हवी की पुढे जाऊन आम्ही हुंडा देणार नाही आणि घेणारही नाही.

हुंडा : एक अनिष्ट प्रथा – हुंडा एक सामाजिक समस्या – Hunda Ek Samajik Samasya Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply