हे विश्वची माझे घर निबंध – Essay on He Vishwachi Maze Ghar
परमेश्वराकडे पसायदान मागताना ज्ञानदेव म्हणतात, ‘आता विश्वात्मके देवे!’ ज्ञानेश्वरांसारख्या थोर संताला सारे विश्व परमेश्वरस्वरूप वाटणे यात गैर काहीच नाही. म्हणून तर रेड्याच्या पाठीवर फटके बसताच ज्ञानदेवांना वेदना झाल्या.
ज्ञानेश्वरांसारखे महात्मे साऱ्या जगाचा विचार करतात. ‘जय जगत् ‘ असा संदेश विनोबांनी दिला. हवामान, परिस्थिती, भाषा यांमुळे जगातील विविध विभागांतील माणसांच्या राहणीत विविधता आहे. तरीपण माणूस मात्र सर्वत्र सारखाच असतो. मराठी आई आपल्या बाळावर जसे प्रेम करते, तसेच प्रेम जपानी आईही आपल्या चिमुकल्यावर करते, मग आपण असे भेदभाव का करतो?
कवी केशवसुत यांच्या कवितेतील नवा शिपाई सांगतो
कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते
कोठेही जा डोईवरती दिसते नीलांबर ते ।।
एकदा सर्वांविषयी आत्मीयतेची भावना निर्माण झाली की, जगातील कोणताही माणूस आपलेच रूप वाटते. ते माझे, मी त्यांचा, एकच ओघ अम्हातुनि वाहे ‘ अशी अवस्था होते. कोठेही काही संकट ओढवले की, तेथे जगातून मदतीचा ओघ येऊ लागतो आणि या भूतलावर कोठेही काही महत्त्वाची आनंददायक घटना घडली की सारे जग आनंदित होते. पायात काटा रुतला तर डोळ्यांत आसवे दाटतात. आणि हृदयात आनंद उचंबळला की गळ्यातून गोड लकेर उमटते. अशी जेव्हा अखिल मानवजातीची विश्वव्यापक वृत्ती होईल, तेव्हा ज्ञानदेवांची प्रार्थना मूर्त स्वरूप घेईल. .
पुढे वाचा:
- हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी
- हुंडा एक सामाजिक समस्या
- हिरवी संपत्ती मराठी निबंध
- स्वावलंबन मराठी निबंध
- स्वामी दयानंद सरस्वती निबंध मराठी माहिती
- स्वातंत्र्यानंतरचा भारत मराठी निबंध
- स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी
- स्वच्छता तेथे प्रगती मराठी निबंध
- स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग निबंध मराठी
- स्पर्धेचे युग मराठी निबंध
- स्त्री शिक्षणाचे महत्व निबंध मराठी
- सौर ऊर्जा निबंध मराठी
- सूर्य संपावर गेला तर निबंध मराठी